गुरु दक्षिणा...
गुरु दक्षिणा...
'समीर पाटील ' हे मूळचे वैतरणाचे . ते त्यांच्या वयाच्या २७ व्या वर्षापासून विरार मध्ये ' जिल्हा परिषद ' शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते . आणि ते त्यांच्या घरातही मुलांची शिकवणी घ्यायचे . त्यांचे घर वैतरणातील ' फणसपाडयात ' आहे . त्यांचे घर साधे विटांचे अाहे . अजूनही तिथेच राहतात . त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघे जण राहतात . मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली . मुलाचं लग्न ठरलं होतं . पण घर साधं असल्यामुळें मुलीकडचे लग्नाला तयार नव्हते . त्यांना कधीच वेळेवर त्यांचा पगार मिळायचा नाही . आणि ते घरीच ज्या मुलांची शिकवणी घ्यायचे त्यांच्याकडून सुद्धा ' फी ' घ्यायचे नाही . त्यांचं तत्त्वच होतं -
"जितुके काही आपणासी ठावें|
तितुके हळूहळू शिकवावे|
शहाणे करून सोडावे|
बहुत जन||"
त्यांचा स्वभाव हा मूळातच शांत . परंतु , अभ्यासाच्या बाबतीत मात्र. कडक शिस्तीचे होते . त्यांना अभ्यासाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला आवडायचा नाही .
त्यांची पत्नी सोनिया सतत आजारी असते . त्यांचा मुलगा सुधीर नोकरी करतो . बोईसर मध्ये " ठाकूर टूर्स अँड ट्रॅव्हल्स " या कंपनीमध्ये कामाला आहे . सुधीरचा स्वभाव खूप तापट . त्यांचे सर्व मित्र चांगल्या- चांगल्या घरात राहतात . त्याला त्याच्या घराची, आई-वडिलांची लाज वाटते .
एके दिवशी अचानक सुधीरची आई आजारी पडली . सुधीरचे बाबा पण घरी नव्हते . म्हणून आईने त्याला औषध आणायला सांगितली . तर तो आईला बोलला " काय गं , तुझी नेहमीची नाटक आहेत . कधी हे आण तर कधी ते आण . मी वैतागलो आहे तुम्हाला . मला तुम्हां दोघांचा कंटाळा आला आहे . एक चांगलं घर असतं तर माझं लग्न तरी झालं असतं . माझ्याबरोबरचे सगळे मित्र किती चांगल्या - चांगल्या घरात राहतात . आणि मी बघ . बाबा एवढ्या मुलांची शिकवणी घ्यायचे पण कधी कोणत्या मुलाकडून ' फी ' घेतली नाही . जर त्यांनी ' फी ' घेतली असती तर आपणही चांगल्या घरात राहिलो असतो . बाबांनी आपल्यासाठी काय केलं गं ? एवढी वर्ष शिक्षकाची नोकरी केली पण त्यांना एक चांगलं घर घेता आलं नाही . कधी माझे आणि ताईचे हवे-तसे लाड पुरवले नाही . त्यांनी कधी तुला कोणता सणाला साडी घेतली नाही . " सोनीया आणि सुधीरच बोलणं समीरराव ऐकतात . परंतु ते काही न बोलता घरात येतात .
दुसऱ्या दिवशी सुधीर त्याच्या नेहमीच्या वेळेआधीच कामाला जातो . कारण त्याच्या कंपनीत मीटिंग असते . त्यामुळे तो घरातून डबा घेऊन न जाता कामाला जातो . सुधीर डब्बा न घेऊन गेल्यामुळे तो बाहेरच काही अरबट-चरबट खाईल आणि पोट बिघडेल ह्या काळजीमुळे त्याची आई समीर रावांना त्याला डब्बा घेऊन जायला सांगते . त्याच्या जेवणाची सुट्टी १:०० वाजता होते . पण समीर राव १२:३० च्या आधीच त्याच्या कंपनीच्या बाहेर येऊन उभे राहतात . समीरराव सुधीरला फोन करतात पण, तो मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याचा फोन सायलेंटवर असतो . आजू बाजूला बसायला काहीच नसते . म्हणून भर उन्हात उभे असतात . तिकडच्या ' सिक्युरिटी गार्ड ' ने त्यांना विचारले , " तुम्ही केव्हा पासून इथे उभे आहात . तुमचं कोणाकडे काम होतं का ? " तेव्हा समीर राव बोलले , " हो माझं काम होतं . म्हणून मी इथे आलोय . माझा मुलगा सुधीर पाटील या कंपनीत कामाला आहे . आज सकाळी त्याची मिटींग होती . म्हणून तो जेवणाचा डब्बा न घेऊन जातात कामाला आला . म्हणून मी त्याला डबा देण्यासाठी आलो आहे . " तेवढ्यात ' सिक्युरिटी गार्ड ' बोलले , " मीटिंग संपायला उशीर होईल . आज मीटिंग संपल्यावर सगळेजण ठाकूर सरांचा वाढदिवस असल्यामुळे बाहेर जेवायला जाणार आहेत . तुम्ही गेलात तरी चालेल . " परंतु , समीर राव घरी न जाता तिथेच उभे राहतात .
काही वेळाने सुधीर , त्यांचे सर व कंपनीतील काही माणसे एका गाडीतून बाहेर जेवायला निघतात . तेवढ्यात सुधीरची नजर त्याच्या वडिलां कडे जाते . तो स्वतःच्या वडिलांकडे रागाच्या नजरेने पाहत असतो . तेवढ्यात सुधीरच्या सरांची म्हणजे ' सुहास ठाकूर ' यांची नजर सुधीरचा वडिलांकडे जाते . ते पाटील सर म्हणून गाडीतूनच हाक मारतात . ते गाडीतून उतरून त्यांच्या जवळ जातात . ते सुधीर रावांना विचारतात , " तुम्ही तेच पाटील सर ना जे माझे क्लास घ्यायचात ? "
समीर राव - " हो . तु सुहास ना . माझा मित्र ' अक्षय ठाकूर ' चा मुलगा . "
सुहास - " हो . सर कसे आहात तुम्ही ? एवढे वर्ष कुठे होतात ? तुमचा काही पत्ता नाही ? आणि तुम्ही कसे आहात सर ? "
समीर राव - " हो.. हो.. हळूहळू.. हळूहळू . एकामागून एक प्रश्न . मला बोलायची संधी तरी दे . "
सुहास - " सॉरी सर . बोला तुम्ही ".
समीर राव - " मी एकदम मस्त . तू कसा आहेस ? "
सुहास - " मी मस्त ."
समीर राव - " मी वैतरणातच आहे . आणि आताही तिथेच राहतो . तुझा दहावी झाल्यानंतर काहीच पत्ता नव्हता . मला वाटलं विसरलास आम्हाला . "
सुहास - " नाही सर . मी तुम्हाला कसा विसरू शकतो . तुम्ही तर माझे गुरु आहात . मी दहावी झाल्यानंतर शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो . मी सात वर्षे अमेरिकेतच होतो . नंतर बाबांना व्यवसायात मदत करण्यासाठी विरारला कायमचा स्थायिक झालो . "
समीर राव - "मी इथे माझ्या मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी आलो आहे . नंतर समजलं की तुमचं जेवण बाहेर होणार आहे . "
सुहास - " तुमचा मुलगा इथे ! " (आश्चर्यचकित होऊन )
समीर राव - " हो. माझा मुलगा सुधीर पाटील इथे कामाला आहे . तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा . बोलण्याच्या स्थितीत विसरूनच गेलो . "
सुहास - " धन्यवाद सर . तुम्हाला कोणी सांगितलं आज माझा वाढदिवस आहे ? "
समीर राव - " इकडच्या सिक्युरिटी गार्ड ने "
सुहास - " सर , मला तुम्हाला एक गोष्ट द्यायची आहे . "
समीर राव - " कोणती ? "
सुहास - " तुमची गुरू-दक्षिणा . सांगा ना सर तुम्हाला काय हवीआहे गुरू-दक्षिणा . "
सुहास तिथे असलेल्या सर्वांना सांगतो..
" मला मुळातच पहिल्यापासून अभ्यासात रस नव्हता . अभ्यास म्हणजे माझा जणू शत्रू असं मला वाटायचं . मी शाळा बुडवून फिरायला जायचो . मित्रांच्या घरी जायचो . मी आठवीत नापास झालो . तेव्हा बाबांनी मला जबरदस्तीने सरांकडे क्लासचा पाठवले . मला क्लासला जाण्याची इच्छा मुळीच नव्हती . तरी मला आई जबरदस्तीने क्लासला सोडायला यायची . मला सरांनी पहिल्याच दिवशी गणिताचा अभ्यास दिला . मी तो पूर्ण न करताच दुसर्या दिवशी क्लासला गेलो . मी अभ्यास न केल्यामुळे मला सरांनी खूप मारलं . सर पहिल्यापासूनच अभ्यासाच्या बाबतीत कडक शिस्तीचे . मला त्यांचा खूप राग आला होता . त्यांचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती . पण काही दिवसांनी माझ्यात अभ्यासाची गोडी निर्माण झाली . सगळे विषय सोपे वाटू लागले . काही दिवसांनी मला अभ्यास केल्याशिवाय चैन पडत नसे . मी दहावीत आमच्या शाळेत पहिला आलो . तो आणि केवळ आणि केवळ पाटील सरांमुळे . माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान वाटला . माझी दहावी झाल्यानंतर माझे वडील सरांना माझी ' फी ' देण्यासाठी गेले . परंतु , सरांनी माझी ' फी ' घेतली नाही . सर , मला माझी गुरु दक्षिणा द्यायची आहे . प्लीज सांगा ना काय देऊ ? "
समीर राव - " काही नको रे . तू खूप मोठा झालास हीच माझी गुरु दक्षिणा . तुझ यश पाहून मला खूप आनंद झाला . असाच यशस्वी हो . "
सुहास - " सर , तुम्ही जिथे राहतात ना तिथेच आहेत ना अजून ? "
समीर राव - " हो ."
सुहास - " मला कधी तुमच्याकडे येण्याचा योगच आला नाही पण आता नक्की येईल . काकूंना सुद्धा भेटता येईल ."
समीर राव - " हो.. नक्की ये . "
सुहास - " सर , मला माझी गुरु दक्षिणा देण्याची हीच संधी आहे ."
समीर राव - " कोणती ? "
सुहास - " सर , आमचे विरारला काही फ्लॅट्स आहेत . त्यातला एक ' टू. बी.एच.के. ' मी तुम्हाला देऊ इच्छितो . सर , प्लीज नाही म्हणू नका . "
समीर राव - " तुला माहित आहे मी कोणा कडून कधीच काही घेत नाही . पण, तु एवढा आग्रह करतोस म्हणून हो म्हणतोय . "
सुहास - " सर , मग सुधीरच लग्न केव्हा करताय ? "
समीर राव - " हो .. करायच आहे . पुढच्या एक-दोन वर्षात करू . "
सुहास - " सर , लग्नाचा सर्व खर्च मी करेन . "
समीर राव - " नको रे एवढं . "
सुहास - " सर , हे काहीच नाही . तुम्ही माझ्यासाठी जे केले आहे. त्या पुढे हे कमीच आहे . सर , मी आज सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी देणार आहे . तर तुम्ही पण , चला ना जेवायला आमच्यासोबत . "
समीर राव - " नको रे.. जा तुम्ही "
सुहास - " सर ,चला तुम्ही . तुमच्या शिवाय आम्ही जाणार नाही . " (शेवटी विनवणी करून सुहास त्यांच्या सरांना घेऊन जातो . )
हा सर्व प्रसंग बघून- ऐकून सुधीरच्या डोळ्यात पाणी येते . घरी जाऊन सुधीर त्याच्या वडिलांची माफी मागतो . पाटील कुटुंब काही दिवसांनी विरार ला 'फूलपाड्यात ' राहायला जातात. सुधीर च लग्न होतं . त्याची पत्नी साक्षी घरात येते .
" आपण केलेल्या कर्माची फळ याची आपल्याला नक्कीच मिळतात... "
