STORYMIRROR

Adv Vishakha Samadhan Borkar

Others

3  

Adv Vishakha Samadhan Borkar

Others

बाबासाठी प्रत्येक दिवस लेकीचाच

बाबासाठी प्रत्येक दिवस लेकीचाच

2 mins
805


सकाळी नेहमीप्रमाणे मोबाईल घेतला आणि बघते तर अनेक लोकांच्या daughters day च्या शुभेच्छा आल्या .तेव्हा बाबाची आठवण आली आज बाबा  असते तर .....हा विचार मनात निर्माण झाला .खर तर आई- बाबांसाठी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस  हा फक्त लेकीचा आणि लेकीचा असतो.त्या दिवसाला कोणतीच बंधन नसते.पण आयुष्यात असाही दिवस असावा जो दिवशी केवळ त्यांच्या लाडक्या मुलींचाच असावा . सकाळपासून व्हॉटसअप वर फेसबुक वर स्टेटस वर जिकडे तिकडे ,बाबा आणि मुलीचा सुंदर फोटो आणि मोठ्या कौतुकाने लेकीला daughters dayच्या शुभेच्छा देणारे त्यांचे प्रेमळ बाबा असे चित्र पाहायला मिळत आहे .खूप छान वाटले हे सर्वच पाहून माझे मन क्षणभर सुन्न झाले, खरचं वेगळंच नात असत आयुष्यात आई बाबा आणि मुलींचे.मुलींचे ते निरागस हसणे त्यांना नेहमीच आवडत.मुलींचे लाड पुरविणे तर बाबांच्या आवडीचा विषय असतो.त्याच्या हसण्यात त्यांचा आनंद लपलेला असतो.आई वडिलांना फार कौतुक असत मुलीचे.त्यांनी नाव मोठे केले की त्यांनां वाटणारा आनंद जगात कोणालाही वाटेल या पेक्षा खूप मोठा असतो.अश्या लाडक्या असतात मुली आई वडिलांना.त्यांचे प्रेम कधीच न थांबणारे......लेक म्हणजे अंगणातील आनंद वाटतो.

लेकीच्या त्या पहिल्या पावलापासून त्यांचे कौतुक त्यांच्या आयुष्यात नवीन बहर

आणते,आई वडील भरभरून प्रेम करतात त्यांच्यावर, आणि या पूर्ण रेशमी नात्यांच्या बंधनात अनोखं नातं असत ते बाप अन् लेकीचे,बाबा म्हणजे लेकीच्या रडण्या हसण्याचे हक्काचे स्थान,बाबा म्हणजे लेकीसाठी रसण्या फुगण्याचे लटके लाड पूर्ण करण्याचे एक अनोखच जग असत.पण ते जग असले तेव्हाच आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा आनंदी वाटतो .....ते नसले की आयुष्यच अंधारून जातं.मग माझ्या सारख्या वेड्या मुली अश्यादिवसी बाबांना मात्र खूप आठवण करीत सुटतात.ज्या प्रमाणे बाबांसाठी मुळीच त्यांचे विश्व असतात ,त्याच प्रमाणे मुलींसाठी त्यांचे बाबा मुलींचे अख्ये विश्व असते .त्यांच्या असण्याने मुलींच्या आयुष्याला खरा अर्थ वाटतो.त्यांचे नसणे किती भयाण वास्तव असत हे तुम्ही ज्यांचे हे प्रेमळ विश्व हरवले त्यांना विचारा.मुली म्हणजे फार संवेदनशील असतात.त्या हळव्या मनाचा विचार केवळ बाबाच करू शकतात.अश्या ह्या आई बाबाच्या लेकी ज्यांना त्यांचे घाव पाहून गहिवरून येतं.बापाची गरिबी असो वा श्रीमंती मुली मात्र त्याच असतात.आईवडीलावर जिवापलीकडे प्रेम करणाऱ्या ,छोट्याश्या गोष्टीने आईबाबांना भरभरून आनंद देणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेकी ह्या तुकडा असतात आई बाबांच्या काळजाचा........अश्या या सर्व लाडक्या मुलींना Happy daughter's day........


    


Rate this content
Log in