एक पणती
एक पणती


. एक पणती
. . .
एक पणती
विचारांची
साथ देते
सदाचाराची
एक पणती
सद्गुणाची
बंध जपते
संस्कारांची
एक पणती
निस्सीम प्रेमाची
छेदून जाते
तमा स्वार्थाची
एक पणती
पराक्रमाची
गाथा गाते
शौर्याची
एक पणती
त्यागाची
गुंफते माला
यशस्वीतेची
एक पणती
मानवतेची
चेतवते मशाल
दिव्यत्वाची