बापाने मुलीला लिहिलेले पत्र
बापाने मुलीला लिहिलेले पत्र
माझ्या बाळा कशी आहेस ग तू? विसरलीस का ग ह्या बापाला, आठवण तरी येते का कधी ? जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पहायचीस घरी यायची. केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्या बरोबर खेळेल, आठवतं का तुला माझ्या हाताला हाथ धरून चालायला शिकली होतीस. जेव्हा तू धडपडून पडायचीस तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबा होता, जेव्हा तुला थोडं जरी झखमा होईच्या ह्या बाबाला जास्त त्रास होईचा. ऑफिसमधून लेट झालं तरी तू माझी यायची वाट पहायचीस किती काळजी घ्याचीस आपल्या बाबाची, जेव्हा मी दुःखात असायचो तेव्हा तू मला हिम्मत द्यायचीस. तू तर माझ्यासाठी मुलगा होतीस जो नेहमी मला दुखासुखात आणि कठीण परस्थितीत माझी साथ देणारी.
जेव्हा लहान होतीस ना तेव्हा तुझ्या लग्नाची स्वप्नं बगत होतो. पण असं होईल कधीच वाटलं नव्हतं. एकच तर इच्छा असते एका बापाची आपल्या मुलीचं कन्यादान करावा, पण ते देखील हिरावून घेतल माझ्याकडून या काळाने. तू आयुष्यभर खुश राहावं हीच ह्या बाबाची इच्छा.
बाळा तुझ्या आईला आणि लहान भावाला शेवटपर्यंत माझी कमी भासली नाही पाहिजे तेवढी त्यांना साथ दे. माझं स्वप्नं काय ह्या जन्मी पूर्ण नाही झालं पण बाळा मला तुझ्याकडनं एक वचन हवं आहे. ह्या जन्मी जे झालं नाही ते मला पुढच्या जन्मी हवं आहे. मला पुढच्या जन्मी तूच माझी मुलगी हवी आहेस आणि पुढच्या जन्मी जे माझं स्वप्न अधुरं राहिला कन्यादानाचं ते पूर्ण होईल. येशील ना गं माझी बाळ बनून परत..? सावरशील ना गं ह्या बापाला आणि करशील ना आपल्या बापाची इच्छा पुरी तुला बघण्याची तुझ्यासोबत खूप गप्पा मारण्याची खूप इच्छा होती.
माझी जायची वेळ जवळ आली आहे मी गेल्यानंतर आईला, भावाला खूश ठेव बाकी मला काही नको आणि तू आयुष्यभर खूश राहा हेच मागणं...
*तुझा..........बाबा.*
