STORYMIRROR

Sushama Dange

Classics

4  

Sushama Dange

Classics

ते दिवस

ते दिवस

1 min
208

खरंच आधीच दिस...

म्हंजी सोन्या वाणी...

रुतून बसत्यात

हरभर्यातील घाट्या वाणी


बाप माझा आगटीत

भाजायचा कणसं,

हुरड्या वाणी गोड... 

असायची माणसं.....


नवस फेडायला 

कंदुरी असायची 

कढान पिऊन माणसं 

जाम खूष व्हायची...


आजी चा काष्टा नि

आजोबांचा कासोटा. 

आत दंडकी असली

तरी डोईवरी फेटा....


आईचं नऊवारी लुगडं

बापाची बाराबंदी.....

नोटा दडवून ठेवायला

कयाळात संधी........


पावसाळा आला की. 

शेकरण सुरूव्हायची 

त्यासाठी तुराटी नि

काडं वापरायची......


उतरंडीची ओळ...... 

कणींग धान्यासाठी...

चुलीजवळ मांदान.... 

कणगुलं भाकरीसाठी


हारा कणसांसाठी

दुरडी रुखवतासाठी

दिसतील का ते दिवस

पुन्हा अनुभवण्यासाठी


Rate this content
Log in

More marathi poem from Sushama Dange

Similar marathi poem from Classics