STORYMIRROR

Ganesh Kene

Others

3  

Ganesh Kene

Others

आयुष्याच्या वाटेवरुन जातांना

आयुष्याच्या वाटेवरुन जातांना

1 min
254

सज्ञान होताच मी चालू लागलो

आयुष्याच्या वाटेवरुन

त्या वाटेवरुन जातांना

सुरुवातीला छान वाटले

जसजशी वाट पुढे चालू लागलो

तसतसे वाटेत काटे दिसू लागले

परी मागे नाही वळलो

कधी वाटेतील काटे वेचित

हसत-खेळत पुढे जात तर,

कधी काटे वेचुनी थकून जात

तरीही काटे वेचीत पुढे जात

कारण मनी आशा वाटायची

आयुष्यात पुढे चांगली वाट येईल

आणि पुढचा प्रवास सुखाचा होईल

पण!

या काटेरी वाटेवरुन चालता चालता

पाय ऐवढे बोथडले आहेत, की

पुढची वाट चालताही येत नाही

चालायचे साहसही होत नाही

अशा या आयुष्याच्या वाटेवरुन

पुढे चालायचे कसे?

काही उमजत नाही.


Rate this content
Log in