Snehal Gapchup

Inspirational

3.5  

Snehal Gapchup

Inspirational

डोळे

डोळे

1 min
47


शुक्रवार हा तसा इतरांना बाकी वारांसारखाच. त्या वाराचे विशेष महत्व हे IT वाल्यांनाच माहिती. दोन दिवस सुट्टी, एरवी कितीही वैतागलेले असले तरी त्या संध्याकाळी ते खूप खुश असतात. 


अशाच एका संध्याकाळी मी माझ्या व्हॅनची वाट बघत होते. खूप वेळ झाला तरी ट्रॅफिकमुळे व्हॅनचा पत्ता नव्हता. माझ्या जल्लोषावर विरजण पडलं होतं. आता मी पूर्ण वैतागलेल्या अवस्थेत व्हॅन शोधू लागले. स्वतःच्या घराचा रस्ता माहित असूनही असे अवलंबून असणे त्रासदायक झाले होते. सगळ्याचा आणि सगळ्यांचा वैताग यायला लागला होता.


निराशेने इकडे तिकडे बघत असताना एक बस समोर येऊन थांबली. त्यातून काही माणसे उतरली. दोन तरुण मुलं एकमेकांचा हात धारून उतरली. डोळे नसल्यामुळे त्यांचे चालणे हळू होते. बघून वाईट वाटले, यातून सावरते ना सावरते तोच एकटीच एक मुलगी उतरली बसमधून. 


आता मात्र मला सहन होईना, मी पळत तिच्याकडे गेले. विचारल्यावर तिने दुसऱ्या बस स्टाॅपबद्दल सांगितलं. 


माझा हात विश्वासाने हातात धरून ती माझ्या बरोबर येऊ लागली. मध्ये गर्दी असल्याने मी वाट वळवली. ती तितक्याच विश्वासाने माझा हात धरून येत होती. 


काळजात चर्र झाले, मी तिला कुठेही नेऊ शकत होते. बस स्टाॅप आला आणि तिला तिथे सोडून खूप जड मनाने मी माझ्या व्हॅनच्या स्टाॅपला आले.

 

आता मला माझे प्रश्न निरर्थक वाटत होते. पाय व्हॅनची वाट बघून दुखत होते पण मनाला आता वैतागायचीही लाज वाटत होती.


आयुष्याकडे बघण्याची ही नजर तिच्या त्या नसलेल्या डोळ्यांनी मला त्या दिवशी स्पर्शातून दिली. 


Rate this content
Log in

More marathi story from Snehal Gapchup

Similar marathi story from Inspirational