बालपणीच्या आठवणी.
बालपणीच्या आठवणी.


आजचा विषय आठवण. म्हणून बालपणीची माझी एक आठवण आहे ती आपल्यासमोर मांडतो.
लाहानपनी मी खट्याळ होतो. रोज घरी काही न काही कारणावरून भांडण घेऊन यायचो. आणि रोज घरी भांडण घेऊन येतो म्हणून आई ला रोज माझी बाजू घेणे शक्य नव्हते. उलट माझ्यावरच तिचा हात चालायचा आणि आहे नाही तो सर्व राग माझ्यावर काढायचा असा जणू पवित्राच होता. बरं आईचे मारणे सोप्पे नसायचे. हातात येईल त्या वस्तूने ती मला कुटून काढायची. यावर मला एक नामी युक्ती सुचली की आईने थोडे जरी मारले तरी खूप गोंधळ घालायचा आणि खूप आरडाओरड करायची जेणेकरून गल्लीतील लोक मला वाचवायला येतील. आणि झालेही तसेच. परंतु माझा हा गनिमी कावा जास्त दिवस टिकू शकला नाही. लोकांच्या ही गोष्ट लक्षात येऊन गेली की याच्या आईने याच्यावर हात जरी उगारला तरी हा खूप आरडा-ओरड करतो. शिवाय त्याला वाचवायला गेलो तर त्याची आई आपल्यावरच ओरडते. म्हणून त्यांनी माझ्या मदतीला धावून येणे सोडले. आता माझा राग ना माझ्या आईवर असायचा नाही ज्याच्यासोबत भांडण झाले त्याच्यावर. तर तो असायचा गल्लीतील लोकांवर. मग एवढा आरडा-ओरड करूनही ते मदतीला धावून येत नसायचे मग राग शांत तरी कसा करायचा? तर तो शांत करायचा त्यांना शिव्या देऊन. हो हो शिव्या देऊन. त्याच लोकांना शिव्या द्यायचो. "आता कुठे गेले हारामखोरांनो? आता या ना वाचवायला, तुमच्या पोराला असेच मार खाऊ द्याल का? लाज वाटू द्या भडखाऊंनो". ह्या आणि ह्याहूनही ब्रँडेड शिव्या द्यायचो. त्यांना पेच पडायचा याला वाचवायला गेलो तर याच्या आईच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि नाही गेलो तर याच्या शिव्यांना.
अश्या पद्धतीने घरच्यांना आणि बाहेरच्यांना बुचकळ्यात पाडत पाडत माझे आयुष्य गेले. लहानपणीच्या आठवणी खूप हसवतात. तर कधी कधी रडावतातही.