STORYMIRROR

Vighnesh Warang

Inspirational

3  

Vighnesh Warang

Inspirational

अगाध तव करणी देवा!!

अगाध तव करणी देवा!!

2 mins
289

      रामपूर गावात सिता नावाची एक चतुर मुलगी हसतखेळत राहायची .तिच्या घरातले सगळेच शिक्षित होते.त्यामुळे सगळेच तिची चांगली जोपासना करायचे. सिता जेवढी हुशार होती तेवढेच तिला स्वच्छ राहायला फार आवडायचे.घरी,शाळेत,आजूबाजूच्या परिसरात ती अतिशय स्वच्छता राखायची म्हणून सगळेच तिचे कौतुक करायचे.तिच्या घराच्या परिसरात तर एक कागदाचा तुकडादेखील दिसायचा नाही,आणि ती वैयक्तिक स्वच्छतादेखील राखायची.


      सिताच्या घरापासून जरा लांबच त्यांची दोन-तीन गुंठे जमीन होती.ती पडीक होती.पण या दोन-तीन वर्षात सिताने त्या जागेच्या एका बाजूला रांगेत फुलझाडे लावली होती.ती फुलझाडे आता मोठी झाली होती आणि त्यांच्यावर टवटवीत फुलेही आली होती.त्या फुलांना पाहून सिता भरपूर खुश झाली.पण त्याच जागेवर इतरत्र निरुपयोगी छोटी झाडे,गवत उगवले होते.असं गवत गावात कुठेच नव्हतं.ते गुरांना चरण्यासाठी पूरक होत.परंतु सिताला ते आवडायचे नाही.सिता ते उपटून काढत असे.पण नंतर दोन-तीन दिवसात पुन्हा त्यांची वाढ व्हायचीच.सिता ते गवत काढून-काढून कंटाळली,आणि एक दिवस आईला जाऊन म्हणाली,

   "आई त्या आपल्या मंदिराजवळच्या जागेवर मी काही फुलझाडे लावली आहेत,पण तिथे आजूबाजूला फार गवत आलं आहे.मला तर काढून-काढून कंटाळाच आलाय.मी तर आता बाबांना गवत मारून टाकण्याचं औषधच फवारायला सांगणार आहे."

   त्यावर आई म्हणाली, "तू चुकीचं बोलत आहेस.ती आपली वडिलोपार्जित जागा आहे.तू तिथे फुलझाडं लावलीस ते चांगलं केलंस.पण त्या गवताचं आपल्याला नुकसान तर होत नाही.उलट तो चारा कित्येक पशुपक्ष्यांच्या मुखात जातो .हे तुला कळलं पाहिजे!ते नष्ट करून तरी तुला काय मिळणार आहे?"

  "तस नाही पण मला तर त्याचा फायदा वाटतच नाही.",सिता म्हणाली.

त्यावर आई म्हणाली,"कसा नाही फायदा?हेच गवंत,हाच चारा गाई-गुरे ,शेळ्या खातात.आणि आपल्याला दूध देतात.या दुधापासूनच आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवतो.यावर बसलेले छोटे किडे खाऊन पक्षी आपली भूक भागवतात.गवताची मुळ जमिनीची धूप रोखतात."

   "बरोबर आई,तुझं म्हणणं आता मला पटलं.मी पुन्हा नाही उपटणार ते!",सिता म्हणाली.

   "सिता हे बघ,पर्यावरणात ,निसर्गात निर्माण झालेली गोष्ट ही देवाने काहीतरी विचार करूनच बनवली आहे.त्यांना मारण्याचा हक्क आपल्याला नाही.उलट आपण त्यांचं संवर्धन करावं!कारण ते आपल्या भल्यासाठीच आहे.तुझ्यासारख्या अनेक मुलानी असं गवत, चारा, छोटी -छोटी झाडे नष्ट केली तर अनेक गाई-गुरे,पक्षी मृत्युमुखी पडतील,आणि हे तुला आवडेल का?"आईने सिताची समजूत काढत म्हटले.

    सिताने नाही म्हणत आईला घट्ट मिठी मारली.तिला तिची चूक उमगली आणि ती म्हणाली, "आई मला हे कधी कळलंच नाही.तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे.परमेश्वराने सारे विश्व विचार करूनच निर्माण केले आहे.'अगाध तव करणी देवा अगाध तव करणी'."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational