STORYMIRROR

Ganesh Kene

Romance

3  

Ganesh Kene

Romance

तुझे सौदर्य

तुझे सौदर्य

1 min
582

काय वर्णू तुझे तेज

काय वर्णू तुझे रुप

काय अशी भुरळ घातलीस तू

माझ्या वेड्या मना


अशी कशी बट तुझी

लावलीस वाट माझी

असे कसे नयन तुझे

पाहुनी भुलले मन माझे


कर्णफुलांचा सुगंध तुझ्या

दरवळतो ह्रदयात माझ्या

नाकातील नथ तुझ्या

खुणावितसे मना माझ्या


होठांवरील हास्य तुझे

मोहवितसे मन माझे

गळ्यातील बंध तुझ्या

बांधोनि ठेवितो मना माझ्या


असे हे तुझे तेज

काय वर्णू तुझे रुप

काय वर्णू तुझे रुप



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance