Nagnath Balte

Inspirational

1.1  

Nagnath Balte

Inspirational

गुंंडप्पा

गुंंडप्पा

2 mins
10.5K


गुंंडप्पा गेला. या दोन शब्दाने सारा गाव हळहळला. गुंंडप्पा कोण होता, काय होता, तो कोणत्या जातीचा होता, त्याचे आई वडील कोण होते, त्याला मूल बाळ होते की नाही याचा गावाला कधीच थांगपत्ता लागला नाही. किंवा गवानेही त्याचे कधी सोयरसुतक पाळले नाही. तो होता हीचा एक स्वछ वस्तुस्थिती होती. अशी माणसंं जेंव्हा केव्हा त्यांची भुमी सोडुन जातात किंवा ते ज्या गावात वावरत असतात तेव्हा कोणीतरी लहान असतच, तसे आम्हीही लहानच होतो. गावातली त्या वेळची आमच्याबरोबरची बरीच मुले लहान होती. तो गावात आलाच मुळात गावाला वळण लावायाचे म्ह्णून. वळण म्हणजे गावाला वारीसाठी न्यायचे होते. म्हणून गावाला केवळ दोनच सण अधिक महत्त्वाचे झाले ते म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. या दोन्ही वारीच्यावेळी गावातल्या प्रत्येक उंबर्यावर जाऊन तो वारीसाठी दान मागायचा. जमेल तसे गावानेही त्याला दहा पाच दिले. पण त्याने कधीच कमी दिले त्याला वाईट आणि जास्त दिले त्येला चांगला म्हणाला नाही.त्याच्या दृष्टीने सगळेच होते आणि त्याच्या तत्त्वात बसले नाही तर सगळेच वाईट होते.

त्याचे साधे तत्त्व होते ते म्हणजे चोरीमारी न करणे, शिव्याशाप न देणे, एकोप्याने राहणे आणि महत्त्वाचे म्हणजे वारकरी असणे. या तत्त्वात जो बसला नाही त्याला तो कधीच बधला नाही. कधीतरी गावात अशी चर्चा झाली की एका कुटुंबातील महिलेने त्याला त्याने भांड्याला स्पर्श केला म्हणून चीड चीड केली होती. तर गुंंडप्पमामा कधीच त्या घरात पाय ठेवला नव्हता. तो तसा गावात कुणाचाच नव्हता आणि तसा सगळ्यचाच होता. भूक लागली की तो सगळ्यांंचाच घरात शिरून खात होता. त्याच्यासाठी सगळीच गावतली सगळीच घरे त्याची होती. कुठलही काम करीत असताना चकोट करावे अशी त्याची धारणा होती. गावात हरीनाम सप्ताह आला की पंचक्रोशीत त्याचे भजन चर्चेचा विषय होता. यवर्षीचा अखंड हरीनाम सप्ताह त्याच्याशिवाय झाला ही गोष्ट गावालाही सजह नाही स्वीकारता आली नाही. तो अचानक असा तोंडावर निघून गेला आणि गावाला चटका बसला. असाच गावकडून शहरात येत असताना गाव लगबगीने त्याच्या मयतीला निघत होता. कुणाचाच नसलेला माणूस असा सर्वांचाच झाला होता. म्हणून त्याच्या जाण्याचे अधिक वाईट वाटले. माणसं आयुष्यात कधीकधीना कधी मरतातच पण काही काही माणसाचा मृत्यू सहज स्वीकारता येत नाही. त्यामुळेच गुंंडप्पा गेला याने सर्वांच्याच चेहर्यावर सुतक आले.


Rate this content
Log in

More marathi story from Nagnath Balte

Similar marathi story from Inspirational