प्रेम कस्तुरी
प्रेम कस्तुरी
कंकण किणकिण म्हणाली, पैजणांच्या घुंगुराला !
दोघांचा एकत्र निनाद , खुप दिवसांनी झंकारला !
कपाळाच्या बिंदीला, सहवास डोळ्यांच्या काजळाचा!
न्हाऊन निघाली गात्र, रातराणीचा सुगंध बहरला !
केसात फुलला मनांचा फुलोरा, सडा सभोवार चांदण्याचा!
सूर-सुगंध झाले एकत्र, सतारीतुन शब्द उमटले!
आला बहर मैफिलीला, दरवळला सुगंध कस्तुरीचा!