#राग...(Anger)
#राग...(Anger)


#राग....काय म्हणावं नेमके याला...मित्र की शत्रू...
मित्र म्हणाव तर त्याने प्रेमाने राहायला हवं...
आणि शत्रू म्हणावं तर त्यानं गोंधळ घालू नये..
राग म्हटलं की डोळ्यासमोर लालबुंद झालेलं डोळे...हसू ची एक ही कळी नसलेला चेहरा...
गर्व... कपाळावर पडलेल्या आढया...आठवतात....
आणि हो आपण रागाला दोषी ठरवतो नेहमी...पण तो योग्य वेळी योग्य ठिकाणी आलाच पाहिजे ...नाहीतर लोक तुमचा फायदा घेऊन जातील....बघा ना...समजा...तुम्हाला कुणीतरी विनाकारण शिव्या देत आहे....आणि तुमची काहीही चुकी नाहीये...तर काय कराल तुम्ही ....नक्कीच तुम्ही कारण विचारणार...ठीक हे..आणि तरीही तुम्हाला तो वक्ति कारण न सांगता शिव्याच देऊ पाहतोय....तर नक्कीच तुम्ही रागवाल...आणि साहजिक रागवलच पाहिजे...पण नेहमी नाही...वेळ... काळ... कारणे... रागवनारी व्यक्ती...कोण आहे हे सर्व बघून रागवल पाहिजे..नाहीतर प्रेमाने समजाऊन सुध्धा प्रश्न सुटतात...
तस बघितले तर रागाचे भरपूर प्रकार आहेत...
जस की मी आधी प्रेमाने समजावते..चुकल्यावर...नाही ऐकलं तर रागावून ही सांगते...पण त्यामागे माझा चांगलं हेतू असतो...आणि हो मी म्हणेल...जर रागावून कुणाचं चांगलं होत असेल तर राग चांगला आहे...तो आपला मित्र आहे...
राग आपला स्वाभिमान दाखवून देतो...आणि अहंकार ही...आपल्यावर असत... आपल्या रागाला कस वागवयच...कस काबू मध्ये ठेवायचं..आणि कसा शश्र म्हणून उपयोगात आनायच....
राग आपला स्वभाव नाही होऊ शकत...आणि त्याला कधी आपला स्वभाव म्हणून वागाऊ ही नका...त्याला आपली सवय ही बनऊ नका..की आपली कमजोरी म्हणून ही दुसऱ्याला दाखाऊ नका...तो जितका चांगला आहे...तेवढंच वाईट ही आहे...
एक क्षण हवा असतो फक्त राग यायला..आणि सर्व काही मातीत मिसळावयला....आपली प्राण - प्रतिष्ठा...इज्जत... मान - सन्मान...घालवायला...आणि कित्तेक वर्ष जातात हे सर्व कमवता - कमवता...म्हणून मी म्हणेल की जेवढं होईल तेवढं आपल्याला रागाला काबू मध्ये ठेवा...
राग हा फक्त काही क्षणांचा असतो....तर तेवढी क्षण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही...दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुतवला...पूर्णपणे दुर्लक्ष केलं ....तेवढे क्षण आपण त्या जागेवरून किव्हा त्या वक्ती...समोरून बाजूला गेलो...तर नक्कीच आपण हे सर्व होण्यापासून वाचू शकतो...आणि आनंद निर्माण करू शकतो... प्रयत्न करून बघा...हे सूत्र फायदेशीर ठरत...