Mahesh Hatzade

Inspirational

2  

Mahesh Hatzade

Inspirational

खरे जीवन!

खरे जीवन!

2 mins
8.9K


सायंकाळची साडेसहाची वेळ. सिंदोला मुकुटबन रोड वरील मौदा गाव. मौदा गावातील आयुष्याच्या उतरणीला आलेला एक माणूस. नाव नीलकंठ हेपट. माणसातलं माणूसपण शोधण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही. यांत्रिक जीवन जगत असतांना असा प्रयत्न करावा असा मनाला विचारही शिवलाही नाही. प्रवासाची साधने शोधत असतांना नीलकंठ हेपट नावाचा माणूस जवळ यावा व येणाऱ्या गाड्याना हात देवून मला लिफ्ट देण्याची विनंती करावी,  मी नातलगही नाही, ओळखीचाही नाही, तरी अडचणीत सापडलेल्या व पुढील प्रवासासाठी साधने शोधणाऱ्याला, निलकंठ हेपट नावाचा आयुष्याच्या उतरणीला आलेला माणूस, मदत मागीतली नसतांना मदत करायला येतो. अन् माणसातला माणूस नीलकंठजीच्या रुपाने शोधण्याचा विचार मनातल्या मनात सुरु होतो. ६५ हजार रूपये वार्षिक पगारावर शेतात शेतमजूर काम करतांना वृध्द पत्नी सोबत राहणारा निलकंठ,  रस्त्यावर आपला जीवनपट उलगडत जातो. सर्वांना मामू या नावाने बोलणारा, मलाही मामू म्हणत होता. "मामू, मी गरीब माणूस कोणाचं वाईट नाही मनात, कोणालाही विचार हेपट कसा आहे. चार पोरी होत्या मामू, चारही लघपत्या ला देलो, लोक नाव घेतेत, आपल्या पोरी चांगल्या घरी पाडलन मनून." चारही पोरींचे लग्न करून आधार देणारा निलकंठ हेपट मात्र निराधार राहत होता. मात्र  त्याचा मागमूसही चेहऱ्यावर दिसत नव्हता. "मामू, शाळेत पोरी शिकत होत्या त, शाळेला कुलूप ठोकलो. जेलमधी टाकला, साहेबानं कोर्टात विचारलन, तं ठोकलो मटलो, जातीचा कुणबी हो मामू, खोटा बोललो नाही, भपकन चार नविन मास्तरनी आल्या, नाव घेतेत मामू गावात. अडाणचोट आहो पण सगळा समजते, लिहता येत नाय! शाळेत शिक्षकांसाठी आंदोलन करणारा नीलकंठ हेपट मात्र आपल्या पत्नीसाठीही मृत्यूनंतर आर्थिक सोय करून ठेवतो. "मामू १० हजार बायकोच्या नावानं पाँलिसी भरतो, जीवाचा काय सांगता येत नाही मामू, आधार राहावा बुढील, माणोस करल कसाही मामू, बाईमाणोस कोठी हात पसरल? "मामु, काम होत नाही, हल धरावाल तकलिफ होते, कंपनीत चायपाणी देवालं ठेवल तं विचारून पाहतो, का करावाचा आहे, पोट भरला दोघाचा झाला. हाटेलात भांडे घासतो, झाडतो, कोणी चाय देते तं कोणी पाणी" साडेसहापासून साडेसात पर्यंत दोन तास नीलकंठ हेपट सोबत कसे गेले कळलेच नाही.अंधारात दुरून दोन लाईट दिसत होते, कदाचित ती बस असेल हे ओळखून नीलकंठजी हेपटांनी उठायला सांगीतल. "मामू, बस येत आहे, ये कधी आलास तं!" बसमधे बसतांना नीलकंठजी च्या चेहऱ्यावरून नजर काही हटत नव्हती. अनोळखी माणसाला मदत करतांना आपला जीवनपट उलगडणारा, स्वतःहून मदत करायला आलेला माणूस बघून माणसातल्या माणूसकीचे दर्शन झाले. स्वार्थाने बरबटलेल्या, भौतिक सोयीसुविधा उपभोगण्याला जीवन समजणाऱ्यांना नीलकंठजी हेपट यांच्या चेहऱ्यावरचे समाधान म्हणजे चपराकच होती. 


Rate this content
Log in

More marathi story from Mahesh Hatzade

Similar marathi story from Inspirational