आयुष्याचे शेवटचे पान
आयुष्याचे शेवटचे पान
आयुष्य जीवनातील प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवत राहत, ते किती हि चांगल्या प्रकारे जगले तरी प्रत्येक वेळी आनंद मिळत नसतो , कधी - कधी पदरी निराशा हि येते .आयुष्यभर इतरांसाठी जगता – जगता एक दिवस तेच त्यांना कधी परके होतात कळतच नाही . ज्या मुलांसाठी आई – वडील आयुष्य वाहुन टाकतात ते मुले त्यांना अधांतरी सोडून का जातात? समाजात नेहमीच त्या थकलेल्या चेहऱ्यावर दु;ख दिसते जीवनाचे रस्ते पार करता – करता अखेर शेवटच्या वळणावर त्या म्हाताऱ्या आई – वडीलांना दु;खाचे दिवस त्यांचीच मुलं दाखवतात घ्या सर्व गोष्टीने मन सुन्न पडते
आयुष्याची वाट शेवटची
का दु;खाची होऊन जाते
तुटलेल्या काळजाला का
आणखी तोडून जाते .
संपते ती एक – एक पाने आयुष्याची
शेवटचे पान का जीवनाचे
आसवांनी भिजून जाते .
मुलांची स्वप्न पूर्ण करता – करता आयुष्याची पाने कधी भरभर उडत गेली कळतच नसत .त्या पानांवर झळकणारे सुख – दु;खाचे आसवे मात्र तसेच उमटून जातात. आज त्या भिजलेल्या डोळ्यांनी आजोबा आयुष्याची पाने उलटून पाहत होते आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलांना मोठं घडवल होत .मुलांना त्यांची आई नसण्याची कधी उणीव त्यांनी घेऊ दिली नाही . आजोबा त्यांना कधी आई सारखे तर कधी वडील सारखे प्रेम द्यायचे , पण जेव्हा पासून ते निवृत्त झाले तेव्हा पासून जणू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच हरवलं होत काल पर्यंन्त सुना, नातवंड व मुलांना अनमोल वाटणारे त्याचे प्रेम आज नकोस वाटत होत .आता आजोबा एकटेच पडायला लागले घरात केव्हा बाहेर फेरफटका मारावा आणि समोरील त्यांच्या जिव्हाळयाची बाग इतकेच मर्यादित उरून पुरलं होत त्याच आयूष्य, जेवढ प्रेम त्याच मुलावर होत तेवढेच त्या बागेवर हि घरात उदास वाटले कि ते बागेत सुखाचा श्वास घ्यायचे .त्याच असणे वा नसणे यावर सुध्दा त्यांना काळजी नसायची सुनेला जर चुकून पाणी मागितले तर ती चटकन उत्तर द्यायची
‘’घरीच तर असता तुम्हाला तेवढ हि करू नये का
इतकच काम नसतात आमच्या मागे ‘’
असे बोलून ती निघून जायची. आजोबा मात्र नुसत बघत राहायचे. आजोबांचा प्रत्येक दिवस दु;खात उगवत असायचा व आसवांच्या पुरात डुबायचा ते सर्वासोबत प्रेमाने बोलू पहायचे व पण बदल्यात त्यांना केवळ तिरस्कारच मिळायचा. त्याच्या शेजारी एक सुखी कुटुंब राहायचे जे आजोबांवर जीवापाड प्रेम करायचं आजोबा त्यांच्या वडीलसारखे वाटायचे. त्याच्या बाळाला आजोबांचा फारच जिव्हाळा लागला होता. त्या बाळाच्या सहवासात आजोबांचे दिवस हि आनंदात जाऊ लागले हिते, त्याच्या हसण्याने, बोबड्या बोलाणे आजोबांच्या आयुष्यात जणू वसंत आला होता .
एकदा हे शेजारी कुटुंब परगावी गेले, काही दिवसातच परतणार होते, त्यांनी आजोबाना ही सोबत येण्याचा हट्ट केला पण आजोबाने स्वताच्या घरीच राहणे पसंद होते. .ते बाळ त्याचा दूर गेल्याने त्यांना पुन्हा एकटेपणाची जाणीव झाली होती असेच विचार करीत असतांना त्यांना चक्कर आला व ते बागेत पडले संध्याकाळ
पर्यंत ते तसेच पडून होते. रात्रीला त्यांचा मुलगा घरी आला ..व तो आजोबांची विचारपूस करू लागला आजोबा घरी कुठेच दिसत नव्हते ,त्यांनी घाबरून त्यांची विचारपूस केली.पण आजोबा कुठे मिळेना ते आजोबाना शोधत होते ,शेवटी बागेत जाऊन पहिले तर आजोबा बेहोष पडून होते त्यांना उचलून घरात आणले, डॉक्टर ला दाखवले .
‘घरातच राहायल नको का बाबा तुमच्या मुळे किती त्रास झाला आम्हाला’ अस मोठ्याने मुलगा बोलत होता.
‘अहो त्यांना आपल्याला कसा त्रास दिल्या जाईल इतकेच माहित आहे’
सुनेने सासर्याकडे पाहत म्हटले. आजोबांच्या तब्येतीची कुणालाच काही पडले नव्हते, ते तर त्यांना झालेल्या त्रासाप्रती आजोबांशी वाद घालत होते .आयुष्यातील झालेलं हे म्हातारपण नावच ओझ सगळ्यांना नकोस झाल होत. आजोबा आता बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते, जीवनात आलेलं वादळच त्यांना पुरेस होत. आजोबा त्या अंधार असलेल्या खोलीत तसेच पडून होते, रडत आसवे पुसत..त्यांचे आसवे पुसण्यासाठी कोणीच नव्हते .हवा जोरात येत वाहत होती झाडावरची सुकलेली पण गळत होती त्यांच्या खोली समोरील बगीचा त्यांना दुरूनच दिसत होता ,ती रात्र त्यांना फारच भयाण वाटत होती ,आयुष्यतील चढ –उतार त्यांना दिसत होते ,मुलाने आपल्या जवळ यावे आपल्या सोबत दोन शब्द बोलावे प्रेमाने, अस त्यांना मनोमन वाटत होते. सकाळ झाली होती. आजोबान घरातील नोकरांच्या भरोश्यावर सोडून त्यांची मुल सुना बाहेरगावी फिरायला गेली होती. इकडे आजोबा मुलाला डोळेभरून पाहण्याच्या वाटेवर होते, आजोबा मुलाच्या य्र्ण्याची वाट पाहत होते. त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने भरत आली होती. त्यांच्या कडे आयुष्यची थोडीच क्षण बाकी होती. त्या पाणावलेल्या डोळ्यांना ती वाट कोरडीच वाटत होती, बाहेर गावी गेलेले त्यांचे शेजारी कुटुंब परतून घरी आले होते .त्यांना आजोबा कुठेच दिसत नव्हते ,त्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती पडली ते धावत पडत आजोबाकडे आले, आजोबाना मात्र तो आपलाच मुलगा वाटला ते शेजारील व्यक्तीसोबत मुलगा समजून भरभरून बोलत होते, त्यांचे प्रेमळ बोल एकूण शेजारी गहिवरून आले होते, त्यांना वडिलासारखा वाटणारा मायेचा आधार दूर जाणार होता पण नियतीने डाव साधताच आजोबांचे एकटेपणाचे जगणे कायमचे दूर झाले होत .जगाला नकोसे वाटणारे आजोबा आज मात्र नियतीला आपलेसे वाटले होते
दोन शब्द प्रेमाचे एवढेच त्यांना हवे होते
दुरावलेल्या मुलांसाठी नजरेत प्रेम होते
क्षण निसटत होते दूरदूर असे
पाहता पाहता त्यांचे श्वास मिटले होते
आजोबा गेल्याचे माहित पडताच सर्वच रडत धावत –पडत आले होते ,पण त्या रडण्याल्या काहीच अर्थ नव्हता .त्यांच्या रडण्याला पाहून मात्र शेजार्यांनी त्यांना चांगलाच जाब दिला मुलांना मात्र आत पश्चाताप झाला होता पण त्या पश्चातापाला काहीच अर्थ नव्हता .
म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पान वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये? म्हातारपण म्हणजे भिजलेल्या पापण्याचेच का असते? हृदयात असंख्य दु:खाचे आसवे का वाहतात? शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुर्लक्षित करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा ..............