Swapna N.

Inspirational

1.5  

Swapna N.

Inspirational

एक अनोखं प्रेम

एक अनोखं प्रेम

4 mins
8.2K


कोण होता तो? पोलिसांच्या गाडीत का बसला होता? ह्याला कधी इथे पाहिलं नाही असे अनेक प्रश्न गिरीजाच्या मनात येत होते. त्याच काय झाल होतं, सकाळी गिरीजाच्या ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी उभी होती आणि हवालदार एका युवकाला गाडीत बसायला सांगत होता. तो युवक दिसायला गहु वर्णिय, मध्यम बांधा पण आकर्षक व्यक्तिमत्व जे बघुन गिरीजा काही वेळ विचारच करत बसली होती.

असे काही दिवस उलटुन गेले. आता गिरीजा त्या युवकाला विसरली सुद्धा होती पण अचानक एका दुकानात तिची त्या युवकाशी नजरा-नजर झाली. गिरीजा पुढाकार घेउन त्याला म्हणाली " मी गिरीजा, इथे जवळच माझे ऑफिस आहे. तुझं नाव काय?" असा प्रश्न लडीवाळ पणे तिने केला. " मी आदित्य, इथे जवळच माझं एक वर्कशॉप आहे." अस सांगून तो लगबगीने निघून गेला.

गिरीजाला प्रथमच भेटीत आदित्य चांगला वाटू लागला होता. आता ती रोज ऑफिसला येता-जाता तिची नजर त्याच्या वर्कशॉप वर जात होती. मनात फक्त हा विचार होता की आजतरी आदित्य दिसेल. जर कधी दिसला तर गिरीजा खूप आनंदून जात होती. 

आज रविवार होता. फाईलचं कारण काढून गिरीजा ऑफिसला आली होती याच आशेने की आज तरी आदित्य भेटेल आणि मी त्याच्याशी मैत्री करेन. तिची आशा पूर्ण झाली, ऑफिस बंद करुन बाहेर पडताना आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला. गिरीजाचा आनंद गगनात मावेना. आदित्य तिच्याकडे बघुन हसला आणि म्हणाला, "आज ऑफिस? सुट्टी नाही?" "नाही, काही काम नव्हतं, एक फाईल घ्यायला आले होते. आता मी ४-५ दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे ना म्हणून." गिरीजा हसत म्हणाली. त्याने चहा ऑफर केल्यावर तर गिरीजा आनंदाने वेडीच झाली. कोणताही विचार न करता हो म्हणून त्याच्या बरोबर जायला तयार झाली. दोघांच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या इतक्यात गिरीजाचा फोन वाजला. "कुठे आहेस? कधी येणार? असे प्रश्न आई विचारत होती. "लवकरच येते." अस सांगून तिने फोन ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की गेले २-३ तास ती आदित्यच्या गप्पात रमली होती.

दिवसा मागुन दिवस जात होते. दोघ वरचेवर भेटू लागले होते. त्यांच्यात एक नविन नातं विणलं जात होतं. दोघांना ते जाणवत होत पण कबूल मात्र करायच नव्हत. गिरीजा सुंदर कविता करीत असे. आदित्यवर ती मनापासून प्रेम करु लागली होती. आजही ती  एक कविता लिहीत होती.

"कस सांगू तुला मला ही काही सांगायचयं.

माझ्या मनातल तुझं स्थान मला दाखवायचयं.

तुझ्या सोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगायचायं.

तू समोर असताना जग सारं विसरायचयं.

मिठीत येउन तुझ्या खूप खूप रडायचयं

कधीही लांब न जायच वचन तुला द्यायचय."

आदित्यने आज ठरवल होत की, आज मनातल प्रेम व्यक्त करावं आणि गिरीजाला लग्नाची मागणी घालावी. रोज ठरल्या प्रमाणे ते दोघं भेटले. आदित्य जरा घाबरलेला तर गिरीजा तो काय बोलेल हे ऐकण्यासाठी आतुरलेली. शेवटी आदित्यने धीर एकवटून मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरीजा रडू लागली. आदित्य गोंधळून गेला, काय करावं ते त्याला कळेना. "काही चुकलं का माझं? माफ कर पण मला तुला दुखवायचं नव्हतं." हे ऐकताच ती म्हणाली, " मलाही आज तुला हेच सांगायचं होतं पण तू ते बोललास आणि मला काही सुचेना." आता गिरीजा आदित्यच्या बहुपाशात  शांत झाली होती. आज दोघांच एक नव आयुष्य सुरु होणार होतं. 

दिवसेंदिवस त्यांच प्रेम बहरत होतं. गिरीजाचे अल्लड हट्ट आणि ते पुरविण्यासाठी आदित्यच झटणं. एक क्षणभर ही आता ते वेगळे राहु शकत नव्हते.

आदित्यच्या घरात गिरीजा आवडली होती पण इकडे गिरीजा कडे आई-वडिलांचां विरोध. आदित्यचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता. त्यांना वाटत होत, आपली मुलगी नोकरी असलेल्या, स्वतःच घर असलेल्या मुलाच्या घरात द्यावी. गिरीजा त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यश येत नव्हते.

एका वर्षानंतर, आज गिरीजाच्या आई-वडीलांनी आदित्यला भेटायची इच्छा व्यक्त केली गिरीजाला आज आकाश ठेंगण वाटू लागलं होत. काय कराव आणि काय नाही तेच कळत नव्हतं. तिने ठरवलं की ही बातमी आदित्यला भेटूनच द्यायची. त्याचा आनंद जवळून अनुभवावा.

गिरीजा नटुन-थटून त्याला भेटायला निघाली, तिला सगळीकडे आदित्यचं दिसत होता. रस्ता ओलांडताना तिला वेगाने येणारी बस दिसलीच नाही. 

आता ती हॉस्पिटल मध्ये आय.सी.यु. मधे होती. आदित्य पूर्णपणे खचला होता. काय कराव हे त्याला कळत नव्हत. आई-वडीलांची तर अवस्था बघवतच नव्हती. गिरीजाचा दादा मनातून कोसळला होता पण या परीस्थितीत तो सर्वांना धीर देत होता.

"गिरीजा कोमात गेली." हे डॉक्टरांचे उच्चार ऐकताच दादा ही धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. आदित्यची अवस्था बघवतच नव्हती. तो सारखा गिरीजाला "बेटा, उठ ना बोल ना बघ मी आलोय", म्हणत होता. आदित्य एका वेगळ्याच वळणावर होता. जिथे तो गिरीजाशिवाय दुसरा विचारच करु शकत नव्हता.

दिवसा मागुन दिवस जात होते. आदित्यचे गिरीजावरील आतोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते. आदित्यची ही अवस्था  त्याच्या आई-वडीलांनाच काय तर गिरीजाच्या आई-वडीलांना सुद्धा सहन होत नव्हती. त्यचे आकर्षक व्यक्तिमत्व कुठेतरी गायप झाले होते.

आदित्यने त्याचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच ठेवला होता. जुने किस्से, जुन्या भेटी-गाठी, आजुबाजूच्या बातम्या तो रोज गिरीजाला सांगे. गिरीजाचे अल्लड हट्ट तर तो तिला रंगवून रंगवून सांगे. मनात एकच आशा होती की गिरीजा लवकरच कोमातून बाहेर येईल आणि त्यांचे आयुष्य परत होते तसे होईल.

आज आठ महिने झाले होते त्या भीषण घटनेला. हळू हळू, आदित्यही कविता करायला लागला होता. आज त्यातलीच एक कविता तो तिला ऐकवत होता.

तूच माझा श्वास, तूच माझी आस,

तुझ्याविना हे जीवन  झाले आहे भकास,

किती असा झुरत राहू, नको देउ त्रास

ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश,

ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश,

ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश."

आदित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोक ठेउन रडू लागला इतक्यात  केसांवर एक स्पर्श झाला.

"बघ आदु आले तुझ्याकडे सोडुन सारे पाश." हे ऐकताच आदित्यने डोक वर केलं आणि गिरीजाचा तो प्रसन्न चेहरा बघुन तो आनंदाने नाचू लागला. गिरीजाला मिठीत घेउन तो सुखावला होता. त्याची इतक्या महिन्यांची तपस्या फळास आली होती.

सगळे आनंदाने देवाचे आभार मानत होते. आदित्यच्या नितांत प्रेमानेच गिरीजाला नविन आयुष्य दिले होते. 

काही दिवसातच आदित्य-गिरीजाचे प्रेम आयुष्यभरासाठी लग्नाच्या रेशीमगाठीत बांधले गेले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational