Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

गावं हवं अगदी माझ्या स्वप्नातलं...

गावं हवं अगदी माझ्या स्वप्नातलं...

2 mins
134


पुन्हा तेच माझं मला गाव ह्वं, निसर्गानं भर- भरभरून दिलेलं ... आपुलकीनं जिव्हाळ्यानं गुण्यागोविंदानं एकत्र नांदणार.. होणारा अन्याय पंचायती समोरं (गाऱ्हाण) मांडूनंच सोडवणार... जातीपातीच्या राजकारणाला कधीच थारा न देणारं. दुस-यांच्या सुख दुःखात सहभागी होणार. प्रगतीसाठी खांद्याला खांदा देणारं...मूठभर पेरावं आणि पसाभर घ्यावं एवढी ताकद फक्त मातीचीचं हे जगाला ओरडून सांगणारं.पुन्हा तीच माणसं ह्वीत राकट, रांगडी, मातीशी इमान बाळगणारी, गुरं ढोरं, पोरं सोरं , मोठं खट्लं... तीच काळी आमटी भात, बुक्की मारून कांदा फोडून खाणारा मराठ्मोळी गडी. पापड्या- कुरडायातंच समाधान माणनारा. डोईवर पाटी भाकरी, त्यात दुध हाय गाईचं म्हणणारी. चंदण्याच्या पाटावरी मोत्याच्या ताटावर सोन्याचा घास तुला भरविते म्हणनारी स्वनाळू अर्धांगिनी., असेल त्यातच सुख माणनारी ...सुखासोबत दु{खही वाटून खाणारी थोरांसहीत बाल गोपाळाची आई मला दिसायला ह्वीत. घरोघरची घर - घरं संपून घरास त्यांच्या घरपण ह्वं. तुडूंब भरलेला ओढा ती खळखळ्णारी नदीत माय मावली धूणं धुतांना दिसायला हवं..


आजीच्या मांडीवर तान्हुलं बाळ हसायला ह्वं.पुन्हा नव्यानं आजीबाईचा बटवा बोलायला ह्वा. शिकून सवरून झालेली माणसं वृद्धाश्रमात , आणि चिमुकले बाळ पाळणाघरात नसायला ह्वे. जगणं आलं की भोगण आलंच म्हणणारी मानसिकता आता बदलायला ह्वी. सुर्याकडं बघून बरोबर वेळ सांगणारी, पशू-पक्ष्यांची भावना, भाषाही ओळ्खणारी तरूणाई ह्वी. परिस्थीती बदलण्याची धमक ठेवणारी मनगटे ह्वी. संकटावर मात करण्यास आधुनिक शेती करावयास ह्वी. तीन पिढ्यांचे प्रतीनिधी सोबत अंगणात जेवतांना मला दिसायला ह्वें. हतबल होवून हातपाय खोड्णारी माणसं म्हणजे गाभ्यात सुकणारी कणसंच असतात ... त्यांच जिण जणु अवघड ठिकाणचं दुःखणं , सांगताही येईना आणि सहनही होईना.. रडत कुढत , चरफड्त कसही जगतात , अबोल राहून जिवनयात्रा अकाली सपवतात.. वाट्लं तोवर चालत राहतात.. असह्य झालं की तिथंच थांबतात. धरणं बांधली, जंगली तोडली, चंद्रावरची वारीही झाली . एवढं मात्र नक्की की , राहून गेलं बांधने समाजमने. फेसबुक, व्हाट्सं अप वर मित्र अमाप झाले . परंतु माळरानावर चिंचा बोरं खातांना.. कैरीसोबत न्याहारी करणारे , तासंनतास नदीत डूंबणारे संवगडी मात्र हरवून गेले.


आता एक माऊसच्या क्लीकवर माझ्या गावाचं चित्र बदलायला ह्वं. आधुनिकतेचा स्विकार करून , शेतीपुरक व्यावसायाची सुरूवात पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल. पाणी आडवा , पाणी जिरवा योजना अंगीकारू, सरकारी मदतीविनाही श्रमदानात विकास घड्वतील. शेतकरी माझा काळ्या आईची ओटी भरील. पुन्हा नव्याने हिरवं स्वप्न साकार करील . लेकीबाळी सुखानं नांदायला जाव्यात. आपलं दुःख शेजा-याने डीलिट करायला ह्वं. स्वतंच्या अंतःर्मनातलं सुख कौपी करून दुस-यांच्या मनात अलगद पेस्ट करायला ह्वं... दुस-यांच्या पायात खूड्लेला काटा काढ्णारी मानसिकता पुन्हा नव्याने एकमेकांत आता रुजवायला ह्वी. हेवेदावे, जातीभेद, गरीब - श्रीमंताची विसरून दरी कष्टाची भाकर गावातच मिळ्वू असाच माझा गावकरी हवा. सुजलाम[ सुफलाम धरती बनवू चला गडयानो, नकोच आता शहरातली वेठ्बिगारी, ह्यापेक्षा गावातली स्वाभिमानाची भाकरची बरी असं म्हणणारी असावी नवी पिढी. पुन्हा मला तेच माझं


गावं हवं अगदी माझ्या स्वप्नातलं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational