अलक -1
अलक -1
अलक- 1 अ ब क ड शिकायचंच असं तिने मनापासून ठरवलं. आणि शिकता शिकता एके दिवशी तिने काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेलं 'त्याचं' साधं नाव - 'पवन' लिहिले. पण.... धुळपाटीवर . वादळ, वारा, पाऊस तर कधी सांडपाण्याने ते पुसलं, धुतलं जावू लागलं....... मग एके दिवशी ती यात्रेत गेली व 'त्याचे' नाव तिने अखेर गोंदवूनच घेतले. लतिका चौधरी दोंडाईचा, जि. धुळे
