झुळूक...
झुळूक...


सकाळची ८:२० ची ठाणे लोकल ,
मनात योजले होते आज रविवार सुट्टीचा दिवस लोकलला गर्दी नसेल आपल्याला मस्त विंडो सीट मिळेल.....
पण कसचे काय....
नेहमी प्रमाणे दुरदैव....
कशीबशी तिसरी सिट मिळाली.
खांद्या वरील शबनम मांडीवर घेतली.....
थांबा....थांबा......
डोळे मोठे करून पाहू नका...
शबनम म्हणजे खाद्यावर अडकवायची पिशवी...किंवा तुम्ही म्हणता ती धोपटी.
तेव्हढ्यात खांद्यावर एक मजबूत हात पडला...आणि..पाठोपाठ खड्या आवाजात बोल...
' ए ...घे की सरकून तिकडे...
काय पसरून बसलास...
पाय म्हणतो मी...'
अस्सल बेळगावी भाषा कानावर पडली.
दुखरा खांदा सावरत त्या सद्गृहस्थाला चवथी सिट दिली..आणि सहज मान वळवून त्या माणसा कडे ....( मनात चीड उत्पन्न झाली होती, वाटे याला सद्गृहस्थ का म्हणायचे ? )
वळून पाहिले.....आणि...
दोघांच्या तोंडून शब्दांच्या फुलबाज्या बरसल्या...
अरे विज्या तू ?.....
च्या मायला अज्या xxx तू ?....
दोघांनी बसूनच कड कडून मिठी मारली..
समोरच्या बाकावरील ललना गालातल्या गालात हसत होती.
/
गप्पांचा ओघ सुरू झाला .....
आठवणींच्या कप्यांची कवाडे उघडत गेली..
सकाळी लवकर उठून फिरायला जायचच हा वडिलांचा शिरस्ता.
वडिलांच्या सोबतीने आम्ही भावंडे गावाबाहेरील ‘ लक्ष्मी टेकडीवर ’ जायचो. देवळातील
पूर्वाभिमुख दिपमाळेच्या चौथऱ्यावर बसून सूर्योदय पहायचा.
सूर्योदय झाल्यावर , जमिनीवर मांडी घालून बसून एक साथ २१ वेळा गायत्री मंत्राचे पठण. आणि त्या नंतर सूर्य नमस्कार. आणि मग .....
परतीचा प्रवास सुरू ......घराकडे , धावत...धावत...
व्यायाम म्हणून न्हवे...भूक लागली म्हणून !
वडील ऑफिस च्या कामानिमित्त फिरतीवर गेले की काका आमच्या सोबत असतं.
मग तर काय ....आम्ही समस्त बच्चे कंपनी खुश......
कारण....
सकाळची लक्ष्मी टेकडीवर गेल्यावर ,परतीचा प्रवास आडवळणाचा ......
येताना कॉलेज रोड कॉर्नर येथील
‘ मित्र समाज ‘ या उडप्पी हॉटेल मधील डोसा चापायचा.आणि पुढे किर्लोस्कर रोड वरील ‘ नागोरी ‘ मिठाईवाल्या कडे एक डबल प्लेट ‘ कुंदा ‘ खायचा.
काका बेळगाव नगरपालिकेत पाणी खात्यात कामाला होते. तेंव्हा येताना ‘ काकतीवेस ‘ नाक्यावरील त्यांच्या ऑफिस मध्ये
त्यांची एक खेप असायची ,त्यांचे काम होई पर्यंत आम्ही राणी ‘ कित्तुर चन्नम्मा ‘ च्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बसून राहायचो.
शनिवार हा आठवडा बाजाराचा दिवस. आणि तो भरायचा आमच्याच गल्लीत , ‘ काकतीवेस ‘ येथे.
तसा मी नशीबवान , कारण प्राथामिक शाळा घराच्या उजव्या गल्लीत अगदी जवळ आणि माध्यमिक शाळा गव्हर्मेंट सरदारस् हायस्कूल ‘ ती पण जवळच घराच्या डाव्या बाजूला पन्नास पावलावर
मध्यामिक शिक्षणा नंतर प्रथम वर्ष कॉलेज साठी ‘ आर एल एस कॉलेज‘ मध्ये प्रवेश घेतला.
कॉलेज पण जवळच होते सहज चालत जाण्या सारखे. रस्त्याचे नाव पण ‘ कॉलेज रोड ‘ असेच होते , रूंद आणि प्रशस्त रस्ता , सतत भरून वाहिलेला.
काही खास आकर्षणा साठी , कॉलेजच्या दुसऱ्या वर्षा साठी , बेळगावचे उपनगर – ‘ टिळकवाडी ‘ येथे ‘ आर पी डी कॉलेज ‘ मध्ये येथे प्रवेश घेतला.हे कॉलेज तसे लांबच होते , रेल्वे स्टेशनच्या पलीकडे
जाण्या येण्यच्या रस्त्याचे नाव पण वेगळेच होते ‘ काँग्रेस रोड ‘
या रस्त्याच्या टोकाला ‘ काँग्रेस भवन ‘ आहे आणि या काँग्रेस भवनाच्या कंपाऊंड मध्ये एक मोठ्ठी विहीर आहे , जिथे तरुण मंडळी पोहायचा मनसोक्त आनंद घेतात. या विहिरीचे नामकरण लोकांनी स्वस्पूर्तीने केले ‘ काँग्रेस विहीर ‘
या ‘ काँग्रेस रोड ‘ ची खासियत म्हणजे रस्ता लांब ,रूंद आणि दुतर्फा गुलमोहर वृक्ष. रस्त्या पासून काहीं अंतरावरून मिरज बेंगळूर आगगाडीचा मार्ग ,
आणि या रस्त्याला लागून एका भागात ‘ मराठा लाईट इन्फन्ट्री ‘चे ट्रेनिंग सेंटर आहे. याच्याच परिसरात एक सुंदर विसाव्याचे ठिकाण म्हणजे एक सुबक महादेवाचे मंदिर आणि त्याला लागून असलेली बाग. या मंदिराचे सुध्दा लोकांनी नामकरण केले ‘ मिलिटरी महादेव ‘कॉलेजला जाण्यासाठी एक सेकंड हॅण्ड सायकल विकत घेतली होती
बेळगावात गजबजलेले ठिकाण म्हणजे , कॉलेज रोड च्या शेवटी एक चौक ज्याला ‘ बोगारवेस ‘ म्हणत ,जिथून सर्व उपनगरात जाणाऱ्या बस सुटत असतं. उदा.
‘ टिळक वाडी ‘, *शहापूर ‘, ; अनगोळ ‘, ‘ वडगाव ‘, ‘ उचगाव ‘, ‘ हिंडलगा ‘
याच बोगारवेसेतून एक रस्ता ‘ किर्लोस्कर रोड ‘ ज्याच्या दुसऱ्या टोकाला प्रसिद्ध स्वादिष्ट ‘ कुंदा ‘ बनवणारा ‘ नागोरी ‘ मिठाईवाला.
याच किर्लोस्कर रोड वर उजव्या हाताला एक छोटी गल्ली ‘ रामलिंग खिंड ‘ या गल्लीच्या तोंडाशी एक मोठी विहीर आहे .या विहिरीचे वैशिष्ट म्हणजे
या विहिरीच्या गोल कड्यावर एकाच वेळेस बारा जण पाणी शेंदू शकत होते. बारा चात्या आहेत म्हणून या विहिरीला ‘ बारा घड घडयाची विहीर ‘ असे म्हणत. या विहिरीचे पाणी गोड .
बेळगावचे लोक शिस्तबध्द.
रस्त्यांची आखणी सुध्दा व्यवस्थित.
१) आठवड्याचा बाजार शनिवारी
‘ काकती वेस ‘ आणि ‘ गणपत गल्ली ‘
२) सराफांची आणि सोनारांची दुकाने ‘ गणपत गल्ली ‘ च्या पूर्व भागात , आणि पश्चिम विभागात भाजी बाजार.
३) घड्याळे , रेडिओ ,इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘ खडे बाजार ‘ च्या उत्तर भागात तर होल सेल कपडा मार्केट आणि शिलाई मशीन ची दुकाने दक्षिण भागात.
४) साड्या , तयार कपडे ‘ रामदेव गल्ली ‘
महाराष्ट्रात जशी पैठणी प्रसिद्ध , त्या सोबत समस्या स्त्री वर्गाची दुसरी पसंती म्हणजे ‘ शाहापुरी ’ साडी.
या साडीची खासियत सर्व बाबतीत आहे , रंग , पोत , बांधणी , पल्लू आणि काठ
बेळगावात एक उपनगर आहे शहापूर येथेच त्या हात मागावर बनतात , होल सेल व्यापारी सुध्दा येथेच दुकाने थाटून आहेत .लग्नात ‘ बस्ता ‘ नावाची प्रथा आहे
तुम्ही फक्त निरोप पाठवा , लगेच दोन माणसे विविध प्रकारच्या साड्या घेवून तुमच्या लग्न घरी येतील आणि तुम्हाला घर बसल्या लग्नाच्या साड्यांची खरेदी करता येईल.
बेळगावला दूरवर फिरायला जाण्याची दोनच ठिकाणे.
१) माळ मारुती
२) अर्गन तलाव - हा पाच तलावाचा समूह.
मी माझ्या आठवणीतले एक एक पैलू सांगत होतो , वेळ कसा गेला समजलेच नाही.लोकल मस्जिद स्टेशन सोडून व्ही. टी. स्टेशनात शिरत होती .
बोलता बोलता .....
अजित केव्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला समजलेच नाही.
पेशाने तो चाटर्ड अकाउटंट
फोर्ट मधील नामांकित परदेशीकंपनीत मीटिंग होती.
दोघेही व्ही टी ला उतरलो , पुन्हा भेटण्याचे ठरवून एक मेकांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला.