STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

चाचा चौधरी आणि शेरलॉक

चाचा चौधरी आणि शेरलॉक

2 mins
226

राणी पद्मिनी चा हिऱ्याचा हार राज महालातून गायब झाला सगळीकडे शोधा शोध करण्यात आली राणी तर तिचा मनपसंद हार चोरीला केला म्हुणुन रडत होती शेवटी चाचा चौधरींना फोन लावण्याचे ठरले 

त्याचवेळी शेरलॉक होम्स भारत दौऱ्यावर होता आणि आज त्याचा पाहुणचार चाचा च्या घरी होता 

"शेरलॉक बिंदास हा आपलेच घर समज " "

"एस माय फ्रेंड "

शेरलॉक छोले भटुरे वर ताव मारत असताना फोन ची रिंग आली चाचा नि फोन घेतला 

"हॅलो "

"हॅलो चाचा, राजमहालातून बोलतोय "

"बोला" 

"चाचा लवकर या राणीचा हिऱ्याचा हार चोरीला गेलाय" 

"काय ? कधी "?

"आजच "

"बरं येतो मी "

"बरं शेरलॉक एक काम आलाय मला मी निघतो तूच निवांत होऊ दे" 

"अरे काय झालं चोरी कि खून "?

"चोरी राणीचा हिऱ्याचा हार चोरीला गेलाय "

"काय "?

"हो "

"थांब मी पण येतो "

"अरे कशाला "

"अरे तुमच्याकडल्या केसीस पण पाहूया "

"चला तर शेरलॉक साहेब "

चाचा आणि शेरलॉक राजमहालात पोहोचले 

"या या चाचा"

"कुठून नाहीसा झाला हार राणी "?

चाचा नि प्रश्नावली सुरु केली तो पर्यंत शेरलॉक ने कपाटाची झडती घेतली 

"मी माझ्या कपाटातच ठेवला होता आणि कपाट बंद होते "

"मग कोणी आले होते का तुमच्या खोलीत "

"माझ्या दासी शिवाय कोणीच नाही "

"दासी कुठे आहे तुमची "?

"दासींची झडती सुरु झाली "

थोडा वेळानंतर शेरलॉक आणि चाचा चर्चा करू लागले आणि त्यांनी चोराला पकडले 

"महाराज चोर सापडला" 

"कोण आहे चोर "?

"महाराणी "

"काय चाचा हे काय बोलताय "

"हो महाराज ह्या खोलीत त्याच्या दासी शिवाय कोणीच येत नाही वर तेचि कपाटाची किल्ली नेहमी कमरेस असते "

"आणि शेरलॉक सांग.... "

"एस माय फ्रेंड आणि हि कपाटाखाली टाकलेली रिकामी डब्बी "

"बरोबर" महाराणी

"मीच ठेवला होता लपवून. मला नवीन हार हवा होता म्हणून मी नाटक केलं. मला माहित आहे महाराज असे सांगितले तर ऐकणार नाही "

"महाराणी काय केलंत हे "

"येतो महाराज आमचं काम झालं आता तुमचं तुम्ही सांभाळा चल शेरलॉक "


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action