Laxman Katekar

Inspirational

5.0  

Laxman Katekar

Inspirational

जग खरंच बदलतंय का?

जग खरंच बदलतंय का?

6 mins
1.8K


भाग पहिला -

साहित्याचा इतिहास पाहता महान लेखकांनी महान काव्य, ललित, साहित्य लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच जग बदलत आहे. आपण देखील बदलले पाहिजे, असा संदेश देत समाजाला योग्य दिशा देण्याचं प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने समाज नेहमी विचार करतो की, जगात काय बदल झाला ? आणि मी कसे बदलले पाहिजे ? यावेळी समोर येणारी परिस्थिती, असणारे आपले आर्थिक स्थिती, जगात दिसणारी परीस्थिती, या सर्व गोष्टींचा विचार करून समाज मागेपुढे न पाहता, चालू परिस्थितीत स्वतःला शहाणे मानून, आपण बदलत राहतो. यावेळी आपल्याला काही गोष्टी पासून नक्कीच फायदा होतो. तर काही गोष्टी आपल्यादृष्टीने संकटाच्या व अडचणीच्या निर्माण होतात. त्या वेळी आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. असा मार्ग फक्त एकाच ठिकाणी मिळू शकतो ते म्हणजे "साहित्यसंपदा" नक्कीच.

साहित्याचा इतिहास पाहताना साहित्य हे रचले, लिहिले, जाऊन त्याचे वाचन केले, तरच साहित्य समजते, पण आज तसे न होता आपणास प्रत्येक जण साहित्याचा वारसदार समजून साहित्याची हवी तशी वळण घेत, वेगळ्याच मार्गावर घेऊन जात आहे. याठिकाणी पूर्वी गावामध्ये किंवा खेड्यांमध्ये सामान्य जीवन जगणारी माणसे ही निसर्ग व शेतीला दैवत म्हणून, त्यांची पूजा-अर्चा करत, त्यांची जपणूक करत आणि त्यासोबतच एखादा दुसरा व्यवसाय करत, आपली उपजीविका भागवत असे. परंतु त्या नंतर काळ बदलत असतांना समाजाने एखादा विचार स्वीकारत स्वतःला बदलायचा प्रयत्न केला आणि समाज बदलू लागला.

ग्रामीण भागातील सामाजिक जीवन हे एकोप्याची, एकत्र कुटुंब पद्धतीचे व सामाजिक बांधिलकी जपणारे, सहजीवन वाढवणारे, संस्कृती टिकणारे आणि जगातील इतर देशांना आदर्श घडवून देणारे जीवन पद्धती होती. यामध्ये प्रत्येक जण आपला शेती व्यवसाय पशूपालन आणि त्यासोबत एखादा व्यवसाय असे साधी राहणी, व उच्च विचारसरणी असणारा माणूस होता. परंतु साधारण जगातील बदलानुसार यंत्राचा शोध लागत गेला. तसे तंत्रज्ञान येत गेले, आणि माणसाची जीवनपद्धती बदलली.

दूरची गोष्ट कशाला, आपण ह्याच शतकातील बाबीवर थोडासा आढावा घेत असताना, आपणास दिसून येईल की 1990 च्या दशकातील परिस्थिती साधारण होती, राजेशाही संपली होती, आणि लोकशाहीचा स्वीकार करून चाळीस वर्षाचा काळ उलटल्याने भारतातील मानवी जीवन हे जगणे किंवा जिवंत राहणे ह्यासाठी कार्य करणारी जीवनपद्धती दिसत होती, त्याच वेळी काही काळ दुष्काळाचा, सुखाचा आणि समाधानाचा आला तरी माणूस आनंदाने बिघडून जात नव्हता. थोडक्यात माणसाला समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड कसे द्यावे व आपले जीवन जगाला आदर्श दाखवेल अशा आदर्शवत जीवनपद्धती माणसाजवळ होती. माणूस माणसाला ओळखत होता. तसेच प्राणी पक्षी निसर्ग कीटक आणि आपल्यापेक्षा इतरांना जपत होता कारण त्याला माहित होते. या जगात आपल्यापेक्षा सर्वांना किंमत असेल, आपण त्यांना किंमत दिली तर किंवा तरच आपण आनंदाने राहू शकतो. अशावेळी निसर्गाचा जपला पाहिजे,झाडे लावली पाहिजेत, प्राण्यांना पाणी चारा दिला पाहिजे, पक्षांना पाणी खाऊ टाकला पाहिजे, काही हिंस्त्र प्राण्यांना मारले नाही पाहिजेत, हे तो जाणून घेत होता त्याला उमजत होते, समजत होते त्यामुळे वरील गोष्टी काळजीपूर्वक करण्यात माणूस पटाईत होता. परंतु दहा वर्षाचा काळ आता परिस्थिती बदलते, अशा एका दशकानंतर 2000 च्या काळात माणसाकडे थोडेफार पैसा-अडका आणि धन-दौलत येताच माणूस बदलायला सुरुवात झाली. निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. वृक्षारोपण करणे तर सोडाच, पण माणसाने होती ती झाडे तोडायला सुरुवात केली. पशुपक्ष्यांना जगणे मुश्किल झाले. काही प्राणी माणसाने छंद म्हणून मारले गेले. तसेच पक्षांची जीवनमान संपवून टाकले. आणि 'या जगात सर्वज्ञानी मी एकटाच आहे' असा विचार करत तो जगू लागला. आणि त्याला वाटले की 'मी जे करतो ते माझ्यासोबतच इतरांच्या देखील भल्या चे कार्य करत आहे', परंतु त्यांच्या कार्यातून, त्याच्या विचारातून जगाचा बदलणारा इतिहास पाहता, प्रगती ही फक्त वैयक्तिक स्वरुपात राहणीमान बदलणारी दिसून येते. आणि सामाजिक वैचारिक व बांधिलकी संपवणारी असं स्वरूपात जागतिक बदल होताना दिसून येतो. तरीदेखील आपण तो स्वीकारून पुढे जगण्याचा प्रयत्न करतो. आणि करत करत 2010 च्या काळात या दशकात जगात खूप बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. या काळात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत महाराष्ट्राचा भारत आणि जगातील सर्व देशात तंत्रज्ञानाने खूप प्रगती केल्याचा अभिमान बाळगत आपण जगाला सांगण्याचा प्रयत्न करतो. की जग बदलते आपण बदलले पाहिजे, चला आपल्या विचारांनुसार आम्हीदेखील नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करू. परंतु त्या बदलातून वरील वरील संस्कृती, समाज, परंपरा, बांधिलकी सामाजिक, परिस्थिती समता, एकात्मता, राष्ट्रीय अभिमान, या बाबी काळजीपूर्वक खरंच जपल्या जातात का? ह्या प्रश्नाचे उत्तर जर 'हो' असेल त्याच बदलाचा आम्ही स्वीकार करू. परंतु वरील सर्व बाबींना छेद देत, आम्ही बदल स्वीकारले. अगोदर गावामध्ये बैलगाडीचा वापर वाहन म्हणून केला जात होता सोबतच घोडाटांगा, खटारा या साधनाचा वापर करून माणूस दळणवळणाची गरज भागवत असे. आणि मध्य पन्नास वर्षाच्या काळात माणसाने खूप प्रगती करत, साधने बदलली बैलगाडी आज दिसेनाशी झाल्यात जमा आहे. कारण शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जात असे. सोबतच पशुपालन व्यवसाय होत असत आणि त्यामुळे दुग्ध व्यवसाय शेळीपालन मेंढी पालन व इतर प्राण्यांना सांभाळले जाऊन प्राणीजीवन सुरक्षित ठेवत. आम्ही आमचा स्वार्थ पूर्ण करत होतो. अशाच परिस्थितीत शेतातील कामे करण्यासाठी बैलगाडीऐवजी ट्रॅक्टर, यंत्र-तंत्र आली आणि गाय बैल या प्राण्यांचा वापर कमी झाला. त्यामुळे त्यांना सांभाळणे आम्हाला जड झाले. यामुळे दूध, तूप, दही, लोकर, शेणखत व प्राण्यांपासून मिळणाऱ्या सुविधा यापासून आम्ही वंचित झालो. ह्या गोष्टीचा विचार न करता आपण बदलत राहीलो आणि प्रत्येकाच्या घरासमोर किमान एक डझन असणारे प्राणी संपुष्टात आले. आता घराची राखण करणारा कुत्रा देखील आता कमी प्रमाणात आढळत आहे. आणि ज्या कडे हे प्राणी आहेत ते मनमानी किंमतीला विकत आहेत. पूर्वी गावातील फिरणाऱ्या कुत्र्याचे पिल्लू घरी आणून त्याचा सांभाळ केला, तर तो इमानदारीने घराची राखण करत. तेदेखील सोडून देत. आम्ही गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना भाकरी टाकली तरी ते आमच्या घरची राखण करत. आता पाच हजार रुपयापासून ते पाच लाखापर्यंत कुत्र्यांच्या किमती वाढल्या. त्यांना विकत घेऊन सांभाळत जगवले, तरी पूर्वीच्या प्राण्यासारखा जीव ती आता कुटुंबावर लावताना दिसत नाहीत. उलट घरातील माणसालाच दगाबाजी करून चावू नये म्हणून त्याच्यासाठी घरासमोर एक छोटी पेटी तयार करून त्यात बंद ठेवले जाते. अशाने कुत्रा आणि घर हे जीवन बदलले.

दळणवळणाच्या सुविधांचा वापर करताना माणसाने गावामध्ये एक सायकल खरेदी केली, तर ती वस्तू बघण्यासाठी सगळा गाव त्या सायकलवाल्याच्या घरासमोर गोळा होत. आणि आपुलकीने विचारपूस करत. नवीन वाहन व त्याची माहिती घेत. घेण्याचा विषय सोडा त्या सायकलला स्पर्श करून आनंदी होत. परंतु बदल होत रस्त्यावर कमी वाहने असताना सुरक्षित प्रवास करणारा माणूस, आज प्रत्येकाच्या घरी माणसे कमी पण वाहने जास्त झाल्याने, रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. सायकलवरून बदल होत मोटर सायकल आली. घरात एक मोटर सायकल नसून चार चार मोटरसायकल आहेत. सोबत चार चाकी गाड्या, मोठमोठी वाहने घरासमोर उभी राहिली, आणि ती चालवण्यासाठी देण्यात येणारा परवाना मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात चाचणी घेऊन, परीक्षा केली जात असत. जो चालवण्यास योग्य आहे त्यालाच परवाना मिळत असे. आता प्रत्येकाच्या घरी वाहने झाल्याने घरातील माणसे वाहन शिकवू लागली व परवाना नसताना वाहने चालू लागली. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असे दिसून येते. तसेच तरुणाईला गरज नसताना मुलांचा हौस पूर्ण करण्यासाठी व धन दौलत आहे, म्हणून महागड्या गाड्या खरेदी करून दिल्या जातात. परंतु त्याचा वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नियम समजावले जात नाहीत. उदाहरण:- दुचाकी चालवताना हेलमेट घालावे, असे न समजल्यामुळे सामान्य नियम पाळणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजातील लोकांना बळीचा बकरा बनवत जीवन जगावे लागते आहे. तसेच वाहने चालवताना गतीचा वेग किती असावा, हे बंधने तोडून माणसे अतिवेगाने वाहने चालू लागली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अगोदर मुंबईची जीवन म्हणजे धक्काधक्कीचे जीवन समजले जात, परंतु आता तीच परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येते. याचे मूळ कारण म्हणजे जग बदलत आहे.

तसेच वाहन चालवताना मद्यपान करू नये, दारू पिऊ नये, पूर्ण झोप घेऊन वाहने चालवली जावीत तरच सुरक्षित जीवनमान पद्धती येईल आणि आपण बदलेल याचा फायदा समाजासाठी नक्कीच दिसून येईल. वाहतुकीसाठी इतर साधनांचा देखील वापर केला जात असत परंतु आता तो वापर बदलताना दिसतो. नदीमधून, समुद्रमार्गे, प्राण्यावरून वाहतूक केली जात असे. परंतु आता फक्त रस्ते, लोहमार्ग व जलमार्ग यावरील साधनेबद्दल महागडे साधनांचा वापर करायला सुरुवात झाली. सामान्य माणसाला या साधनाच्या मदतीने वाहतूक करणे अशक्य झाले. म्हणून वाहतूक कमी झाल्याचे दिसून येते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational