गावाकडचा इंद्रधनू
गावाकडचा इंद्रधनू
गावाकडच्या इंद्रधनूचा रंग वेग वेगळा दिसे
शहराकडचा इंद्रधनु जणू
बंगल्याच्या काचात वसे
ओढ गावाची लागता मनी
काहीच नसे ध्यानी मनी
खंत प्रेमाची शेजाऱ्याच्या
नेहमी माझ्या असे उरी
इथे जणू रूम पार्टनर आहे
शेजारी कुणी न आहे
गावाकडच्या इंद्रधनु चा रंग वेग वेगळा आहे
ओळखीच्या त्या दुनियेची मजा काही वेगळीच आहे
अनोळखी या जगात
कोणी न कोणाचे आहे
गावाकडच्या इंद्रधनुचा रंग वेग वेगळा आहे.
