#कॉर्पेरेशन जिवनातील व्यथा ..
#कॉर्पेरेशन जिवनातील व्यथा ..


एकटे पणाचा कंटाळा यायला लागला होता मला...आजूबाजूला गर्दी असून एकटं असल्याचा भास होऊ लागला....मी माझ्या स्वताच्या जगात रमायला लागले होते ....हळू हळू सर्वांशी बोलणं ही कमी होत चाललं होत...तू बद्दललीस अस राहून राहून ऐकायला येऊ लागलं...कारण माझे सर्वच छंद अता बंद होत चालले होते...मी आता कुनामध्ये गुंतून राहत नव्हते.....सर्व यश समोर असून सुध्धा काहीतरी बाकी आहे अस सतत वाटत होत....कशाची तरी कमी जाणवत होती....
हल्ली एकटं राहवत नव्हतं...नजर कुणाला तरी सापडत होती...जेवायला घोळक्यात बसून सुध्धा कुणी कुणाशी बोलत नव्हतं....जणू सर्वच मुके झाले होते......अचानक सर्व वानी हिन झाले होते......रोज दिसणारे चेहरे..कधी हसत सुध्धा नवते....काहीच मनोरंजन नव्हतं....
काहीतरी जवाबदारी म्हणून सर्व आपआपली कामे करत होती...उच्च अधिकाऱ्याने काही उन बोलू नये....म्हणून सर्व शांततेत चाललं होत......वर्शोंवर्ष अका संघात काम करूनही कुणाला कुनाविषयी काहीही माहित नव्हतं..
..
प्रत्येक जण आपापल्या जगात हरून गेला होता....मी ,माझी बायको,माझी मुले अन् असलेच तर आई वडील...या वतिरिक्त कुणाला ही काहीही माहित नव्हतं....अन् मी...रोजची घरची कामे....अन् ऑफिस ची कामे....करता करता स्वतः ला हरवत चालले होते....धड कुणाशी बोलणं होत नव्हतं...ना कुणाशी भेटणं बोलणं होत होत...अंगावर खूप जवाबदारी पडल्या होत्या....त्या मला मोठी झाल्याचं भास करून देत होत्या...काम केल्याची किंमत ही भेटत होती...पण कसली तरी कमी भासत होती ......
रोज रोज तेच schedule हाताळून जणू मी लक्ष्मण रेषा पार करू शकत नव्हते....जिथं मला रोज नवीन काही तरी करायला हवं असायचं......ती मी हरवत चालले होते...
रोज चहा घेताने असे हजारो सवाल मनात घर करून जात होते.....त्यांचे उत्तर शोधता शोधता मला जाणीव होत होती ....की काहीतरी मागे सुटत चाललं होत....
स्वतः च्या विचारानं मध्ये गुतून मी हरवत चालले होते...आणि मला घोळक्यात असून सुध्धा एकटी असल्याचं जाणवत होत....