STORYMIRROR

Chaitanya Bodkhe

Inspirational

3  

Chaitanya Bodkhe

Inspirational

गुरु शिष्याच्या पवित्र नात्यांचा अनुभव

गुरु शिष्याच्या पवित्र नात्यांचा अनुभव

3 mins
131

नमस्कार

ही कथा आहे एका पवित्र अशा गुरु शिष्याच्या नात्यांचे वर्णन करणारी........ एका विद्यार्थ्याने चे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरोप समारंभाच्या वेळेस त्याच्या शिक्षकांबद्दल व्यक्त केलेली एक हृदयस्पर्शी भावना........

नुकतेच इयत्ता आठवीतुन उत्तीर्ण होऊन गेलेल्या एका गुणवान विद्यार्थ्याने व्यक्त केलेली -हदयस्पर्शी प्रतिक्रिया.


गुरूवर्य......... श्री वैष्णव सर यांना माझा सप्रेम नमस्कार

सर मी इयत्ता सातवीत असताना तुम्ही चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झाले......

तेव्हा मला खूप आनंद झाला होता. तेव्हा, माझे वडील म्हणाले होते की ,तुम्ही खरंच भाग्यवान आहात कारण तुम्हाला वैष्णव सरांसारखे महान गुरू लाभले. 

सर तुम्ही शाळेत आल्यापासुन या शाळेत बरेच मोठे बदल घडले. सर तुम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेण्यास सुरुवात केली. 

सर मी जेव्हा आठवीत होतो तेव्हा तुम्ही मला Navneet Speakwell English नावाचे एक पुस्तक दिले. सर त्यादिवशी मी खूपच आनंदी होतो कारण मला पहिल्यांदा इंग्रजीचे पुस्तक तुम्ही दिले . त्यादिवशीचा दिवशीचा माझा आनंद हा गगनात न मावणारा होता.‌ मी त्यादिवशी घरी घाईघाईने लवकर आलो. घरी आल्यावर मी आई-वडिलांना तुम्ही दिलेले पुस्तक दाखवले. तेव्हा वडील मला म्हणाले, बाळा आता तू मन लावून अभ्यास कर, सरांना आनंद होईल. आणि मग मी मन लावून अभ्यासाला सुरुवात केली.

 पुढे काही दिवसांनी तुम्ही English Sentences Writing Competition ही स्पर्धा घेतली. ही स्पर्धा पाचवी पासून आठवी पर्यंत होती. त्यामध्ये बरेच विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते. मी पण त्या स्पर्धेत आनंदाने सहभागी झालो. या स्पर्धेसाठी अर्धा तास वेळ होता. या स्पर्धेत मी माझ्या आत्मविश्वासाने सहभागी झालो होतो.

 पुढे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या स्पर्धेचा निकाल लागणार होता. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, मला असे कळले की, या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला होता. जेव्हा मी स्पर्धेत सहभागी झालो होतो तेव्हा तर मला विश्वासच नव्हता त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक येईल परंतु या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला. तेव्हा तर मला खूपच आनंद झाला. परंतु सर या सर्व यशाचे श्रेय मी तुम्हाला देतो कारण तुमच्या मार्गदर्शनाने माझ्यातील आत्मविश्वास जागा झाला. तुम्ही दिलेल्या एका पुस्तकामुळे मला हे यश मिळाले. मी या स्पर्धेत 162 अचूक वाक्य लिहू शकलो. एक विद्यार्थी कसा असावा हे तुम्ही मला शिकवले......!

सर तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे आम्हाला N. M. M. S. या परीक्षेच्या माध्यमातून दाखवून दिले. या परीक्षेसाठी आपल्या शाळेतून दहा विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथमच तुमच्या अफाट प्रयत्नाला थोडेफार यश आले. सर त्या परीक्षेच्या काळात तुमची विद्यार्थ्यांसाठीची अपार मेहनत मला दिसून आली.

 सर तुम्ही मला वेळोवेळी प्रोत्साहन केले. सर मला भाषणाची फार आवड होती. परंतु मला प्रोत्साहन किंवा मदत करणारे माझ्या वडिलां शिवाय दुसरे कोणीही नव्हते. परंतु तुम्ही माझ्याकडे असलेल्या भाषणाच्या अंधारात पडलेल्या कौशल्याला प्रकाशाची वाट दाखवली. तुम्ही मला प्रत्येक क्षणाला मदत केली. खरंच सर,मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील.....तुम्ही माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले. मी तुमचा आयुष्यभर मनापासून आभार मानतो आभार मानत राहील. 

सर खरंतर मला असं तुमच्या जवळच राहायचे होते परंतु आता पुढील शिक्षणासाठी मला तुम्हाला सोडून जावे लागणार आहे. तरीही तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने सतत तुम्ही माझ्याजवळच असणार व आहेत. सर तुमच्या बद्दल मला सांगायचं तर शब्द कमी पडतील. सर मी खरंच भाग्यवान समजतो की मला तुमच्या सारखे महान गुरू लाभले. सर तुम्ही फक्त दोन वर्षात माझ्या जीवनात मला एक वेगळा मार्ग दाखवला. सर तुमच्यामुळे मला वाचनाची खूप आवड लागली. सर तुम्ही मला दांडेली ची वाघीण नावाचे एक शिकार कथे चे पुस्तक दिले होते. त्यातील कथा मला खूप आवडल्या.

 सर तुमचेआणि माझे नाते हे अतूट आहे कधीही न तुटणारे. सर तुमचे माझ्यावर इतके ऋण आहेत की मी ते कधीही फेडू शकणार नाही. सर तुम्ही माझ्या जीवनात मला एका महान गुरूच्या रूपात भेटले.

 धन्यवाद सर......मी तुमचा फार फार आभारी आहे सर तुमच्या सारख्या महान गुरुला माझे कोटी-कोटी धन्यवाद....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational