आई
आई


"आई" हे जीवनातले एकमेव असे नाते आहे, की तिच्याशी जन्मापासून ते वृध्दापकालापर्यंत, तुम्ही केलेल्या कुठल्याही मागणीची पूर्तता करण्यासाठी झटणारी, तुमच्या कडुन कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगणारी, स्वतःजवळील सर्वस्वाचा सडा शिंपणारी, आवश्यक असेल तिथे धावुन जाणारी, जेंव्हा ती अचानक देवाघरी निघुन जाते तेव्हा, आपल्याला स्वतःला एकटेपणाची जाणीव होते, पदोपदी ती कुठेतरी आपल्या आसपासच असल्याचा विश्र्वास स्वतःतच निर्माण होतो, घरची सर्व मंडळी घरात असल्यावर देखील तिची उणीव जाणवते.
या आणि अशाच अनेक गोष्टी, आईचे अस्तित्व असेपर्यंत कुणालाही तिच्या अस्तित्वाची किंमतच कळलेली नसते, पण तिच्या अचानक झालेल्या निर्गमानाने जी पोकळी निर्माण होते, तेव्हा आपण स्वतःला एकाकी पडलेलं समजायला लागतो, आणि त्याच क्षणी आपणास आईची आठवण येते, पण ती आता कधीच येणार नाही हाही विश्र्वास आपणास असतोच, पण मन मानत नाही आंणि तिथे खरी तिच्या अस्तित्वाची किंमत आपणास कळून चुकते. ती असती तर... आई कसे विसरु तुझे उपकार...🌹🙏🙏