Manish Raut

Tragedy

2  

Manish Raut

Tragedy

आणि मी मॉडेल झालो

आणि मी मॉडेल झालो

2 mins
157


जेवलास का? सुमित ला लांबूनच आवाज दिला मी... माझ्या घरा पासून 7 - 8 फुटावर समोरच घर त्याचं, त्याने पण त्याच्या पोटावर हात फिरवून हा रे आत्ताच झालं असा इशारा केला...... हे आमचे रोजचेच संभाषण.... भाई श्रावण चालू होतोय.. म प्लान काय???.. तू बोल... त्याचे वाक्य.... आपले ठराविक 7-8 रोजचे मेंबर बसू आपल्या डोंगरावर.... हा चालेल मन्या.. त्याचा रिप्लाय...  

सुमित आज काय पाऊस थांबणं मुश्किल आहे... जाम जोरात पडतोय... मुंबई भरली असेल रे 

सुमित :- मुंबई काय घेऊन बसलाय महाराष्ट्र बुडत चाललाय बघ 

हा हा हा (आमचे हसणं शेवटचं )

मी : चल म उद्या भेटू... म बोलू पुढचं.... माझं पिल्लू मी गेल्या शिवाय झोपणार नाही 

तो : ओके चल बाय (शेवटचा )

घरात गेलो light बंद केली अंगावर चादर घेणार तितक्यात प्रचंड आवाज आला.... 

मला वाटलं वीज पडली की काय??? 

पण नाही काही दुसरेच अघटित घडले... घरातून बाहेर काय झाले बघण्यासाठी आलो.. आणि डोळ्यासमोर माझं संपूर्ण घर त्याच डोंगराने कुशीत घेऊन टाकलं.... माझी आई...माझा बाप... माझं लेकरू....बायको.... सगळं सगळं एक क्षणात गायब झालं.... मी कसा वाचलो ते मला पण आठवत नाही..... रात्र होती काहीच दिसत नव्हतं... मी फक्त धावत होतो..... जीव वाचवायला.... सकाळ झाली.... गावात गेलो.... गाव नव्हतं... काहीच नव्हतं... गेलं कुठे??? रडायला डोळ्यात पाणी पण येत नव्हतं... करायचं काय..... 

आणि अचानक एक दिवसानंतर माझ्या गायब झालेल्या गावात मदत यायला सुरवात झाली.... कधी कोणाला गावाचं नाव माहित नसेल पण... आमची माणसे मेल्या मुळे आख्या देशाला माझ्या आता  नसलेल्या गावाचं नाव कळलं... 

कित्येक राजकीय पक्ष 

कित्येक सामाजिक संघटना 

अरे बापरे किती ती मदत.... 

खूप बरं वाटलं.... आपल्या शिवरायांचे मावळे आहेत अजून.... मला पण बोलावलं मदत घ्यायला... गेलो मी..... माझ्या हातात काही भांडी... काही कपडे दिले.... त्यात लहान मुलाचे कपडे होते..... पण माझं पिल्लू?????? कुठे होत ते????? त्या मातीच्या ढिगाऱ्या मध्ये भेटलं पण नाही..... नाही सापडलं कधीच माझं पिल्लू...... मला रडू कोसळलं.... मी रडायला लागलो..... आणि मदत करणाऱ्या सगळ्याचे कॅमेरे सुरु झाले....... किती तरी फोटो काढले गेले.... जबरदस्ती हात ठेऊन फोटो काढले गेले....... पण कोणीच विचारलं नाही मी का रडतोय..... दुसऱ्या दिवशी कोणीतरी येऊन सांगितलं 

मन्या तुझा फोटो आलाय रे सगळ्यां पेपरात आणी टीव्ही वर पण दाखवतात..... आणि मी विचारत होतो फॅमिली मधली एकाची तरी बॉडी मिळेल का??????  उत्तर कोणा कडे नव्हतं... त्यांना त्याची काही पडली पण नव्हती त्यांनी मला *मॉडेल* बनवून स्वतःची सोशल मीडियावरती लाल केली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy