STORYMIRROR

priyanka desai

Romance

4  

priyanka desai

Romance

तू...

तू...

1 min
294

स्वप्नातल्या सुखाचा भास तू,

कोमल कळीचा सुवास तू,

विचाराने धडधडणारा श्वास तू,

काहीतरी आहेस खास तू...


गर्दीतल्या मनाचा एकांत तू,

मनातल्या ऋतूतला वसंत तू,

वाटेवर पसरलेल्या साऱ्या,

दुःखांचा अंत तू...


उन्हातला गारवा तू,

सुखांचा पारवा तू.

हरवलेल्या हृदयाचा विसावा तू,

दिवसानंतरचा चांदवा तू...


देवाची सुंदर कल्पना तू,

प्रेमाची सुंदर भावना तू,

मनातल्या सर्व कवितांची, रचना तू...


तुझ्या असण्यानेच माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे...

कारण...

माझ्या जगण्यालाही अर्थ देणारा

तू.. तू... आणि फक्त तूच!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from priyanka desai

तू...

तू...

1 min वाचा

Similar marathi poem from Romance