STORYMIRROR

नेहा संखे

Inspirational

3  

नेहा संखे

Inspirational

दिवाळी साजरी झाली

दिवाळी साजरी झाली

4 mins
195

आज मी खूप खूश होते . बॉसने दिवाळीची ऑफिसला पाच दिवस सुट्टी जाहीर केली आणि त्यात दिवाळीचा बोनस सुद्धा भरघोस दिले त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेना . त्याच उत्साहाने मी ऑफिसमधून बाहेर पडले . आज सगळेच जण खूप खूश होते . आज आनंद याचा सुध्दा होते की, खूप दिवसांनी मी आज गावी जाणार होते मुलांना भेटणार होते . आई ,आणि मुलं माझी आतुरतेने वाट पाहत होते . मुलांनी तर चक्क काय काय आणायचे म्हणून यादीच पाठवली होती. कपडे ,फटाके ,खाऊ , खेळणी , गिफ्ट अशा एक ना अनेक गोष्टी त्या यादीत होत्या . आज मी खूप आनंदात होते पाच दिवस मस्त मुलांसोबत , आईसोबत आनंदात घालवायचे मी ठरवले . छानसं मनाप्रमाणे दिवाळी बोनस भेटल्यामुळे यांना एक सोन्याचा दागिना आणि आईसाठी छानसी काठ पदरी साडी घ्यायचे म्हणजे  मुलांसोबत आई आणि हे  सुद्धा खूश होतील असे मी मनाशी ठरवले आणि याच तंद्रीत गाडीला स्टार्टर मारून गाडी घराच्या दिशेने वळवली . संपूर्ण रस्ते दिव्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या रोषणाईने सजून गेली होती . भरपूर ट्राफिक होती सगळ्यांना  ओढ होती ती आपल्या घरी जाण्याची . फटाके ,आकाश कंदील , दिवे यांनी अवघे दुकाने सजली होती  . दिवाळी सणच आहे दिव्यांचा , आनंदाचा ,समृद्धीचा . गर्दी असल्यामुळे गाडीचा वेग थोडा कमीच होता . नेहमीच्या मिठाईवाला कडून पाच सहा प्रकारच्या मिठाई मुलांकरिता घेतल्या . अजूनही भरपूर सामान घ्यायचे होते पण गर्दी असल्याकारणाने गाडी पार्किंगला जागाच नव्हती .  खूप वेळ झाला गाडी पुढे जाईना म्हणून मी खिडकीतून बाहेर डोकावले तर , रस्त्याच्या कडेला दोन चार कुटुंब फुटपाथवर चार भांड्याचा संसार मांडून स्वयंपाक करत होते . दोन चार दगडा मांडून ती माऊली चुलीवर ओबडधोबड पातेल्यात काहीतरी शिजवत होती . शरीरात काम करण्याचे त्राण नसतानाही ती माऊली कपाळाचे घाम पुसत भाकरी थापत होती . तिथेच बाजुला त्यांची मुले जेवणाची वाट पाहत बसली होती . येणार्‍या जाणार्‍या गाड्यांकडे अगदी कुतूहलाने पाहत होते .आकाशात उडणाऱ्या आतिषबाजींना पाहून त्या निरागस चेहर्यावर हळूच हास्य उमलत होते . घामाने काळेकुट्ट झालेले ते कपडे , उन्हाचे चटके लागून भाजलेले ते हाताचे पायाचे तळवे , रडून रडून निस्तेज झालेले ते डोळे त्यांच्याकडे पाहून मी शून्यात गेले . गरिबीमुळे त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद सुद्धा नव्हता . सणासुदीला मॉलमध्ये जाऊन कपडे खरेदी करणे , मजामस्ती करणे ,घर आकर्षक दिसावे म्हणून विविध प्रकारचे साहित्य घेणे अशा एक ना अनेक गोष्टींसाठी लोक लाखो रूपये खर्चत करतात . तर दुसर्या बाजूला आज खायला अन्न नाही म्हणून उपाशी झोपणारे , शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मिळेल ते काम करणारे , रहायला छत नाही म्हणून रस्त्यावर झोपणारे लोकांना पाहून हृदय पिळवटून जाते.  काही घरात भर दिवाळीतही पेटलेला एक दिवा नाही . दरवर्षी आपण दिवाळी नव्या कपड्यांनी, नव्या वस्तूंनी , नव्या दागदागिन्यांनी साजरी करत असतो पण हे गरीब मुलं बिचारी यांची दिवाळी म्हणा की कोणताही सण त्यांच्या नशिबी नसतेच . आई वडील थकून भागून स्वत: चे आणि मुलांचे उदरनिर्वाहासाठी वाट्टेल ते काम करून तर कधी उपाशी राहून जगतात. यांना जगण्याचा यांना सण साजरा करण्याचा हक्क नाही का ? सण आनंद देतात पण आज या मुलांकडे पाहून असा अजिबात वाटलं नाही . हे पाहून मनाला खंत वाटली आज मी माझ्या मुलांसाठी नवीन कपडे , नवीन खेळणी , मिठाई घेऊनही जाईल , हजारो रुपयांचे फटाके सहज आनंदासाठी फोडेन , क्षणभर आनंदासाठी मी एवढ्या पैसे उदळून टाकीन  . हे खरंच योग्य आहे का  ? हे करण्यापेक्षा मी या मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून मी गाडी पार्किंगला लावून त्यांच्या जवळ गेले . मुलांसाठी मिठाई घेतली ती मिठाई त्या लहान मुलांना वाटली . अहो काय तो चेहऱ्यावरचा आनंद लाखो रुपयांचे फटाके जरी आकाशात उडवले असते तरी तो आनंद भेटला नसता हो ! मुलांसाठी आणि यांच्यासाठी बाजूला काढून ठेवलेल्या पैशातून दोन दोन हजाराच्या नोटा मी त्या चार कुटुंबांना दिल्या आणि सहज म्हटलं थोडा दिवाळीचा फराळ म्हणून घ्या . पैसे देत असताना  हा माणूस मस्करी तर करत नाही ना असं त्यांच्या मनात येत होतं . पैसे घेऊ की नको या विचारात ते पडले होते . त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख ,आनंद या सगळ्याच प्रतिक्रिया मला दिसत होत्या . चुली शेजारी बसलेली ती निरागस मुलांशी आई आणि तिचे बाबा अगदी माझ्या पायापाशी येऊन माझे उपकार मानत होते . दोन हजार रूपये म्हणजे जास्त रक्कम नाही ना पण त्या पैशांचं मोल त्यांच्यासाठी अधिकच होतं . ती मुले आनंदाने नाचू लागले .ती माऊली माझ्या पाया पडत म्हणाली अजूनही तुमच्यासारखे लोकं आहेत या जगात यावर आमचा विश्वास बसला . कधीकधी लोक उरलेलं शिळं अन्न इथे फेकून जातात ते खाऊनसुद्धा आम्ही आमचे पोट भरतो काय करणार परिस्थिती करायला भाग पाडते  . आज तुमच्यामुळेच साहेब मी माझ्या पोरांना पोटभर अन्न देऊ शकेल . तुम्ही आमच्यासाठी देवाच्या रूपाने आलात . त्या माऊलीला नमस्कार करून मी तिकडून निघालो . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरंतर माझी दिवाळी साजरी झाली हाेती . मी त्या दिवशी माझ्या मुलांसाठी कपडे न घेता कोणतीच खरेदी न करता घरी परतले . पण मी आज समाधानी होतो माझ्यामुळे कोणाची तरी दिवाळी साजरी होणार आहे या गोष्टीतच मी खुश होते .

आर्थिकदृष्ट्या आपला भारत देश जगात पाचव्या क्रमांकावर येतो तरीही ७०%लोक मात्र गरीब आहेत आपल्या देशात . सरकारकडून मिळणा-या सुखसोयी पासून शिक्षणापासून आजही हे वंचित आहेत . फक्त आकडे वाढून काही उपयोग नाही तर आर्थिकदृष्टय़ा आपला पूर्ण भारत देश समृद्ध असला पाहिजे .देवाच्या मंदिरात जाऊन लाखो रुपयांचं दान नाही केलं तरी चालेल पण या गरिबांची काहीशी मदत केली तर भरभरून आशिर्वाद नक्कीच भेटेल .


आली आली दिवाळी  

पण सगळ्यांच्याच घरी नसते हो  

आरास त्या झगमगत्या दिव्यांची 


फराळ आणि मिठाई ची सजलेली ती दुकाने  

पण दिवाळीत उपाशी असतात काही लेकरं बिचारे  

  

जिकडे तिकडे सजलेली दारे अंगण नि घरोघरी रोषनाई

पण त्यांच्या घरी मात्र रोजची रात्र काळोखी


दिवाळीची खरेदी आमची काही संपत नाही  

पण त्यांच्या अंगावर भर दिवाळीतही आहेत कपडे फाटकी


प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीस

अाणतो घरी सोन्या चांदीचे दागिने भारी  

दोन वेळच्या अन्नासाठी असते मात्र त्यांची रोजचीच मारामारी  


फटाक्यांच्या आवाजाने रस्ते , गल्ली दणाणली  

पण रडणाऱ्या त्या मुलांच्या आसवांची कोणाला नाही किव आली


संपूर्ण घर दिव्यांनी लखलखीत करतानी 

मनातल्या दिव्याला सुद्धा द्या उजाली

करता येईल तेवढी करा मदत त्या उपाशी लेकराची


Rate this content
Log in

More marathi story from नेहा संखे

Similar marathi story from Inspirational