आई बाबा विना माझे अस्तित्व नाही
आई बाबा विना माझे अस्तित्व नाही
चालायला मज शिकवले तू हात धरुनी,
बोलायला आणिक लाडीगोडी करूनी,
तुजपरी आई जीव मज कोण लावी,
बाबा सारखे फिरायला कोण नेई,
तुम्हावाचून मज जग हे असे परके,
सर्वाहूनी मज आई बाबा तुम्ही लाडके,
नको मज पैसे सुख सोयी आणिक काही,
प्रेमाच्या तुमच्या सर कशातही नाही,
जरी मी जिंकेन या दाही दिशाही,
आई बाबा तुम्हा विना अस्तिव माझे नाही...
