भारतमातेची आपण लेकरे
भारतमातेची आपण लेकरे
सामाजिक न्यायाची धरूनी कास
घडवून आणू देश विकास
सामाजिक न्यायाची धरूनी कास
घडवून आणू देश विकास
हा जाती भेद विसरू, एकीचा ध्वज उभारू,
भारत मातेची आपण लेकरे सारी। .....।।ध।।
कित्येक नेते लढले ,धारातीर्थी पडले
स्वातंत्र्यासाठी त्यांनी जीवन अर्पीले
त्यांचे स्मरण करू ,स्वप्ने साकारू ,
भारत मातेची आपण लेकरे सारी.......।।
टिळक आगरकर गांधी सावरकर
ध्येया साठी लढले नेते धुरंधर
गेले प्राण आपले हरू, मागे ना कधी सरू ,
भारत मातेचे आपण लेकरे सारी ..........।।
भावी पिढीच्या हाती देशाची प्रगती
सोपवून गेले भविष्य धुरा हाती
समतेची गुढी उभारू, लोकशाहीला तारू .
भारत मातेची आपण लेकरे सारी ............।।
जाणा सारे आज विज्ञानाची नांदी
शिक्षणा वाचून नाही सार्थक जीवनामधी
घेऊन शिक्षणाचा ध्यास, करू समाज वि
हा जाती भेद विसरू, एकीचा ध्वज उभारू,
भारत मातेची आपण लेकरे सारी। .....।।ध।।
कित्येक नेते लढले ,धारातीर्थी पडले
स्वातंत्र्यासाठी त्यांनी जीवन अर्पीले
त्यांचे स्मरण करू ,स्वप्ने साकारू ,
भारत मातेची आपण लेकरे सारी.......।।
टिळक आगरकर गांधी सावरकर
ध्येया साठी लढले नेते धुरंधर
गेले प्राण आपले हरू, मागे ना कधी सरू ,
भारत मातेचे आपण लेकरे सारी ..........।।
भावी पिढीच्या हाती देशाची प्रगती
सोपवून गेले भविष्य धुरा हाती
समतेची गुढी उभारू, लोकशाहीला तारू .
भारत मातेची आपण लेकरे सारी ............।।
जाणा सारे आज विज्ञानाची नांदी
शिक्षणा वाचून नाही सार्थक जीवनामधी
घेऊन शिक्षणाचा ध्यास, करू समाज विकास .
भारत मातेची आपण लेकरे सारी............।।
130 कोटी जनता सारे मिळून आता
उद्योगा लावूया जगन्नाथ हाता .
लावू देश उभाराया, गगनी तिरंगा फडकाया.
भारतमातेची आपण लेकरे सारी ..............।।
