STORYMIRROR

Vrushali Thakur

Romance

4  

Vrushali Thakur

Romance

पाऊस आणि तू

पाऊस आणि तू

1 min
1.5K

अचानक येणारा पाऊस   

आणि तसाच अचानक येणारा तू 

तुझ्या मिलनाच्या प्रतीक्षेत चातक होणारी मी 

आणि दाटलेल्या ढगांआडून धावत येणारा तू 


थेंब थेंब बरसणारा तो वेडा पाऊस 

आणि तसाच हळूवार प्रेम बरसणारा वेडा तू 

त्या प्रेमात विरघळून जाणारी मी 

विरघळलेल्याही मला ओंजळीत सामावून घेणारा तू 


￰खिडकीतून बघताना पाण्याचे शिंतोडे उडवणारा तो खट्याळ पाऊस 

ते गालावरील जलबिंदू तितक्याच खट्याळपणे 

आपल्या ओठानी टिपणारा तू 


गार गार वाऱ्याने 

अंग शहारून सोडणारा तो पाऊस 

त्या शहाऱ्यावर लयबद्ध तुझ्या 

बोटांची नक्षी कोरणारा तू 


अंग अंग भर भिनून गेलेला तो पाऊस 

आणि रोमरोमांत भिनून उरलेला तू 

धरिणीसारखी तृप्त तृप्त मी 

तरीही बेभान कोसळणारा तू 


आजही वाहतो तो वेडावणारा गार वारा  

आजही येतो रे तसाच बेधुंद पाऊस 

प्रतीक्षेत तुझ्या आजही तशीच वेडी मी 

फक्त येत नाही तो मला वेड लावणारा तू


Rate this content
Log in

More marathi poem from Vrushali Thakur

Similar marathi poem from Romance