हे ही दिवस जातील
हे ही दिवस जातील


खूप वर्षांपूर्वी, मी रस्त्याने जात असताना एक रिक्षाच्या पाठीमागे एक वाक्य लिहिलेलं पाहिलं, ते वाक्य होतं, "हे ही दिवस जातील." तर मला खूप आतुरता आणि रस निर्माण झाला होता की त्या वाक्यच अर्थ समजून घेण्यासाठी कि त्यांनी ते का लिहिलं असावं? मी धावतपळत त्या रिक्षाकडे गेलो आणि त्या रिक्षाचालकाला मी विचारलं, का ओ काका ठुमरी रिक्षामागे असा का लिहिला आहे बरं?
तेव्हा त्यांनी मला एक महाभारतातील उदाहरण दिलं, ते म्हणजे असा की महाभारत घडत असताना तेव्हा अशी एक वेळ आली होती की, अर्जुन खूप खचून गेला होता, नैराश्य निर्माण झालं होतं. तेव्हा अर्जुनाचा सारथी म्हणजेच "भगवान श्री कृष्ण" यांनी त्याला एक सांगितलं की, जा आणि त्या पाषाणावर असं काही लिही की, ते वाचल्यानंतर सुखी माणूस दुःखी होईल आणि दुःखी माणूस सुखी होईल.
तेव्हा अर्जुनने एक वाक्य लिहिलं ते म्हणजेच "हे ही दिवस जातील." तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, की कोणतेही दिवस, कोणताही काळ, कोणतीही वेळ, दीर्घकाळ राहात नाही, तर नैराश्य सोड आणि ऊठ नव्याने सुरवात कर.
तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य ते म्हणजेच चांगले दिवस असतील तर उतमात करू नका, आणि वाईट दिवस असतील तर खचून जाऊ नका. कष्ट करा कोणतेही दिवस सारखे राहत नाहीत.