supriya jadhav

Inspirational

3.8  

supriya jadhav

Inspirational

दुर्गा आणि गुरुमाई

दुर्गा आणि गुरुमाई

20 mins
1.7K


रीमा एक अनाथ मुलगी असते . अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेली. खूप हुशार १८ वर्षाची पूर्ण झाल्यावर ती अनाथाश्रमातून बाहेर पडली आणि पुढील शिक्षणासाठी शहरात आली. काम करून तीच शिक्षण चालू होते. कॉलेज मध्ये तिचा छान ग्रुप जमला होता . सगळ्याना तीच खूप कौतुक वाटायचं. शेवटच्या वर्षी त्यांच्या ग्रुप मधल्या निताचं लग्न ठरलं . लग्न गावी होत रीमा आणि काव्या दोघीही ८ दिवस आधीच जाणार होत्या तिच्या लग्नासाठी रीमा ने तर सुट्टी पण टाकली होती . नीता पहिलेच गावी गेली होती. रविवारी रात्रीच्या बसने या दोघीही निघाल्या . बस दुसऱ्या दिवशी पहाटे पोचणार होती नीता च्या गावी . दोघीही झोपी गेल्या बसमध्ये . रीमा ला जसा डोळा लागला तिला समोर एक शिवमंदिर दिसू लागले आणि ती पिंडीवर जलाभिषेक करत होती तेव्हड्यात काही लोक आले आणि तिच्यासमोर तलवार घेऊन उभे राहिले . एक जोरात किँकाळी झाली डोळे उघडून पाहते तर काव्या तिला उठवत होती . पहाट झाली होती . थोड्याच वेळात त्यांचा स्टॉप येणार होता. रीमाला अस स्वप्न कधीच पडले नव्हते ती विचार करू लागली कि असा भयानक स्वप्न का पडलं असेल. काव्या मात्र लग्नामध्ये काय काय मज्जा करायची ते ठरवत होती आणि तिच्या बडबडीने तिनेही स्वप्नाचा विचार बाजूला ठेवला आणि त्या दोघी लग्नामध्ये काय करायचं याविषयी बोलू लागल्या. थोड्याच वेळात गाव आलं. त्या बसमधून खाली उतरल्या . समोर गावाच्या नावाची कमान होती " रुद्रगाव " . गावाचं नाव पाहून रीमा ला असा वाटलं कि अरे हे तर माझं गाव . स्वतःच्या घरात आल्याचं फीलिंग आलं तिला . काव्या ने तिला हलवलं तशी तिची तंद्री भंगली . आणि तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आलं . कारण ती अनाथ होती तिला माहीतही नावात कि तीच गाव कुठलं आई वडील कोण तिला खूप वाईट वाटलं असं वाटलं कि ज़ोरात रडावं . पण तिने आवरलं स्वतःला होतीच ती सहनशील. काव्या मात्र गाव पाहून खूप ख़ुशी झाली होती ती लहानपानपासून शहरात राहिली होती त्यामुळे ती गाव पाहण्यात दंग झाली . रीमा ने नीता ला फोन केला कि आम्ही आलोय कोणालातरी घ्यायला पाठव. त्या दोघी तिथेच वाट पहाट बसल्या. थोड्यावेळाने एक मुलगा आला रोहन त्याच नाव.नीताच्या शेजारी राहणार होता . तो त्या दोघीनाही घेऊन नीताच्या घरी गेला . नीता खूप खुश झाली त्या दोघीना पाहून .रीमाने आल्या आल्या सगळ्यांना आपलंस करून घेतलं होत छोटी मुले तर रीमा ताई रीमा ताई म्हणून सारखी तिच्या मागे मागे पळत होती . नीताच्या लग्नाला ८ दिवस बाकी होते घरामध्ये लग्नाची सगळी गडबड चालू होती . आज सवाष्णी होत्या त्यांच्याकडे . गावातील सगळ्या बायका आल्या होत्या . पुरणपोळीचा स्वयंपाक होता रीमा पुढे होऊन सगळी मदत करत होते जस कि तिच्या घरातीलच लग्न आहे नीताच्या आईला पण खूप लळा लागला होता रीमा चा . गावातल्या सवाष्ण बायका येऊ लागल्या जेवायला . राणूअक्का आल्या तश्या सगळ्या बायका त्यांना जागा करून देऊ लागल्या . रीमा ने राणूअक्का कडे पहिले आणि त्यांच्याकडे पाहताच राहिली . कपाळी कुंकवाचा मळवट भरलेला. हिरव्या रंगाची नऊवारी साडी . हात भरून हिरव्या बांगड्या . नाकामध्ये नथ . गळ्यामध्ये मंगळसूत्र . राणूअक्का म्हणजे तिला साक्षात जगदंबेचा रूपच वाटली.गावामध्ये राणूअक्का ला खूप मन होता . गावावर कुठलेही संकट आले एकच उपाय तो म्हणजे राणूअक्का . राणूअक्काचा शास्त्राचा खूप अभ्यास होता . ती गावाला आपल्या लेकीसारखं जपायची. रीमा ने राणूअक्काला पाहिलं आपोआपच ती पाया पडायला खाली वाकली जसा तिने अक्काच्या पायाला हात लावला राणूअक्का झटका लागल्या सारखी मागे सरकली . रीमा कडे पाहताच तीने रीमा समोर हाथ जोडले आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बोलत निघून गेली . तिथे बसलेल्या कोणालाच काहीच काळात नव्हते . ज्या राणूअक्का समोर सगळी पंचक्रोशी नतमस्तक होती तिने रीमा पुढे हात जोडावेत . रीमाला तर काहीच काळात नव्हते . तिच्यासाठी हे सगळे खूपच धक्कादायक होते.तिने नीताच्या आईला विचारायचा प्रयन्त पण केला पण त्यांनाही काहीच सांगता नाही आले. काव्या बोलली जाऊदे ना म्हातारी आहे तिला काय समजतेय आणि पुढच्या क्षणाला काव्याच्या कानाखाली जोरदार चपराक बसली आणि सगळीकडे जोरदार आवाज घुमला "खबरदार जबान सांभाळून वापरा "रीमाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत . सगळे तिच्याकडे पाहून अवाकच झाले .काव्या काही बोलणार तेव्हड्यात रीमाच्या तोंडून "ओम नमः शिवाय " चा जप झाला आणि ती बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने रीमा शुद्धिवर आली तिला काय झालं ते काहीच आठवत नव्हते. इकडे राणूआक्का घरी आली आणि तिने घरातील तिची एक जुनी पेटी होती ती बाहेर काढली .खूप वेळ ती काहीतरी चाळत होती . तब्बल ५ तासानंतर काहीतरी गवसल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. ती तिथून उठली आणि नीताच्या घरी आली . सगळ्यांनी राणूआक्काला नमस्कार केला. आक्काने रीमाविषयी विचारले .नीताच्या आईने त्यांना एक खोली दाखवली जिथे रीमा आराम करत होती . राणूआक्का रीमाला भेटायला गेली आणि कोणीही आत येऊ नये म्हणून सांगितले. राणुआक्काला पाहून रीमा उठली तिला खूप काही विच्रारायचे होते . ती काही विचारणार तोच राणुआक्का तिला हाथ झोडून बोलल्या नमस्कार राणीसरकार . रीमा काही बोलणार तोच आक्का बोलल्या कि मला माहित आहे तुम्हाला खूप काही प्रश्नपडले आहेत त्या आलं सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील . माझ्यावर विश्वास ठेवा . रीमा बोलली "तुम्ही हे सगळे काय बोलत आहे मी एक अनाथ मुलगी आहे तुम्ही माझ्या पाय काय पडतंय मला राणी सरकार काय बोलताय हे सगळे काय चाललंय तुम्ही ओळखता का मला कोण आहे मी माझे आई वडील कोण आहेत सांगा मला आणि सगळे बोलतात मी मधेच काहीतरी वेगळी वागत आहे पण मला काहीच कळात नाही काय चालू आहे सगळे सांगा कोणीतरी मला " .रीमा खूप टेन्शन मध्ये बोलत होती . राणूआक्का बोलल्या कदाचित तुम्हाला मी सांगितलं तर विश्वास नाही बसणार . पण माझ्यावर विश्वास ठेवा आणि चला माझ्यासोबत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील . रीमाला पण हे सगळे काय चालू हे जाणून घ्यायचं होताच तीच अस्तित्व जाणून घ्यायचं होत . ती राणुआक्कासोबत निघाली. घरातून निघताना नीताला भेटली आणि मी लवकरच येते अस सांगून निघाली कोणीही काहीही विचारण्याचा प्रश्नच नव्हता कारण ती राणुआक्कासोबत चालली होती. राणुआक्का रीमाला घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या शिवमंदिरात गेल्या . दुपारची वेळ असल्यामुळे शिवमंदिरात जास्त लोक नव्हती . राणुआक्का मंदिरातल्या गुरुजींसोबत काहीतरी बोलल्या. गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितले आणि स्वतःही बाहेर गेले . रीमा ला आश्चर्य वाटले कि कोणी एकही शब्द न विचारात फक्त राणुआक्काच्या सांगण्यावरून बाहेर कसे काय गेले . एव्हाना तिच्या हे लक्षात आले होते कि राणुआक्का म्हणजे कोणी साधीसुधी नाही काहीतरी नक्की रहस्य आहे यामागे . तेवढ्यात राणुआक्काने रीमाला आत येण्याचा इशारा केला रीमा सावधपणे आत गेली . राणुआक्काने मंदिराच्या गाभाऱ्याचे दार बंद केले. आपल्या पिशवीतून रुद्राक्षाची माळ काढली डोळे बंद करून ओम नमः शिवाय चा जप केला . पूर्ण गाभाऱ्यात नारंगी प्रकाश झाला रीमा हे सगळे खूप आश्चर्याने पाहत होती . हळू हळू समोरची भिंत आत सरकली आणि आतून एक साधू बाहेर आले . राणुआक्काने त्यांना नमस्कार केला आणि रीमाकडे बोट दाखवले तसे साधू रीमा कडे पाहू लागले त्यांना पाहिल्यावर रीमाचे हात आपोआपच झोडले गेले . "विजयी भव" साधूंच्या तोंडून आशीर्वाद निघाला . रीमा ने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पहिले काही काळजी करू नको पोरी सगळे समजेल थोडा संयम ठेव . रीमा ने होकारार्थी मान दर्शवली सगळ्या कृती तिच्य्याकडून यंत्रवत होत होत्या. साधूंनी त्या दोघीना आपल्या सोबत चालण्याचा इशारा केला तश्या त्या दोघी समोरच्या उघडलेल्या दरवाजातून गेल्या त्या आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला . रीमा आत थोडी घाबरली तिला वाटू लागले आपण फसवले तर नाही ना गेलो.तेव्हड्यात साधुमहाराज बोलले पोरी मनात कुठलीही शंका आणू नकोस . तुझा जन्म ज्यासाठी झाला आहे त्यासाठीच तू चालली आहेस . थोड्यावेळाने त्या गुहेतून ते सगळे बाहेर पडले आणि एका जंगलातून चालू लागले साधुमहाराज पुढे मागे रीमा आणि पाठीमागे राणुआक्का जस कि दोघेही रीमाच रक्षण करत होते.रीमा ला असा वाटत होत कि ती खूप वेळा या जंगलात आली आहे . ती विचार करू लागली हे कसं शक्य आहे मी तर कधीच नाही आली मग मला हे सगळ ओळखीचं का वाटत आहे आणि तेव्हड्यात एक बाण सु सु करत आला आणि रीमा च्या कानाजवळून गेला राणुआक्का आणि साधुमहाराज दोघेही सावध झाले रीमाला मध्ये ठेवून दोघांनीही आपली हत्यारे काढली . दोघांच्याही हातात तलवारी होत्या. राणुआक्काकडे पाहून तिला वाटत होते हि कोणीतरी देवा धर्माचं करणारी बाई असेल पण तिला पाहिल्यापहिया जे तिच्या मनात आल होत कि साक्षात जगदंबा च आहे राणुआक्का ते खरं आहे अस भासलं एक क्षण .काही कळायच्या आतच १५-२० शस्त्रधारी माणसे त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली . त्यांच्याकडे पाहून असे भासले कि जुन्या काळातले योद्धे आहेत ते . राणुआक्काकडे पाहून एक जण बोलला ए थेरडे तू का आली आहेस परत आज तू जिवंत नाही जाणार आणि आता हि कोण आहे नाझुक पोरगी. राणुआक्का तेवढ्याच ज़ोरदार आवाजात कडाडली वाट सोडली आमची आणि माझ्या राज्यात यायला तुझी परवानगी नाही लागत हो मागं नाहीतर परिणाम वाईट नाही होणार. तसा तो माणूस जोरात हसायला लागला तू काय करणार आमचं विसरलीस का २०० वर्षांपूर्वी काय झालं होत ते का दाखवू परत एक झलक . राणुआक्का बोलली "मी काही नाही विसरली पण आता तुमचे दिवस संपले तेव्हा मुकाट्याने वाट सोड नाहीतर इथंच फडशा पाडीन तुझा.तसा तो ज़ोरदार हसायला लागला आणि आपली तलवार जोरात फिरवली रिमानेतर डोळेच झाकले पण राणुआक्काने पूर्ण ताकदीनिशी त्याचा वार पलटवाला आणि पलटवार केला तसा त्याचा हात धडावेगळा झाला. रीमा राणुआक्काकडे नुसती पाहतच होती ज्या पद्धतीने ती लढत होती तिची तलवार सपसप सगळ्यावर चालत होती एका रणरागिणीला लढताना पाहत होती .५-६ जणांची तर डोकीच धडा वेगळीकेली राणुआक्काने.रीमा ला आश्चर्य वाटत होते कि एव्हडे वय झाले असताना देखील राणुआक्का एवढ्या ताकदीने कशी काय लढत होती . तिला आठवले कि मगाशी तो माणूस बोलला कि २०० वर्षांपूर्वी काय झालं होत ते आठवते ना म्हणजे राणुआक्का नक्की किती वर्षांची होती. ती नक्कीच २०० वर्षांपेक्षा मोठी असणार मागं ती ता ७० - ७५ वर्षाची कशी काय दिसत होती पण लढत तर अशी होती की ३० वर्षाची आहे . रीमा विचारात असतानाच एक माणसाने रीमा वर हल्ला चढवला साधुमहाराज तिला पूर्ण वाचवायचा प्रयन्त करत होते . पण तो माणूस त्यांच्यावर ज़ोरदार हल्ले चढवत होता. आणि त्याने तलवारीचा असा वार केला की साधुमहाराजांची तलवार एका क्षणात खाली कोसळली आणि दुसरा वार त्यांच्या छातीवर झाला तसे महाराज खाली कोसळले. त्या माणसाने रीमा वर हल्ले करायला सुरवात केली . रीमा वाचायचं प्रयन्त करत होती आणि खूप घाबरली पण होती .तिकडे राणुआक्का लढत होती तिच्यासमोर कोणाचाही टिकाव लागत नव्हता . रिमाने घाबरून राणुआक्काला आवाज दयायला सुरुवात केली "राणुआक्का वाचावं " . राणुआक्काच लक्ष विचलित झालं बस त्याचा फायदा घेऊन कोणीतरी राणुआक्काच्या पाठीवर वार केला आणि राणुआक्का फिरून वार करणार तोच एक बाण सळसळ करत राणुआक्काच्या पायात घुसला. दोघाजणांनी राणुआक्काला पकडून ठेवले . इकडे साधुमहाराजांनाही झाडाला बांधून ठेवले . रीमाच्या मानेवरही तलवार ठेवली होती. रीमा खूप घाबरली होती . तेव्हड्यात राणुआक्काचा आवाज आला सोड तिला तिचा या सगळ्याशी काही संबंध नाही तिला जाऊ दे आम्हाला जे करायचे ते कर . तो माणूस काही बोलणार तोच समोरून एक घोडा धूळ उडवत येताना दिसला तसे ते सगळे लोक खुश झाले. त्यातला एक जाण बोलला बघ काळ येतोय तुझा तोच फैसला करेल आता.तो घोडा जसा जसा जवळ येऊ लागला रीमाला खूप भीती वाटू लागली आता आपण काही जगत नाही असे तिला वाटू लागले . घोड्यावरून एक इसम खाली उतरला. धिप्पाड शरीरयष्टी उंचपुरा एखाद्या फिल्म मध्ये व्हिलन दाखवतात ना अगदी तसा . तो घोड्यावरून उतरला तसा राणुआक्काकडे गेला .तिच्या मानेवर तलवार ठेवून बोलला "का आली आहेस इथे ,तुला तर सोडून दिल होत. मग कुठल्या कारणानं आलीस नक्कीच काहीतरी मोठं घडले असणार म्हणून तू इथे येण्याची हिम्मत केलीस . राणुआक्का शांत होती ती काहीही बोलली नाही . त्याच्या माणसाने रीमा राणुआक्कासोबत आली हे सांगितलं. तो रीमा कडे जाणार तेव्हड्यात राणुआक्का बोलली मग फिरा रामसिंग त्या पोरीचा काही संबंध नाही . रामसिंग बोलला असा कसं तिला तू सोबत आणली आहेस म्हणजे नक्कीच संबंध आहे .

"उडवा रे त्या पोरीची गर्दन" रामसिंग गरजला तसं त्याच्या माणसाने रीमावर तलवार उगारली . " राणीसरकार वार करा " राणुआक्का गरजली. आणि रीमाच्या दिशेने तलवार फेकली . रीमाला काहीच समजत नव्हते.तिने तर तलवार कधी पहिलीही नव्हती ती चालवणं तर दूरच पण जशी तिच्या दिशेने तलवार आली तिच्या संपूर्ण अंगात एक वेगळीच शक्ती संचारली . तिने तिला पकडलेल्या दोन्ही माणसांना पूर्ण ताकदीनिशी दूर ढकललं आणि तलवार पकडली . एका झटक्यात तिच्यावर धावून आलेली दोन्ही माणसं यमसदनी पोचली आणि सुरु झाला रणरागिनाचा तांडव . रीमा ने सगळ्यांना पराभूत केले . रामसिंग पुरता घाबरला होता कारण तो आता ज्या मुलीला पाहत होता ती रीमा नव्हतीच ती होती " राणी दुर्गा "साक्षात दुर्गेचं रूप २०० वर्षांपूर्वी जिने सगळ्या सैतानांच जीवन मुश्किल केले होते ती रणरागिणी .तेच रूप , डोळ्यात तीच आग , चेहऱ्यावर तेच तेज . आता मात्र रामसिंग पूर्ण घाबरला होता . "राणीसरकार" त्याच्या तोंडून आपसूकच शब्द निघाले घाबरून त्याची तलवार कधीच गाळून पडली . आणि तो ह्या धक्यात होता कि हे कसं होऊ शकत जिला २०० वर्षांपूर्वी संपवलं होत . रामसिंग ला काहीच सुचत नव्हते तो सुन्न होऊन पाहत होता दुर्गेचा तांडव . रामसिंग भानावर आला आणि जीव वाचवून पाळायला लागला तेव्हड्यात राणुआक्का आडवी आली त्याने राणुआक्काकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला कारण त्याला पक्कमाहित होत यात राणुआक्काच खूप मोठा हात आहे . राणुआक्का गरजली डोळे फाडून काय पाहतोस शंकराचं वरदान आहे तिला दुर्गा आहे , ती परत येणारच होती सांग तुझ्या राजाला तुझं साम्राज्य उधळून लावणारी आली आहे . पळ आता जितके पळता येईल तेवढे . रामसिंगच्या डोळ्यात अंगारे फुलले होते. रामसिंगने सगळे सैनिक पाळून गेले होते . रीमा अजून हि तलवार घेऊन उभी होती . राणुआक्का रिमाजवळ गेली रीमाच्या चेहऱ्यावर खूप प्रश्न होते आपल्यामध्ये एव्हडी ताकद कुठनं आली. राणुआक्का बोलली चला राणीसरकार काही बोलू नका थोडा धीर धरा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. साधुमहाराज जखमी झाले होते त्यांना आधार देत रीमाने उठवले आणि राणुआक्काच्या पाठीमागे चालू लागली . राणुआक्का एका डोंगराजवळ थांबली आणि हातातील रुद्राक्षाची माळ फिरवली ओम नमः शिवाय चा जप चालूच होता काही मिनिटातच डोंगर मधोमध बाजूला झाला आणि एक गुहा तयार झाली.गुहेतून आत जात असताना खूप गारवा जाणवत होता चारी बाजूने झाडे होती रस्त्यामधून साप इकडे तिकडे जात होते .एक वेगळीच अनुभूती होती .समोरच एक तलाव होता तिथे एक नंदी होता राणुआक्काने नंदीला नमस्कार केला आणि पुढे चालू लागली रीमा आणि साधूनेंहि त्यांचे अनुकरण केले.समोरच एक भव्य दरवाजा होता तिघेही तिथून आत गेले तिथे एक शिवमंदिर होते मोठी शिवपिंड होती .राणुआक्का शिवपिंडी समोर उभ्या राहिल्या. रीमाला पुढे येण्याचा इशारा केला . रीमा पुढे आली .राणुआक्काने शिवपिंडीजवळची विभूती घेतली आणि रीमाच्या डोक्याला लावली . कमंडलूमधील पाणी रीमाच्या हातावर दिले आणि पिण्यास सांगितले . रीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि ओम नमः शिवायचा जप चालू ठेवला . पुढच्या क्षणी रीमा एका राजवाड्यासमोर उभी होती .एक भव्य आणि सुंदर राजवाडा . तिला समोररून राणुआक्कासारखी एक स्त्री येताना दिसली . ती स्त्री तिच्या समोर येऊन थांबली .ती राणुआक्काच होती.फक्त ती तरुण दिसत होती .राणुआक्काबोलली आलीस पोरी तू किती वाट पाहत होते .रीमा बोलली मी इथे कशी काय मी तर शिवमंदिरात होते तुमच्यासोबत आणि तुम्ही इतक्या वेगळ्या कश्या दिसत आहेत . राणुआक्का बोलू लागली तू तुझ्या पूर्वजन्मात आहे तू पूर्वी या राज्याची राजकुमारी होती आणि नंतर राणी झालीस पण काही दुष्टांच्या कपटपणाने या राज्याचा विनाश केला आणि तुझाही खून केला या सगळ्याचा बदल घेण्यासाठी तू परत आली आहेस .भविष्यातील मीच तुला इथे घेऊन आले आता तू बोलशील मला हे सगळे कसे माहित तर मला शंकराचं वरदान आहे मी माझ्या भविख्यातही पाहू शकते आणि भूतकाळातही तरीसुद्धा मी हे राज्य नाही वाचवू शकले हे माझे दुर्दैव राणुआक्काने रीमाला एक हातात घालायचं कड दिल त्या बोलल्या हे घाल म्हणजे तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि एक लक्षात ठेव तू इथे काय घडतंय हे फक्त पाहू शकशील त्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत. डोकं शांत ठेऊन पहा कारण या सगळ्याचा शेवट तुला करायचा आहे . एव्हडं सांगून राणुआक्कानिघून गेली . रीमा पुढे चालू लागली ती युद्धशाळेत पोचली तिथे एक मुलगी सराव करत होती आणि राणुआक्का तिला शिकवत होती तलवारबाजी चा सराव चालू होता ती मुलगी खूप कुशलतेने प्रहार करत होती . तीच युद्धकौशल्य खरंच खूप प्रभावी होते आणि राणुआक्का तिला शिकवत होत्या रीमाला आता काळात होते कि राणुआक्काने मगाशी एवढ्या हिमतीने सगळ्यांना कसे काय हरवले. सराव संपला त्या मुलीने राणुआक्काला नमस्कार केला आणि बोलली गुरुमाई अजून काय आदेश आहे . राणुआक्का बोलल्या आजसाठी एवढेच आता आपण आराम करावा. त्या मुलीने चेहऱ्यावरचे वस्त्र बाजूला काढले . रीमा स्वतःलाच समोर पाहत होती . तिला स्वतःला पाहताना इतका अभिमान वाटलं कि किती तेजस्वी आणि धाडसी होतो आपण. रीमाच्या आता हे लक्षात आलं होत कि आपण पूर्वजन्मी एका राज्याची राजकुमारी होतो . आता तिला ओढ लागली होती ती तिच्या पूर्वजन्मीच्या आईवडिलांना भेटण्याची कारण या जन्मी तिला आई वडिलांचं प्रेम माया काहीच नाही मिळालं . तेव्हड्यात आवाज आला नमस्कार राजासाहेब, नमस्कार राणीसरकार यावरून रीमाला समजले कि हेच आपले आई वडील असावेत तेव्हड्यात राजसाहेबांनी आवाज दिला दुर्गा आणि पूर्वजन्मीची रीमा पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली . तिच्या आईने तिला जवळ घेतले खूप अभिमानाने तिच्याकडे पाहू लागली . रीमाला आत स्वतःचाच हेवा वाटू लागला .काही वेळाने अचानक त्यांच्या राजवाड्यात अचानक धावपळ चालू झाली काही कळायच्या आतच राजासाहेब आणि राणीसरकारांवर हल्ला झाला आणि दोघांनीही जागेवरच प्राण सोडले . तो हल्ला करणारा भैरव होता राजासाहेबांचा सावत्र भाऊ . थोड्याच वेळात दुर्गाला पण घेरले गेले तिथे भैरव आला मोट्या मोठ्याने हसू लागला आता कुठे पाळणार आता हे राज्य माझे आहे आणि तुला मी दासी बनवणार तेव्हाच माझे समाधान होईल . पण भैरव हे विसरला होता ती दुर्गा होती साक्षात शंकरच्या वरदानाने झालेली . दुर्गाने चपळाई करून तलवार हातात घेतली आणि लढू लागली राणुआक्काहि दुर्गाला साथ देत होती दुर्गाच्यासमोर कोणीही टिकत नव्हते . हा हा म्हणता भैरवाचे सगळे सैनिक मरू लागले . दुर्गाच्या साथीला आता बाकीचेही लोक आले भैरव चा नाईलाज झाला आणि त्याने पळ काढला. दुर्गाने आता राज्याची सगळी धुरा सांभाळी होती ती खूप दुख्खी झाली होती आई वडील गेल्यामुळे पण भैरव पासून राज्याचे रक्षण पण करणे गरजेचे होते . राणुआक्का म्हणजेच गुरुमाई ने दुर्गाला सावरले दुर्गा आता राणीसरकार झाली होती . राज्य खूप छान सांभाळत होती . सोबत चा तिची साधना तपश्चर्या पण चालू होती . तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकराने दुर्गाला वरदान दिले होते त्यामध्ये तिला पाच रुद्राक्ष दिले होते ज्यामुळे ती तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत होती तिच्या राज्यात कधीच दुष्काळ पडणार नव्हता सुख समृद्धी सगळं नांदत होत तिच्या राज्यात . पण हे रुद्राक्ष चुकूनही वाईट माणसांच्या हातात लागत कामा नये नाहीतर याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागणार होते . त्या पाच रुद्राक्षामुळेच एकतर सुख समृदी नांदेल नाहीतर खूप मोठं संकट ओढवेल हि गोष्ट गुरुमाई आणि दुर्गा या दोघींशिवाय कोणालाच माहित नव्हती . पण भैरव ला एवढे कळले होते कि दुर्गाकडे असे काहीतरी आहे ज्यामुळे तो पूर्ण जगावर राज्य करू शकतो .म्हणून त्याने त्याची काही खास माणसे राजवाड्यात तैनात केली होती पण काहीच माग लागत नव्हता . मग भैरव ला एक तांत्रिक भेटला जो काळी जादू करायचा त्याने त्या तांत्रिकाला बोलावले . तांत्रिकाने सांगितले कि गुरुमाई आणि दुर्गाला काही दिवसांकरता वेगळे करा मार्ग सापडेल . भैरव ने गुरुमाईंच्या मुलावर जादूटोणा करायला सांगितलं . गुरुमाईला कळल्याबरोबर गुरुमाई मुलाकडे जाण्यासाठी निघाली पण जाण्याआधी तिने दुर्गाची भेट घेतली आणि सांगितले काही झाले तरी रुद्राक्षचे रक्षण करा . दुर्गा बोलली मी पूर्ण काळजी घेईल . इकडे भैरव ने तांत्रिकाला त्याची सगळी कला वापरायला सांगितलं पण दुर्गावर काहीच परिणाम होत नव्हता.तेव्हा तांत्रिकाने त्याच्या गुरूंना बोलावले त्याच्या गुरूंनी सांगितले कि हि रुद्राक्षाची शक्ती आहे जर तुम्ही दुर्गाला राज्याच्या बाहेर बोलावून मारणार असाल तरच तुमचा विजय शक्य आहे . भैरवने राज्यामध्ये अशी बातमी पसरवली कि गुरुमाईचा मुलगा खूप गंभीर आहे आणि गुरुमाईंवर भैरवने हल्ला करून बंदी बनवले आहे.दुर्गाला हि बातमी समजली तशी दुर्गा गुरुमाईला वाचवण्यासाठी निघाली पण त्याआधी पाचही रुद्राक्ष सुरक्षित जागी ठेवणे गरजेचे होते. दुर्गा राजवाड्यच्या पाठीमागच्या बाजूला गेली रीमाही तिच्या मागे गेली पण दुर्गा काही क्षणात कुठे गायब झाली काही कळले नाही रीमा तिथेच थांबली थोड्यावेळाने दुर्गा बाहेर आली तिने रुद्राक्ष कुठे ठेवले काय केले रीमाला काहीच नाही कळले, रुद्राक्षविषयी फक्त दुर्गाला माहित होते . दुर्गा गुरुमाईंकडे जाण्यासाठी निघाली तिने राज्याची सगळी सुरक्षा लावली आणि सोबत थोडेच सैनिक घेऊन ती निघाली . राज्याची सीमा ओलांडली कि भैरवाच्या लोकांनी दुर्गा आणि तिच्या सैनिकांना घेरले दोन्ही गटामंध्ये युद्ध तुंबले दुर्गा नेहमीप्रमाणेच हिमतीने लढत होती . दुर्गाचा विजय निश्चित होता पण तेव्हड्यात तांत्रिक आला आणि त्यांना काही मंत्र उच्चरले दुर्गाचे सगळे सैनिक बेशुद्ध झाले पण दुर्गावर त्याच्या मंत्रांचा काहीही परिणाम झाला नाही दुर्गा हिम्मत नाही हरली ती निकराने लढत होती. भैरव ने दुर्गाच्या पाठीवर वार केला तिला काही कळायच्या आताच चारही बाजूने दुर्गावर प्रहार झाला भैरवाला वाटले दुर्गा मेली तो तिला तिथे सोडून राज्यात परत गेला .इकडे गुरुमाईला सगळे समजले ती दुर्गाकडे आली तिला माहित होते दुर्गाला शंकराचे वरदान आहे तिला काही नाही होणार .गुरुमाई दुर्गाजवळ पोचली दुर्गामध्ये अजूनही प्राण होता जसे कि ती गुरुमाईची वाटच पाहत होती . गुरुमाई दुर्गाजवळ गेली आणि बोलली काळजी करू नका राणीसरकार तुम्हाला काही नाही होणार चला आपण शिवमंदिरात जाऊया.दुर्गा बोलली गुरुमाई आता खूप उशीर झाला आहे मी परत येईल राज्याची रक्षा करा रुद्राक्षांची रक्षा करा. मी परत जन्म घेईल या नराधमांना त्याच्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल आणि दुर्गाने आपले प्राण गुरुमाईंच्या मांडीवर सोडले. इकडे भैरवने सगळे राज्य शोधले पण त्याला रुद्राक्ष काही सापडले नाही तांत्रिकाच्या शक्तीने त्याला १००० वर्षांचं आयुष्य मिळालं होत . त्याने जनतेवर सगळं राग काढायला सुरुवात केली . गुरुमाई राज्यात परत आली भैरव ने त्यांना हाकलून दिले. तांत्रिकाने काळ्या शक्तीचा वापर करून गुरुमाईला राजवाड्यात येण्यापासून थांबविले . रुद्राक्ष राजवाड्यात असल्यामुळे गुरुमाईची शक्ती कमी पडत होती . गुरुमाईला दुर्गाचे शेवटचे शब्द आठवले कि मी परत येईल. गुरुमाई तिथून रुद्रगावात आली आणि राणीसारकरांची वाट पाहू लागली जेव्हा तिने रीमाला पहिले तिला लगेच समजले कि याच आपल्या राणीसरकार. गुरमाईने शक्तीनेच दुर्गाला ओळखले. रीमाला आता सगळे समझले होता तिने आपलं अर्धवट कार्य पूर्ण करायचे ठरवले . भैरवला शिक्षा द्यायची ठरवलं आणि पुढ्यच्या क्षणी ती राणुआक्कासमोर शिवमंदिराच्या गाभाऱ्यात उभी होती. रीमा बोलली प्रणाम गुरुमाई आणि राणुआक्काच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी रीमाला जवळ घेतले दोघी अश्या भेटल्या कि २०० वर्षाची कमतरता भरून काढली . रीमाने विचारले आता पुढे काय करायचे राणुआक्का बोलली पहिल्यांदा रुद्राक्षाचा शोध घेतला पाहिजे, राणीसरकार तुम्हाला काही आठवतंय का .रीमा बोलली रुद्राक्ष राजवाड्याच्या पाठीमागच्या डोंगरातल्या गुहेत आहे पण तिथे जायचं कस राजवाड्याच्या भोवती तर तांत्रिकाने आपल्या शक्तीने कड टाकलं आहे . कोणीही तिथे तांत्रिकाच्या किंवा भैरवाच्या परवानगी शिवाय नाही जाऊ शकत. रीमा ने डोळे बंद केले ओम नमः शिवाय चा जप चालू केला. रिमामध्ये सगळ्या शक्ती आता जागृत झाल्या होत्या . समोर एक नंदी उभा होता. रिमाने डोळे उघडले आणि नंदीला नमस्कार केला आणि बोलली मला मार्ग दाखवा नंदीमहाराज. नंदी पुढे चालू लागला रीमा आणि गुरुमाई पण त्याच्या पाठीमागे चालू लागल्या . साधुमहाराजांना लागले असल्यामुळे ते मंदिरातच थांबले . नंदी राजवाड्याशेजारच्या नदीशेजारी येऊन उभा राहिला आणि रीमासमोर खाली बसला रीमाला त्याचा इशारा समजला . रीमा आणि गुरुमाई दोघीही नंदीच्या पाठीवर बसल्या.नंदीने नदीमध्ये उडी घेतली आणि तो खाली जाऊ लागला थोड्याच वेळा त ते राजवाड्यापाठीमागच्या गुहेसमोर उभे होते . दोघीही खाली उतरल्या नंदी गायब झाला आणि रिमाच्या हातात एक छोटे त्रिशुळ प्रकट झाले. गुरुमाई ने इशारा केला तिने ते त्रिशुळ गुहेच्या दरवाज्याजवळ लावले तशी गुहा उघडली. दोघीही आत गेल्या गुहेचे दार बंद झाले. रीमाला काही गोष्टी आठवायला लागल्या . तिने ते पाचही रुद्राक्ष इथेच ठेवले होते. तिने समोरच असलेला एक खडक उचलला त्याखाली एक छोटा दरवाजा होता रिमाने आपल्या हातातील त्रिशुळ पुन्हा तिथे ठेवले समोर एक अघोरीबाबा प्रकट झाले .त्यांनी रीमाला पहिले आणि नमस्कार केला यावं राणीसारकर आपली मनात आमच्याकडे सुखरूप आहे . आणि त्यांनी आपल्या झोळीतून पाचही रुद्राक्ष काढून रिमाच्या हातात दिले. पण त्या रुद्राक्षाची शक्ती गेली होती भैरवला जरी रुद्राक्ष मिळाले नसले तरी त्याने त्याचा लाभ कोणालाच होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली होती .त्याने तांत्रिकाच्या मदतीने रुद्राक्षाची शक्ती नष्ट केली होती . रीमाला पुन्हा कठोर आराधना करून रुद्राक्षाची शक्ती परत मिळवायची होती. गुरुमाई ने रीमाला शंकराची आराधना करायला सांगितले . त्याच गुहेत दोघीनींही शंकराची आराधना करायला सुरवात केली आणि हळूहळू त्याच फळ हि मिळायला सुरवात झाली रुद्राक्ष पुन्हा कार्यन्वित होत होते . एक दिवस रीमा आणि गुरुमाई दोघीही पूजा करत असताना अचानक पूर्ण गुहेत प्रकाश झाला पाचही रुद्राक्ष प्रज्वलित झाले . रुद्राक्षाची शक्ती परत आली होती आणि भैरवाचा काळही . इकडे भैरव वेड्यासारखा रीमा आणि गुरुमाईला शोधात होता . त्याला तांत्रिकाकडून हे कळले होते कि काहीतरी अघटित घडणार आहे . रीमा आता रीमा राहिली नव्हती दुर्गा झाली होती तेच तेज , तीच तडफ .राणीसारकर आता पूर्ण तयार होत्या युद्धासाठी . दोघीनींही योजना बनवली पहिले त्या तांत्रिकाला दूर करायचे . गुरुमाई ने पाचही रुद्राक्षाची माळ बनवली आणि ती दुर्गाच्या गळ्यात घातली . अघोरीबाबाने त्यांना तांत्रिक कुठे भेटेल हे सांगितले . दोघीही तांत्रिकाच्या गुहेत गेल्या तांत्रिक कसलातरी यज्ञ करत होता . दुर्गाने शेजारीच असलेले पाणी घेतले आणि त्याच्या यज्ञात टाकले .यज्ञाची ज्वाला विझली तशी तांत्रिकाची तंद्री भंग पावली . तो संतापाने लाल झाला आणि ओरडला कोणाची एव्हडी हिम्मत झाली माझ्या यज्ञात बाधा आणण्याची . समोर दुर्गा उभी होती . तांत्रिकाने आपली तलवार काढली . तो बोलला " तर तू परत आलीस , पण माझं काही नाही बिघडवू शकणार " . त्याने काही मंत्र पुटपुटले आणि दुर्गावर वार केला पण दुर्गाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती त्यामुळे तो वार पलटून त्याच्यावरच गेला तांत्रिक त्याच्याच शक्तीने मागे कोसळला . गुरुमाईने चपळाईने हातातल्या कमंडलूमधले पाणी त्याच्या अंगावर टाकले , पवित्र पाण्याने तांत्रिकाला त्रास होऊ लागला त्याची शक्ती कमी होऊ लागली . दुर्गाने नंदीने दिलेले त्रिशुळ काढले ओम नमः शिवाय चा जप चालू केला आणि त्रिशूळ चा आकार मोठा होऊ लागला . तिने त्या त्रिशुळ तांत्रिकाच्या छातीत घुसवले . आता ती साक्षात महिषासुरमर्दिनी वाटत होती . तांत्रिकाने आपले प्राण सोडले . आता वेळ होती दुसऱ्या नाराधामाची. दोघिही राजवाड्याकडे चालू लागल्या. सगळे लोक दोघीना पाहून खूप आश्चर्यचकित होत होते आणि खुशही होत होते . त्यांचा विश्वास बसत नव्हता . आज २०० वर्षानंतर ते त्यांच्या राणीसारकरांना पाहत होते . सगळे लोक त्यांच्या पाठीमागे चालत होते . भैरव राजवाड्यात बसला होता त्याच्या माणसांनी त्याला दुर्गाबद्दल सांगितले पण त्याचा विश्वास बसत नव्हता . तेव्हड्यात दुर्गा त्याच्यासमोर येऊन थांबली. भैरव थोडा चमकला पण लगेच सावरला आणि बोलला " आलीस तू , पण माझं काहीही बिघडवू नाही शकत मागच्या जन्मिही माझं काही नाही बिघडवू शकली आता पण काही नाही करू शकत.". दुर्गाच्या डोळ्यात आग होती ती बोलली "भैरव तुझा काळ बनून आली आहे तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळणार " . भैरवने तांत्रिकाने दिलेली काठी फिरवली ज्यामुळे तो एव्हडी वर्ष राज्य करत होता , पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला . गुरुमाई मोठ्याने हसायला लागली अरे तू ज्याचा जीवावर एवढ्या उड्या मारत होता तो कधीच यमसदनी पोचला आहे.आता मात्र भैरव घाबरला, पळून जायला लागला दुर्गा ने हातातले त्रिशुळ भैरवाच्या दिशेने भिरकावले तसे त्रिशुळ भैरवाच्या शरीरातून आरपार झाले आणि एका दुष्टाचा अंत झाला. सगळी जनता आज खुश होती . आपल्या राणीसरकारांना डोळे भरून पाहत होते. दुर्गा आणि गुरुमाई ने रुद्राक्ष सुरक्षित जागी ठेवले . रीमा विचार करत होती आजच्या युगात पण अशी गुप्त दुनिया आहे आणि सगळे अनभिन्ज्ञ आहेत यापासून . गुरुमाई आत आल्या रिमा बोलली राणूआक्का मला परत जावे लागेल , राणूआक्का बोलली तुम्ही तिथे जाऊन तरी काय करणार , इथे आम्हाला सगळ्यांना तुम्ही हव्या आहात.रीमा बोलली ठीक आहे पण ज्या मैत्रिणीमुळे मला तुम्ही भेटला माझी सगळी लोक भेटली तिच्या लग्नाला तरी मला जावं लागेल . राणूआक्का बोलली हो खरं आहे मलाही जावं लागेल त्या गावाने मला आधार दिला . ते गाव मी माझ्या मुलासारखा सांभाळलं आहे खूप ऋणानुबंध आहेत रुद्रगावाशी. चला आपण जाऊयात पण परत मात्र आपल्या राज्यात यायचं आणि इथेच राहायचं हि आमची विनंति समजा. रिमानेही होकार दर्शवला . रीमा आणि राणूआक्का दोघिही नीताच्या घरी पोचल्या . नीताला खूप आनंद झाला ती खूप काळजीत होती कि रीमा गेली ते परत आलीच नाही . पण तिच्या आईने सांगितले होते कि ती राणूआक्कासोबत गेली आहे काही काळजी करू नको . निताचं लग्न झालं आणि रीमा आणि राणूआक्का दोघिही आपल्या राज्यात आल्या कायमच्या . राज्याला राणीसारकर आणि गुरुमाई दोघिही परत मिळाल्या होत्या .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational