STORYMIRROR

Vinodini Vartak

Inspirational

3  

Vinodini Vartak

Inspirational

जीवन प्रवास

जीवन प्रवास

1 min
180


     खरच , जीवन हा एक प्रवास आहे . प्रत्येकाने तो प्रवास हसत , रमत गमत चालला पाहिजे. कारण या वाटेवर सदा काही फूलेच पसरलेली नसतात. कधी काटे रूपी संकटे , दुःखे तर कधी खळखळ मंजुळ आवाजात वहाणारे, कधी दोन्हीही बाजूस सुंगधी फूलांचे ताटवे , हसत खुणावणारी मृदु तृणांकरे रूपी मखमली सुखांचे दिवस असतात . तर जीवन ही सुख दुःखाची पाउल वाट आहे.

    तेव्हा जीवनात येणा-या या सुख दुःखाचा ज्याला तालमेळ जमतो. तोच यशस्वी जीवन प्रवास करू शकतो. म्हणूनच तर

    व्यथा असो आनंद असू दे

    प्रकाश असो वा तिमीर असू दे

     वाट दिसो वा न दिसू दे

      रुणु झुणती तराने

      माझे जीवन गाणे

असे आनंदाने येणा- या संकटांना मात करत , सामोरे जावे लागते .

   पृथ्वी पहा ना ऊन वारा पाऊस सहन करत परिभ्रमण करत असते.

अहो , राम कृष्ण यांना पण कुठे जीवनात सरळ सोट अशी जीवन वाट लाभली. त्यांना पण जीवन वाटेवर फूले व कांटे आलेच ना. म्हणजे सुख दुःखे आलीच ना .कृष्णा चा जन्म कारावासात झाला .जन्मल्या जन्मला पावसात , दुथडी भरलेल्या यमुनेतून त्यांना जावे लागले . तर रामास वनवास भोगावा लागला.

   एकूण काय जीवन ही खडतर प्रवास असतो . नदी नाही का कांटेरी ,खडकाळ मार्ग आक्रमित येत असते. तसेच आपला जीवन प्रवास. त्यात कधी कधी प्रलोभने येतात त्या प्रलोभनांना बळी न पडता धोपट मार्ग आपनवत जावे लागते . नाहीतर जीवन प्रवास विकट बनतो

     जीवन प्रवासास अंत पण नक्कीच असतो. तो कोणालाच चुकत सुटत नाही. तेव्हा जीवन प्रवासात चालतांना कर्म ह्यालाच देव मानत चालले पाहिजे. सत्कर्म ची कास धरून जीवन प्रवास केला की तो नक्कीच सुखद होतो



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational