Shrirang Ghodsar

Tragedy

4.7  

Shrirang Ghodsar

Tragedy

गणेश चतुर्थी: उत्सव कि सण?

गणेश चतुर्थी: उत्सव कि सण?

2 mins
603


गणेशचतुर्थी हा सण फार पूर्वीपासून महाराष्ट्रात साजरा करतात. गणपती हे दैवत न आवडणारा मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही. पुष्कळ लोकांना विविध देव आवडत नाही(आता देव हा काही आवडी निवडीचा गोष्ट नाही). जसे काही लोक शंकराला नाही मानत तसेच काही विष्णूला नाही मानत!! पण गणपती बद्दल असे नाही आहे. तो सगळ्यांनाच भावतो,आवडतो. बुद्धीची देवता ना ती, आवडणारच!!


पण या अश्या पवित्र,गोड देवतेचा आपण (काही लोक?) अपमान करतो आहोत. संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली आपण अशा मंगलमय सणाचे विद्रुपीकरण करायला ठेपलो आहोत. माझ्या माहितीनुसार गणपती हा सण उत्सव(इंग्लिश मध्ये सो कॉल्ड इव्हेंट) कधीच नव्हता. तो एक छानसा सुंदर घरगुती सण होता(उत्सव नव्हेच).. सण आणि उत्सव मध्ये जमीन आस्मान चा फरक आहे. ज्या दिवशी सणाला दिखाऊपणाची,पैशाची झालर चढवल्या जाते, त्या दिवशी तो सण उत्सव(इव्हेंट) होतो.

मुळात काही लोक संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली जो गळा काढतात, त्यांनी परत एकदा इतिहास वाचावा. मला नाही वाटत जो सार्वेजनिक गणेश उत्सव आपण परंपरा म्हणून साजरा करतो, तो 150 वर्षांपूर्वी तरी असावा! मुळात घरगुती गणपती ला सार्वेजनिक केला तो टिळकांनी!!

टिळकांनी गणपती हा सार्वेजनिक केला त्याला कारणं पण तशीच होती:

कारण 1: आपण पारतंत्र्यात होतो.

कारण 2: स्वातंत्र्यासाठी जी एकी लागते ती मुळात आपल्याकडे नव्हती(अजूनहि नाही आहे!)

कारण 3: समाजात सर्वधर्मसमभाव व्हावा!

हि काही कारणं मी उधाहरण म्हणून दिली. अशी अनेक कारणे होती. पण आपण लोक सगळे विसरत चाललो आहोत. मूळ कारणे राहिली बाजूला आणि इतक्या सुंदर सणाचे आपण बाजारीकरण करायला निघालो आहोत.

अहो सण म्हणजे काय फक्त जोरात डीजे वाजविणे नव्हे, गाडी सुसाट वेगाने पळवून कर्णभधीर होई पर्यंत हॉर्न वाजविणे नव्हे, किंवा ढोल ताशे बडवणे नव्हे. तर सण म्हणजे आपली जी खरी परंपरा आहे ती जोपासणे! किती उच्च दर्जाच्या लोकांचा इतिहास लाभला आहे आम्हांस पण आपण दळभद्री लोक, दळभद्रीच राहू!! अजून हि वेळ नाही गेली आहे आताही आपल्याला सुधारायला वाव आहे.


अधोगतीच्या मार्गावर तर आपण लागलोच आहो. परंपरेच्या नावाखाली वाटेल ते ना करता थोडासा सद्सदविवेक बुद्धीने विचार करून जर आपण सण साजरी करायला शिकलो तर आपण आपला समाज प्रगती पथावर नेऊ शकू. नाही तर आपल्या समाजाची जी अधोगती पुढच्या 500 वर्षात होणार आहे ती पुढील 50 वर्षातच होण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना माझ्या सकट असेच चांगले विचार करण्याची बुद्धी देवो हीच श्री चरणी प्रार्थना!


ज्यांना माझा लेख आवडेल त्यांनी माझी स्तुती करावी वगैरे असे काही नाही. पण हा ज्यांना नाही आवडला त्यांनी कृपया करून मी नास्तिक आहे असे समजू नये, एक "बालिश" लेखक म्हणून माझा कडे कानाडोळा करावा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy