आत्मविश्वास मिळवून देणार प्रेम
आत्मविश्वास मिळवून देणार प्रेम


पवित्रा तशी डिग्री झालेली... पण जरा बुजर्या स्वभावाची....थोडीशी भित्रीच. घरचे तर सारखे म्हणत कस होणार आहे या मुलीच काय माहीत, कधी धाडशी होणार ही... घरच्यांच्या तिच्याबद्दलच्या विचारामुळे तर तिचा आत्मविश्वास जास्तच कमी झालेला... तिचं तीच स्वत:ला कमी लेखत होती. झालं डिग्री पण झालेली असल्याने तिचे घरचे लोक तिचं लग्नही लावून देतात. सुदैवाने पवित्राला नवरा चांगला मिळतो....रमेश त्याच नाव.....खूप प्रेम करत असतो पवित्रावर..... तो प्रत्येक गोष्टीत पवित्राला साथ देत असतो.....रमेश पवित्राच्या प्रत्येक गोष्टीच भरभरुन कौतुक करत असायचा......का कोण जाणे तिला लग्न झाल्यापासून खूप हलकं हलकं वाटत होत... कारण ज्या गोष्टीवरून तिला तिचे घरचे वारंवार बोलत त्या कोणत्याही गोष्टीवरून रमेश तिला बोलत नसायचा.....ऊलट काही चूकलच तर तिला तिची चूक सांगून ती सूधारण्यासाठी मदत करायचा......त्यामूळेच की काय आता ती प्रत्येक गोष्टीला शंभर टक्के देवू शकत होती.
रमेश पवित्राच्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करे. त्यावरून पवित्राला एक कल्पना सुचली. तिने स्वत:चं एक छोटं रेस्टाॅरंट सुरू करायचं ठरवलं आणि रमेशकडून परवानगीही मिळवली. नुसती परवानगीच नाही तर रमेशने तिला रेस्टाॅरंट सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. दिवस-रात्र एक करून तिला सर्वोतोपरी मदत केली. रेस्टाॅरंट सुरू झालं तसं, रेस्टाॅरंटच्या प्रत्येक पदार्थाचं येणारे लोक कौतुक करत आणि पोटभरून खावून जात. तिच्या रेस्टाॅरंटच नाव दुरवर पसरलं. तिथं खाण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागले. तिच्या घरातल्यांनाही खूप आनंद झाला त्यांनीही पवित्राचं मनभरून कौतुक केलं आणि तिला शाबासकी दिली. घरचे मनातून थोडे खजीलही झाले कारण त्यांनी पवित्राला कधीच सपोर्ट केला नव्हता आणि मनातून सुखीही होती की त्यांच्या मुलीला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला होता. पवित्रानेही आपल्या सर्व यशाचं क्रेडिट रमेशला दिलं कारण आज तिला मिळालेलं यश हे रमेशच्या तिच्यावरच्या प्रेमामुळेच मिळालं होतं. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळालेला असतो, तो केवळ प्रेमामुळेच !