अपना टाइम आयेगा
अपना टाइम आयेगा
आज सकाळी मी माझ्या कार ने प्रवास करत होते.गावाकडून लातूरकडे जाताना पाठीमाघून एक कार मला ओव्हरटेक करून पुढे आली. मनात राग आला नाही.आणि त्या कार कडे पाहत सहज लक्ष गेले ते म्हणजे त्या कार च्या पाठीमागच्या काचेवर. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं “अपना टाइम आयेगा”।।
आणि मी स्मित हास्य केलं.मनात विचार तरळू लागले की भावाचा सध्या टाइम खराब असेल आणि तो त्याचा चांगला वेळ येण्याची प्रतीक्षा करत असेल.मला ते वाक्य आवडलं आणि मी विचार केला की मीही कार वरती ते वाक्य पेंट करून घेणार.कारण मी ही सध्या वाईट काळातून सफर करत होतो.परिस्थिती थोडी कोलमडून गेली होती.मदतीचे हात आता कमी झाले होते,एकंदरीत वाईट परिस्थिती तुन जीवनाची वाट शोधत दिवस काढत होतो.
गाडी चालवत विचाराचे डोंगर माघे लोटत होते.आणि स्वप्नाच्या नगरीत रंगून गेलो की, मी ही गाडीवर्ती “अपना टाइम आयेगा” हे वाक्य पेंट केलं आहे .आणि आता मस्त वाटत आहे की, आता आपला चांगला वेळ येईल.वाईट वेळ निघून जाईल व चांगला वेळ येईल.दिवसा माघून दिवस जात होते. मी रोज कार पुसताना ते वाक्य वाचून आनंदी होत होतो.थोड्या वेळेसाठी का होईना खुश होत होतो.
ठरल्या प्रमाणे दिवस त्याच्या वेळेला उगवत होता व मावळत होता.मी हातातल्या घडीकडे बघून दिवस काढत होतो की “अपना भी टाइम आयेगा” ,पण कसा येईल, कधी येईल,काही कल्पना न्हवती.दिवसामाघून दिवस गेले ,दिवसाचा महिना झाला,महिन्याचा वर्ष होत आला,निसर्ग ठरल्याप्रमाणे त्याची भूमिका बजवत होता . पण माझा वेळ अजून आला न्हवता.मन पुन्हा निराश झाले ,एकांतात बसलो व विचार केला की “अपना टाइम आयेगा” ह्या गोष्टीत गुंतून गेलो व हातातली वेळ ही घालवून बसलो,जी अमूल्य वेळ होती,जी कधीच कोणासाठी थांबत न्हवती,जी वेळ पैसे कितीही दिले तरी पुन्हा मिळणार न्हवती, ती वेळ मी वाट पाहत बसून वाया घालवली.मनाला स्वतःचा खूप राग आला.वय वाढलं, वेळ निघून गेली,पण अपना टाइम आला नाही.पुन्हा लक्ष्यात आलं की अपना टाइम कधीच येत नसतो, सूर्य रोज उगवतो रोज मावळतो,सेकंद पुढे पुढे जाऊन मिनिटं होतो, मिनिटांचा तास होतो ,तासाचा दिवस,दिवसाचा आठवडा ,आठवड्याचा महिना व महिन्याचा वर्ष,,हे कोणासाठी थांबत नाही.ज्या वेळी सूर्य उगवला त्यावेळी आपला वेळ चालू झाला.चालू वेळेतच जगून घ्यावं . परिस्थितीशी लढावं.आणि हसत सांगावं की अपना टाइम आयेगा नही, “अपना टाइम चालू है” ह्या धडधडणार्या ह्रदयाचे ठोके जेव्हा बंद होतील तेव्हा ही आपल्यासाठी ही वेळ थांबली नसेल ती चालूच राहणार आहे.
माघून पुन्हा एका कारने पुढे जाण्यासाठी हॉर्न दिला.तेव्हा कुठे विचारांचा काहूर शांत झाला.”अपना टाइम चालू है” ह्या वाक्याच्या प्रेरणेने ताजे तवाने वाटले ,कार पुन्हा टॉप गियर मध्ये टाकली व माझा वेळ,अपना टाइम जगण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी नव्या उत्साहाने पुढे भरारी घेतली.
