Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Atul atul

Tragedy Thriller

3  

Atul atul

Tragedy Thriller

🙏एक मनुष्यरुपी वादळ शमलं🙏

🙏एक मनुष्यरुपी वादळ शमलं🙏

3 mins
490


आपण एक माणूस आहोत, आपल्या मर्यादा आपण जाणतो हे गृहीत धरलं तरीही अनवधानाने आपल्यातला माणूस नकळतपणे काही चुका आपल्या आयुष्यात करीत असतो. त्या चुकांच्या फलस्वरुप आपणापुढे काय वाढून ठेवलेले असेल याची पुसटशीही कल्पना नक्कीच त्यांना नसते. आंणि इथेच खरी गोम असते. रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला गुंतवतो, आणि त्यात पुढेपुढे जाऊ लागतो पण त्याची मर्यादा ठरवली तर आपण आपले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होतो, आपणास अजून पुढे जाण्यासाठी एक मार्ग निश्चित करता येतो. हे सगळं नक्कीच आपण करू शकतो. आणि यामुळे आपल्याशी संबंधित, ज्यात आई, बाबा, आजी, आजोबा, काका, मामा, आत्या, मावशी, बंधू, भगिनी, अर्धांगिनी, पुत्र, पुत्री, पौत्र, पौत्री, मित्र परिवार, या सर्वांशी आपला एक बंध तयार होतो आणि याच ऋणानुबंधाच्या भरवशावर आपण सगळे या जीवनात जगत असतो. हे सगळं लिहीण्यामागचा उद्देश एवढाच की कुठलेही पाऊल उचलताना मनाची एकाग्रता आणि त्यामधल्या मर्यादांचे भान ठेवणे आजच्या काळात किती आवश्यक आहे याचं तंतोतंत समीकरण आपणास कळावं. याचा प्रत्यय आम्हाला आमच्या डोळ्यांसमोरील ते दृश्य बघून झाला.


दि.१५ ऑगस्ट २०२०ची ती सकाळ असा एक दुर्दैवी क्षण घेऊन येईल याची पुसटशीही कल्पना नक्कीच कुणी करुच शकले नाहीत आणि ती बातमी वायुवेगाने सर्व संबंधितांपर्यंत पोहोचली आणि तो क्षण सगळ्यांसाठी इतका धक्कादायक होता की कोणावर आज विश्र्वास करावा देवावर की दैवावर हेच समजेनासे झाले होते. असं काही घडेल याचा अंदाज कोण बांधणार? शेवटी नियतीला जे मंजूर असतं तेच त्या दुर्दैवी सकाळी घडलं आंणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.


आमच्या ओळखीतले ×××××××× यांच्या अपघाती निधनाची दुर्दैवी घटना घडली आंणि सर्व संबंधितांचे काळजाचे ठोके वाढले. ती भयावह घटना घडली तेव्हा त्यांचे श्र्वान त्यांच्या सोबत होते, काय त्या मुक्या प्राण्याला समजणार की आपला धनी आता आपल्याला सोडून देवाघरी निघून गेलाय. पण तो तर ईमानदार प्राणी शिवाय आपल्या धन्याकडे रडतरडत पाहत राहण्याशिवाय काहीच करु शकत नव्हता. बातमी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि हाहाकार! एवढा धष्टपुष्ट शरीराचा माणुस, एकाग्रचित्ताने कार्यालयीन कामे सांभाळणारा, सर्वांना घेऊन चालणारा, कठोर पण तेवढाच प्रेमळपणे कार्यालयातील सहकाऱ्यांशी आणि त्यांच्याजवळ आलेल्या प्रत्येकाशी अदबीने वागणारा, हिंमतवान नेतृत्व, सगळ्यांचाच भावनिक आधारवड, कुणाशीही वैरत्व नसलेला, एक आगळा लढवय्या आज आमच्यात नाही ही वस्तुस्थिती आहे पण मन ते स्वीकारण्यास तयार नाही. त्यालाही त्यांची स्वतःची दीर्घकालीन दिलेली अमर्याद सेवा हीच कारणीभूत आहे. कारण मोहरीच्या कणाला पर्वताचे रुप देऊन त्याचे रुपांतर एका भव्य वास्तुत करणे ही तारेवरची कसरत त्यांनीच करुन दाखवली तेव्हाच आज त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या संस्था व त्यातील त्यांचे सहकारी, कर्मचारी, संबंधित, आजपर्यंत नियमबद्ध राहून मोकळ्या वातावरणात निश्चिंतपणे आपले कामकाज करीत, कारण त्यांनी दिलेली आपुलकीची वागणुक. आज ते आपल्यात नाहीत हे कोणालाही न पटणारं कोडं आहे. शेवटी वरच्याने आदेश काढल्यावर माणूस मरणारच, पण हा माणूस वेगळया पठडीतला होता, आणि अजून बरीच वर्षे तो आपली सेवा या संस्थेला देऊ शकणाऱ्यांपैकी होता, पण त्यांच्यापुढे (देवापुढे ) कोणाचेच चालत नाही. आता त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारुन व त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली. शेवटी एकच की असा माणूस पुन्हा होणे नाही पण त्यांचे कार्य जिवंत ठेवणे ही एकच गोष्ट त्यांच्या मृतात्म्याला शांती प्रदान करेल. ओम शांती ओम.


Rate this content
Log in

More marathi story from Atul atul

Similar marathi story from Tragedy