STORYMIRROR

Sanveda 05

Inspirational

3  

Sanveda 05

Inspirational

गीतेतून शिकले....

गीतेतून शिकले....

3 mins
181

ह्या महामारीने खूप काही शिकवलं नाही? जन्म आणि मृत्यू ह्या दोन विरोधाभासी शब्दांच अंतर त्याने मापलं. आयुष्य हे किती अनमोल आहे हे आपल्याला समजलं. 

माझ्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त मरणाची वाट पाहात जिझनं. मला समजेना आपण कितक्या खसका का खातो जर आपला अंत निश्चित आहे. मी विचारांच्या दुनियेत बुडून गेले होते. ह्या विचारांना दिशा दाखवताना मी श्रीमद्भगवद गीता वाचायला सुरुवात केली. आधी अध्यात्मिक ग्रंथ वाटणारी गीता कधी दैनंदिन जीवनात माझी जोडीदार बनली मला कळलंच नाही. अजून माझी गीता पूर्ण वाचून झाली नाही पण अर्धी गीता देखील ज्ञानाचा सागरच. 

मला वृंदावनातला मधुसूदन मला समजला.

मनुष्य प्राणी जो अत्यंत चपळ, बुद्धिमान आणि सर्वगुण संपन्न आहे पण तरी देखील तो अस्वस्थ आहे. भावनांच्या नदीत तो नकळत पणे उदी टाकतो आणि कधी समुद्रात पोहोचतो कळतच नाही. ह्या भावनांच्या जाळ्यात आज प्रत्येक अर्जुन अडकले आहेत. त्यांना उपदेश आज देखील भगवंत गीतेच्या माध्यमातून लोकांना देतात.

.....

एक काळ असा होता की माझ्यासाठी नाती महत्त्वाची होती. आपली मित्रमंडळी आपल्याबरोबर आयुष्य भर राहतील हा माझा गोड गैरसमज एका प्रसंगात नष्ट झाला. मी अनेक माणसं गमावली आणि त्याबरोबर गमावला विश्वास. मी रडले. त्यांच्या जाण्याचा शोक केला. पण आज मागे वळून पाहते तेव्हा समजतं मी किती मूर्ख होते. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात काही अगदी जवळची बनतात भावनिक स्तरावर आपण अडकत जातो. त्यांच्यासाठी जगतो. पण खरंच हे आयुष्य आहे का? कोण आपल्या आयुष्यात येतं, कोण जातं, आपल्या हातात मात्र काहीच नसतं. त्यांना थांबवणं देखील कधी अवघड बनत. मग आपण इतके निर्बल आहोत का? आपल्या हातात जरी त्यांना थांबवण्याचा पर्याय नसला तरी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करण्याचा पर्याय नक्कीच आहे. आपण जन्म वेळी रिकाम्या हाताने येतो, चूक. आपण प्रेम घेऊन येतो. प्रेम आपल्या अस्तिवापासून आपल्या अंता पर्यंत चिरंतर राहतं. आपला आत्मा, टी ज्योत आणि परमात्मा ह्यांना बांधणारा ढग म्हणजे प्रेम. आपल्या हातात त्या व्यक्तीला थांबवण्याचा पर्याय नसला तरी त्याला आनंद आणि ज्ञान देण्याचा पर्याय सदैव राहील. प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला सोडून जाणारच आहे. राहतात त्या फक्त आठवणी. मग का नाही त्यांना सुंदर बनवावे? आहे तो क्षण सुवर्ण करणे देखील एक कलाच. मग त्या कलेचा आश्रय घ्यायला काय हरकत आहे. कृष्णा देखील वृद्वानात कायम राहिला नाही पण आज देखील तिथे त्याचा गंध दरवळतो. आपण फक्त आत्मा, प्रेम आहोत. आपण प्रत्येकाला आनंद नक्कीच देऊ शकतो. मी आज कोणी नवीन व्यक्ती भेटली तर त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करते. त्या कडून ज्ञान घ्यायला मी नेहमी उत्सुक असते. प्रेम करते, निरपेक्ष. मज ठाऊक आहे की ती व्यक्ती काही दिवस माझ्यासोबत आहे. म्हणून त्या नात्यात मी गुंतनं सोडून दिलं.

...

मला गीता वाचून माझ्या दुःखाचं कारण कळलं. आपण नकळतपणे किता अपेक्षा ठेवतो. मी देखील ठेवायचे पण हळू हळू समजलं की अपेक्षा आपल्या गुंतवतात. आपण त्या पूर्ण नाही झाल्या तर चिडतो, नाराज होतो. पण जर अपेक्षाच ठेवल्या नाही तर. मान्य, हे इतकं सोपं नाही पण प्रयत्न करायला हरकत काय. आणि अपेक्षा ठेवण्याइतपत आपण खरंच समर्थ आहोत का? आज मी कमीत कमी अपेक्षा ठेवते. अपेक्षारहित जगण्याईतकी सिद्धी मी प्राप्त नाही केली पण माझं आयुष्य नक्कीच ठीक करू शकते.

....

श्रीमद् भगवद्गीता वाचताना मी जाण्याचे कारण जाणले. मी कोण आहे ? माझं ह्या जगात अस्तित्व काय आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. मी स्वतःला पुन्हा भेटले. त्या भगवंतांना जाणले, त्याच्या निकट गेले. आणि ते आहे ह्यावर विश्वास बसला. ते माझ्या प्रत्येक कृतीत आहे. माझ्या भवनांमध्ये आहे. मी ते नाहीये पण मी त्याच्यापासून वेगळी नाही. मी त्यांचाच अंश आहे. आणि ते परमात्मा प्रेम आहे. पवित्र आणि निरागस अगदी राधारणी आणि श्रीकृष्ण यांच्यासारखे ते अपल्या मानाच्या वृंदावनात फुलत आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational