तू आहेस म्हणून !
तू आहेस म्हणून !
तू आहेस म्हणून
फुलतात मनात फुलांचे ताटवे
दिसतात पाण्यावरच्या नक्षी
ऐकू येतात पावसाच्या रिमझिमणाऱ्या सुरावटी
आणि
दिसतात उन्हाळ्यातही इंद्रधनू दर दिवशी
तू आहेस म्हणून तर
पावलांना फुटलेत पंख
अन मन झालाय पिसासारख हलक
ही धरा झाली हिरवीगार
तर अंबर झालाय मोकळ मोकळ
तू आहेस म्हणून
दिवस आणि रात्र, श्वास आणि गात्र
तूच आहेस सर्वत्र
मी आता तुझ्यातच मिसळून गेलीये
हेच निखळ सत्य !!

