ते चिखलात रुतलेले कमळाचे फुल
ते चिखलात रुतलेले कमळाचे फुल
आकाशात उंच भरारी घेणारा तहानलेला पक्षी पाणी पिण्यासाठी तळ्याकडे आला . मन भरून पाणी प्यायले आणि तो तृप्त झाला . आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला, " किती छान दृश्य आहे हे ! " तेवढ्यात त्याची नजर त्या सुंदर मोहक कमळ फुलाकडे गेली . ते गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अतिशय सुंदर जणू काही लक्ष्मी त्याच्यावर साक्षात विराजमान आहे असे भासत होते . नकळत ते पक्षी कमळाच्या फुलाकडे आकर्षित झाले आणि त्याला जाऊन म्हणाले , " तू किती सुंदर आहेस ." त्यावर कमळाचे फुल स्मित हास्य करीत म्हणाले , " ही तर ईश्वराची कृपा आहे माझ्यावर त्यांनी मला इतके सुंदर बनवले ." हे ऐकताच पक्षी लगेच म्हणाले , " ही कसली कृपा , ही तर शिक्षा आहे . तू इतका सुंदर असूनही तुझे पाय चिखलात रुतलेले आहे . मला बघ मी उंच आकाशी उडतो मला अडवणार टोकणाऱ्या माझ्यापर्यंत पोहोचणारा कोणीच नाही पण तू तर त्या चिखलात रुतलेल्या तुझ्या पायामुळे तुझे सौंदर्य जगाला दाखवूच नाही शकत मग अशा सौंदर्याचा काय उपयोग ? " .
पक्षाचे हे बोलणे कमळाचे फुल शांतपणे ऐकत होते . याचे त्या पक्षाला नवल वाटले तरीही तो पुढे बोलत राहिलं "या चिखलाने तुला बांधून ठेवलं आहे मग मला तू सांग कसा रे तुझ्यावर भगवंताची कृपा असं तू म्हणतोस ? "
आता कमलाने बोलण्यास सुरुवात केली , " मग तर माझ्यावर भगवंताची अतिशय जास्त कृपा म्हणायची मीसुद्धा जर तुझ्यासारखा आकाशात उडू लागलो असतो तर मीसुद्धा तुझ्यासारखा स्वार्थी गर्विष्ठ झालो असतो आपल्या मातीची जाण मला नेहमी रहावी म्हणून कदाचित मला भगवंताने चिखलात रोवून ठेवलं . " हे कमलाचे शब्द ऐकताच पक्षी रागाने फडफडू लागले जणू काही कोणी त्याला आरसाच दाखविला . कमळ फुल पुढे म्हणाले , " तू जरी उंच आकाशी ऊढत असले तरी विश्रांतीसाठी मूळ मातीत रोवलेले त्या झाडांच्या फांदीवरच बसतो . रात्री तेच झाडं तुला आसरा देतात आणि तहान लागल्यावर हेच मातीतलं तळ तुला पाणी देतो मग एवढा गर्व अभिमान कसला रे बाळगतो . जन्माला येतो आणि मरताना मातीत मिसळून जातो मग मातीत राहायला का कमीपणा मानतोस ? माझे आणि मातीचे इतके घट्ट नाते आहेत याचे मी अभिमान बाळगतो . बघ ना माझे पाय इतके चिखलात रुतलेल्या असतानाही देवाच्या चरणी जाण्याचे मानही मलाच आहे मग सांग ना मी नशीबवान का नाही ? चिखलात रोवलेले माझे पाय मला नेहमी या गोष्टीची आठवण करून देत असतो की मी याशिवाय अपूर्ण आहे ही जाणीव आपल्या सगळ्यांना असलीच पाहिजे . " कमलाचे हे शब्द ऐकताच पक्षी नि शब्द झाले हाेते . पक्षी नंतर म्हणाले , " मला माझ्या पंखांचा इतका गर्व झाला होता की मी पूर्णत विसरून गेलो होतो . मातीही आपली आई आहे आईला सगळ्यात वरचे स्थान असते त्यामुळे तुझे मी मनःपूर्वक आभार मानतो कारण तू आज माझ्या डोळ्यांवरचा अंहमपणा दूर केेलास.
हे शरीर नश्वर आहे सर्वांना मातीतच विलीन व्हायचे आहे मग गर्व कसला करता . अभिमान कसला बाळगता . लाखो रुपयांची विकत घेतली चप्पलाची जोड पायातच वापरतो आपण आणि दहा रुपयाचे गंध कपाळी लावतो पण भगवंतानेेे ज्याला त्याला जेवढी तेवढी किंमत ठरवून दिली आहे त्याचा सतत स्वीकार करुन आनंदी राहा दुसऱ्यालाही आनंद घ्या .अहंमपणा बाळगाल तर विनाश होईल .
