Neha Sankhe

Tragedy Fantasy

3.3  

Neha Sankhe

Tragedy Fantasy

अलक

अलक

1 min
336


वर्षा मागे वर्ष लोटत होते. पोलीस स्टेशनच्या चकरा खाऊन तिचे पाय झिजले होते. पोलीस स्टेशनची पायरी चढताना आज काहीतरी माझ्या मुलाविषयी कळेल या आशेने प्रत्येकवेळी तिची निराशाच होत असे. त्या मातेचा हंबरडा पाहून पोलीसही गहिवरून जात होते पण ते सुद्धा काय करणार सुशांतचा काही पत्ताच लागत नसे. रेल्वे स्टेशनच्या बाजूला झोपडीत राहणाऱ्या सुशांत दहा-बारा वर्षाचा " मी शाळेत जाऊन येतो ग आई " असे म्हणून गेला तो आजही आला नाही. कितीकाने सांगितले तो नाही येणार तो मरून गेला असेल. पण आईची वेडी माया आस धरुण बसे. असेच वर्षा मागे वर्षे लोटत गेले पण पांढरे होऊनही त्या मातेचे केस मुलगा येईल या विश्वासावर जगत होती. शेवटी एके दिवस काळा कोट घातलेला जेंटलमॅन म्हातारी समोर उभा राहिला आणि म्हणाला, "आई ओळखतेस का ग मला ? " तिचा सुशांत आज वकील होऊन तिच्यासमोर आला. त्या मातेचा विश्वास खरा ठरला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy