STORYMIRROR

Priya Satpute

Classics

2  

Priya Satpute

Classics

पाऊल खुणा

पाऊल खुणा

1 min
1.4K

भूतकाळाच्या चादरीत

लपलेला असतो

अतृप्त इच्छांचा कोंडमारा


चेहऱ्यावर ओढताच

होतो जीव अर्धमेला


आताच्या क्षणांना

गिळंकृत करू पाहतात

या अतृप्त इच्छा


पण घाबरणार नाही मी

की थकणार नाही


उमटवत राहीन

नव्या पाऊल खुणा

पुन्हा लढण्यासाठी

पुन्हा जगण्यासाठी…




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics