STORYMIRROR

geeta shindepatil

Tragedy

3  

geeta shindepatil

Tragedy

सांगा मी काय करु?

सांगा मी काय करु?

1 min
146

तुमच्याविना घराचा 

गाडा कशी हाकू?

अन् गळणार्‍या घराचं

छप्पर कशी झाकू ?

सांगा मी काय करु?....॥१॥


सावकाराच्या कर्जापायी

काया झाडाला टांगली

नशीबासवे माझ्या

नातीगोतीही पांगली

सांगा मी काय करु?....॥२॥


बोचणार्‍या लोचट नजरा

कशी मी सोसू?

बापाविना लेकरांना

कशी मी पोसू?

सांगा मी काय करु?.....॥३॥


पोरीचं लगीन आता

तोंडावर आलयं

हुंड्याच्या इचारान पोरगं

बिथरल्यागत झालयं

सांगा मी काय करू?...॥४॥


मांडलेला डाव तुम्ही

अर्ध्यावरती मोडलात

धरलेला हात माझा

कायमचा सोडलात

सांगा मी काय करु?...॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy