चला आळंदीला
चला आळंदीला
शीर्षक: चला आळंदीला
चला जाऊ आळंदीला
पाहू ज्ञानोबा राजाला||धृ||
योगियांचा राजा खास
हृदयी साठवू त्यास
भेटू आज माऊलीला. १
योगियांची हि माऊली
धरी कृपेची सावली
नमस्कार करु त्याला २
क्षेत्र आळंदी महान
आम्ही लेकरे लहान
वंदू अगाध ब्रम्हाला ३
गीता सांगे मराठीत
केली सर्वांवर प्रीत
तारीले मूढ जनाला. ४
आलो शरण तुजला
कृपा दान दे मजला
आळवितो ज्ञानोबाला ५
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे
