JAGDISH SANSARE

Tragedy Thriller

4  

JAGDISH SANSARE

Tragedy Thriller

दिवाळी स्पर्धा

दिवाळी स्पर्धा

2 mins
280


दिवाळी आली,की सगळ्यांना आठवतात ते फटाके ! गणेशचं आणि फटाक्यांचं नातं तर अगदी जुनंच आहे. गणेशचे आणि नागेशचे लहानपण अगदी म्हणजे अगदी गरीबीत गेले गरीबी हा शब्द सुद्धा लाजेल इतकी गरीबी त्यांच्या घरामध्ये गुण्यागोविंदाने नांदत होती. दिवाळी आली की सगळ्यांच्या अंगावर नवेकोरे कपडे असायचे आणि त्यांच्याही अंगावर नवेकोरेच पण श्रीमंतांनी वापरून फेकून दिलेले कपडे यायचे असं वाटायचं की कधी मिळतील ? कोणत्या दिवाळीला मिळतील नवीन कपडे ? 

गावातल्या चौकात अभ्यंगस्नानाच्या दिवशी अख्खं गाव गोळा व्हायचं धम्माल! फटाके फोडण्याची! गणेश म्हणे," गरीब लवंगी माळ सुद्धा सुटी करून फोडायचो एक-एक फटाका फोडण्यात मज्जा यायची आणि बाकीच्यांना माळाच्या माळा लावण्यात मज्जा यायची. पोरांकडे तेव्हांच्या हजारो रूपयांचे फटाके यायचे आणि आमच्या घरात जेमतेम ५० ते १०० रूपयांत दोघांची मांडवली केली जायची. मी माझ्या वाटणीचे फटाके सुद्धा त्यालाच द्यायचो. काहीही म्हणा ! घाबरायचो म्हणा, घाबरत होतो म्हणा किंवा भावाबद्दलचे प्रेम म्हणा ! गणेशचे हे फटाका पुराण नागेशला चांगलेच माहित असल्याने तो दिवाळी जवळ आली, की मोठ्या भावाला आदराने वागवले जात असे. मग त्या माळी सोडायच्या, खिश्यात भरायच्या आणि सकाळी सकाळी फटाके फोडायला अगरबत्ती हातात घेऊन 'राम लखन' घराबाहेर पडायचे. फटाक्यांच्या माळा फोडल्या रे फोडल्या, की नागेश त्या माळेच्या दिशेने धावत जायचा आणि माळ विझायच्या आतच न फुटलेले फटाके तो जमा करायचा आणि आपल्या फटाक्यांच्या पोतडीत एक फटाका वाढवायचा. घरी गेल्यानंतर ते फटाके मोजायचे. दरवर्षी दिवाळीत हे असंच चालायचं. 

   एकवर्षी असं झालं फटाके गोळा करता करता एक फटाका फुटलाच नव्हता आणि तो पेटका फटाका विझलाय असं समजून माझ्या भावाने खिशात घातला. फटाक्याने फटाक्याच काम केलं, दारूने दारूचं काम केलं एका आगीने दुसरी वात पेटवली आणि खिशातले लक्ष्मी, लवंगी असे सगळे फटाके धाडधाड करत खिशातच वाजायला लागले. शेजारच्यांनी दिलेलं शर्ट कधी पेटलं कळलं नाही.'वाचवा,'माझ्या भावाला वाचवा' मी त्याच्या दिशेने धावत गेलो. तितक्यात दत्तू दादा,तो त्याच्या दिशेने धावत गेला.मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने ते नायलॉनच शर्ट टराटरा फाडून टाकला. मला आजही आठवते दत्तू दादा नसता तर आमचा भाऊ माझा नागू ते नायलॉनच शर्ट त्याच्या अंगाला चिकटलं असतं आणि जागच्या जागी उभा पेटला असता.

होता दत्तू,म्हणून वाचला नागू! 

  अर्थात घरी कानाखाली आपटी बार आणि पाठीत सुतळी बॉम्ब फुटला! भाऊ वाचला, हे आईच्या मारा पुढे काहीच नाही! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy