Shrirang Ghodsar

Others

4.3  

Shrirang Ghodsar

Others

दक्षिण आफ्रिकेची स्टेन गन

दक्षिण आफ्रिकेची स्टेन गन

2 mins
274


फालाबोरवासारख्या छोट्याश्या गावातून दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात आलेला बहुतेक हा पहिला खेळाडू. शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, बॉलिंग रनपमधे दहशत होती. एकतर दोन्ही प्रकारचे स्विंग, चेंडू जुना झाला म्हणून रीवर्स स्विंग आणि ते पण ताशी 140 पेक्षा अधिक गतीने, गुपचूप सिंगल काढून नॉन स्ट्राईकला जाणं हाच एक पर्याय उरतो फलंदाजाजवळ.


१७ डिसेंबर २००४ ला इंग्लंडच्या विरुद्ध याने कसोटीमध्ये पदार्पण केलं. मार्कस ट्रेसकोथिक हा याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला पहिला बळी. कसला क्लीन बोल्ड केला ट्रेसकोथिकला. जबरदस्त वेग आणि स्विंगमुळे ट्रेसकोथिकला कळलेच नाही की कधी आपल्या यष्ट्या वाकुल! यू ट्यूब वर आहे याचा विडिओ. 


मला सतत असे वाटत आलं आहे की अँडरसनपेक्षा डेल स्टेन हा काकणभर सरसच आहे. याचं कारण असे आहे की अँडरसनने फक्त इंग्लिश खेळपट्ट्यांवरच जिथे चेंडू अति स्विंग होतो अशाच ठिकाणी बळी मिळवले आहेत. या उलट या माणसाने आशियन पाटा खेळपट्ट्यांवर (Galle, Dubai आणि Nagpur) जिथे अजिबात स्विंग मिळत नाही तिथेसुद्धा बळी मिळवत सामने दक्षिण आफ्रिकाला जिंकून दिले आहे.


2011 च्या विश्वचषक मध्ये दक्षिण आफ्रिका सोबत जो सामना आपण हरलो तो ह्याच माणसामुळे. एका हाती सामना फिरवला साहेबांनी. याने कसोटी क्रिकेटमध्ये 22.95 च्या सरासरीने 439 बळी मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका कडून कसोटी मध्ये गोलंदाजी केलेल्यां पैकी तो अव्वल आहे. १०० च्या आसपास कसोटी सामने खेळून गोलंदाजी मध्ये इतकी कमी सरासरी असणे म्हणजे खायचं काम नाही. डेल स्टेन ला बघितलं की मला न्यूझीलंड च्या शेन बौंडची आठवन होतं. तो पण एकदम खतरा गोलंदाज होता. (त्याच्यावर पुढे कधी तरी लिहू)


मोहम्मद हाफीज आणि अश्या असंख्य फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा हा माणूस ५ ऑगस्ट २०१९ रोजी कसोटी क्रिकेट मधून खांद्याच्या दुखापतीमुळे निवृत्त झाला. दुखापतीमुळे याचे २ वर्ष वाया गेले नाहीतर आज ग्लेन मॅग्राचा सर्वाधिक कसोटी बळीचा (वेगवान गोलंदाज) विक्रम ह्याने कधीच मोडला असता जो आता अँडरसनने मोडला आहे.


Rate this content
Log in