alka sanap

Inspirational

2  

alka sanap

Inspirational

आजची स्त्री कशी असावी

आजची स्त्री कशी असावी

4 mins
181


महिला,स्त्री या शब्दाबरोबरच प्रेम, वासल्य, स्नेह, ममता, माया या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.,सशक्त झाली आहे.एव्हाना तिने तसे सशक्त व्हावे.

एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती बऱ्याच प्रमाणात ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. काही श्याम आता याला अपवाद दिसतात.


आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे. आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती या ना त्याप्रकारे पाहावयास मिळत आहे. स्त्री-भ्रुण हत्येच्या कलंकित, दुर्दैवी गोष्टी अनेकदा ऐकावयास मिळतात. ‍पण त्याचवेळी समाजात मुलींना जन्म देऊन करियर आणि संसार प्रसन्नपणे सांभाळणारी, आईदेखील पाहावयास मिळत आहे. अशी बरीचशी कुटुंबे आपल्या जवळपास सापडतील की ज्यांना फक्त एकच मुलगी आहे किंवा दोघीही मुलीच आहेत. आणि त्या आई-वडिलांच्या लाडक्या आहेत. त्या आई-वडिलांचीही काळजी घेत आहेत. संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून आपले करिअर सुद्धा तितकेच यश शिखरावर नेऊन ठेवू पाहत आहे.


कुटुंबव्यवस्थेला आकार देणारा, घराघरात सुसंवाद राखणारा... समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितका तो समाज सभ्य, सुसंस्कृत... मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची नाती... स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होतं... खरी आत्मनिर्भरता येते आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप,सुदृढ शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून..तसे पाहता काही काही स्त्रिया सक्षम झाल्या तरी काही महिला आत्मनिर्भर झालेल्या नाहीत, तर काही गरीब महिला आत्मनिर्भर आहेत. महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे उद्धिष्ठ गाठावे, घर समाजात स्वत:चे स्थान निर्माण करावे याबाबतचे मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतरही माध्यमातून उपलब्ध होते पहावयास मिळत आहे त्याचा उपयोग करून स्त्रियांनी आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल करणे आवश्यक आहे.


आपल्यातील ईर्षा, द्वेष, फटकळपणा हे दोष घालवणे, आत्मसन्मान, धैर्य वाढवणे, आरोग्य कसे राखावे, नोकरदार महिला, गृहिणी तसेच सुखी वैवाहिक जीवन या विषयी जागरूक राहणे,वेळीच मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर व व्यक्तिमत्व विकासासाठी स्वताच खंबीरपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.लग्नापूर्वीची मानसिकता मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे अशा रूढिवादी परंपरा झुगारून देऊन लग्नाआधीच त्यांना शिक्षण देणे, आत्मनिर्भर करणे ही मानसिकता आता बदललेली आहे, विकसित झाली आहे.


मुलीच्या घरचे पाणीही वर्ज्य मानणार्‍या समाजात लोकं मुलीच्या घरी येऊन राहू लागली आहेत. आणि त्यांच्याकडून भेटवस्तूदेखील प्रेमाने आणि गर्वाने स्वीकारू लागली आहेत.या परिस्थितीचा मुलींनीही स्त्रियांनीही हवा तेवढा फायदा घेऊन स्वतःचा विकास करणे गरजेचे आहे स्वतःचा विकास स्वतः सुदृढ तर कुटुंब परिवार विकसित आणि सुदृढ होते हा समाज अगोदर त्यांनी आपल्या स्वतःच्या मनात रुजविणे गरजेचे आहे.मुलींना कायद्याने संपत्तीत अधिकार तर मिळालेच आहेत पण वडीलही तिला आपल्या संपत्तीचा अधिकार देऊ लागले आहेत. समजदार भाऊदेखील त्यात सहकार्य करीत आहेत.अशा परिस्थितीत स्त्री ने देखील आपले कर्तुत्व आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून पार पाडून परिस्थिती हाताळली पाहिजे.


'लग्नासाठी 'वर' पसंत करताना तिच्या मतालाच प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळेच तिने योग्य जोडीदाराची निवड करावी.स्त्रीयांनी आत्मविश्वासाने समाजात पाऊल पुढे टाकत आजउच्च शिक्षणासाठी मुली लहान-लहान शहरातून मोठ्या शहरांमध्ये येऊन राहणे, नोकरी करणे, आपली ओळख निर्माण करणे यामुळे त्यांच्या आत्मविश्यास वाढीस लागला आहे. आपल्या देशातच काय पण विदेशात जाऊ लागली आहे.त्यामुळे करिअरच्या बाबतीतील तिच्या अडचणी बऱ्याच प्रमाणावर कमी होताना दिसत आहेत त्याचा उपयोग ते सकारात्मकतेने पुढील करिअर साठी आयुष्यासाठी करून घेणे गरजेचे आहे.


आत्मविश्वासासोबतच आपले मत ठामपणे मांडणेही ती शिकली आहे. घराच्या संरक्षण कवचातून बाहेर येऊन तिने अभिव्यक्ती स्वातंत्र स्वत:च मिळविले आहे. ती होणाऱ्या अन्यायाचा विरोध करण्याच्या परिणामांना न जुमानता अन्यायाचा विरोध करते आहे. आजची स्त्री पतीची खरया अर्थाने सखी-सहचारिणी बनली आहे. ती पतीची दु:ख वाटून घेण्यातही सक्षम झाली आहे. ती पत्नी बनून फक्त त्याने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे.


आजची महिला घराबाहेर जाऊन कमावू लागलेली आजची आई मुलांप्रतीही अधिक जागरूक आणि संवेदनशील बनली आहे. मुलांचे पालन-पोषण करतानाच ती त्यांना निर्णय घेण्यातही भागीदार बनली आहे. मुले ही आपल्या आईच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू लागली आहेत. ती सासर आणि माहेर यांच्यामधील महत्वाचा दुवा बनून दोन्हीही कुटुंबासंबंधी आपले कर्तव्य पूर्ण करीत , कर्तव्यही पार पाडीत आहे.


'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते' हा कलंक देखील तिने पुसून टाकला आहे. सासू-सून यांच्यातील युद्ध आता फक्त टी.व्ही. मालिकांमधूनच पाहावयास मिळत आहे. कारण आजच्या सासू सूना एकमेकांच्या वैरी नाही तर मैत्रिणी बनल्या आहेत. एकमेकांची सुखदुःख वाटून घेताना दिसत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा स्त्रीयांना घरात वावरतांना मानसिक ताण कमी झालेला पहावयास मिळतो.


या सर्व गोष्टींचा विचार करता आजची स्त्री ही आत्मनिर्भर आत्मविश्वास पूर्ण आणि संकटांचा सामना करणारी आव्हानांना हसत सामोरे जाणारी, नेतृत्व करत, क्षेत्र कोणतेही असो, आपला सोनेरी ठसा उमटविणारी, कसल्याही प्रलोभनांना भावनिक अत्याचारांना बळी न पडणारी, स्वतःच्या आयुष्याचे सर्व निर्णय योग्य पद्धतीने घेऊन त्यांना पूर्णत्व देणारी अशीच आजची स्त्री सर्वगुणसंपन्न, खंबीर असावी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational