Rajkumar Morge

Inspirational

4.0  

Rajkumar Morge

Inspirational

गुरुदक्षिणा

गुरुदक्षिणा

2 mins
274


     सप्टेंबर महिन्यातील 5 तारीख . बुधवारच होता त्या दिवशी . रोजच्याच प्रमाणे शाळेत पोहचलो . इयत्ता 8वी च्या काही विध्यार्थ्यांनी " happy teachers day " म्हणत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कुणी चॉकलेट ,कुणी चिवडा ,कुणी पेडा तर कुणी दुकानातील खाऊ गिफ्ट म्हणून दिला . 

        आपापल्या परीने ज्याला जमेल असे शाळेतील बदामाची पाने अन् त्यात काही फुलं टाकून दोरा गुंडाळून पुष्पगुच्छ बनवले .दुपारच्या वेळेत कार्यक्रमाचे नियोजन होते. 

        लघु मध्यंतर झाले असता मागून कुणी तरी खुणावत असल्याचे जाणवले मागे वळून बघतो तर काय इयत्ता 3 री तील आकाश होता . एका आशाळभूत नजरेने ,निरागस चेहऱ्याने ,एका हातात कागदात काही तरी लपवून दुसऱ्या हाताने मला खुणावत होता. " काय आकु ?" असे लाडक्या स्वरात मी त्याला विचारले, तेव्हा त्याने हातात खूप वेळचा दाबून धरलेला घामाने ओला झालेला कागद पुढे केला. त्याच्या चिकट झालेल्या हातावरून त्यात साखर आहे हे समजायला काहीच वेळ लागला नाही. 

 "कुणासाठी? "असे विचारताच 

"तुमच्यासाठी ",असे पटकन त्याचे उत्तर आले.

        मी त्याला जवळ घेत देण्याचे कारण विचारले असता तो गोंधळात पडला व दबक्या स्वरात म्हणाला ,

"गोट्याने कशी चॉकलेट तुम्हाला दिली मला द्यायची होती पण ....."

बोलताना मध्येच तो थांबला . मी त्याच्या पाठीवरुन मायेचा हात फिरवत त्याला बोलायला सांगितले तेव्हा तो म्हणाला,

"मही माय पैसे देईनं ,म्हणती पैसे नाहीत आम्ही गरीब आहेत नं ",असे तो शरमेनेच म्हणाला.

        मग त्याचे विषयांतर करून थोडा वेळ इतर विषयावर गप्पा केल्या .आता तो खुलून बोलू लागला तेंव्हा मी परत त्याला प्रश्न केला,

" तुला मोठे झाल्यावर काय व्हायला आवडेल?" तेंव्हा त्याने..

 "तुम्ही"

असे उत्तर दिले .

मी पार गोंधळात पडलो . त्याच्या या उत्तराचा मला अर्थ लावता येत नव्हता तेव्हा मला नीट समजण्यासाठी मी परत विचारले,

 "मी म्हणजे कसा?"त्यावर तो म्हणाला ,

"गुरुजी तुम्ही माझे कपडे नीट घातले का नाही ते पहाता , चांगले शिकविता ,मला जवळ घेऊन समजावून सांगता.... " 

मधेच मी त्याला थांबवत त्याला विचारले,

"तुझे बाबा नाही का घेत तुला जवळ." 

त्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी नकारात्मक मान डोलावत त्यानं ' नाही 'असं म्हटलं .

      मी थोडावेळ सुन्न झालो .थोड्या वेळाने जवळ न घेण्याचे कारण विचारले .तेव्हा तो फुंदके देत सांगू लागला ,

"माझा बाबा रोज दारू पिऊन येतो. घरात धिंगाणा घालतो .माझ्या आईला मारतो ,शिव्या देतो ,मला कधीच जवळ घेत नाही."

असे म्हणतच त्याने रडायला सुरुवात केली .    

      डोक्यावरुन हात फिरवत मी त्याला शांत केले .

मला पूर्णपणे उत्तर मिळाले नव्हते म्हणून मी त्याला

मध्येच अर्धवट राहिलेले उत्तर पुन्हा सांगायला लावले .त्यावर तो म्हणाला ,

"तुम्ही माझ्या सर्व गोष्टींचा विचार करता ,मला चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट कोणत्या हे समजून सांगता .माझे भले कसे होईल यासाठी प्रयत्न करता .मला असे बाबासारखे अनपड न रहाता शिकून सर व्हायचे आहे",

असे बोलताना त्याच्या डोळ्यात तेज आणि मेहनत घेण्याची जिद्द स्पष्टपणे दिसू लागली . आकाशने बापापेक्षा ही दिलेलं महत्त्व ऐकूण हृदय भरून आले. 

      सतत निःपक्षपाती पणाने ,कर्तव्याशी प्रामाणिक राहून केलेल्या सेवेची पावतीच जणू आकाशच्या मुखातून मला मिळाल्यागत झालं .त्या कागदातील गोड साखरीचे दाणे तोंडात चघळत शिक्षक दिनाची आकाशची भेट समाधानाने स्विकारत मी घंटा वाजविण्यास सांगितली.


Rate this content
Log in

More marathi story from Rajkumar Morge

Similar marathi story from Inspirational