न संपणारे प्रेम..
न संपणारे प्रेम..
तुला दृष्ट लागावी असे तुझे रूप आहे
अति पवित्र त्या राधेप्रमाणे तुझे स्वरूप आहे.
मागणी नाही कोणाची चांदी, सोने, धनाची
तुझा गोड स्पर्श व्हावा. इतकीच इच्छा मनाची
तुझ्या मनाच्या पवित्रतेबद्दल मी निशब्द आहे.
तुझी साथ ज्याला लाभेल तो खरच धनीष्ट आहे.
तुझे रूप, तुझे निखळ हास्य जणू तुला वरदान आहे.
तुझे एक हास्य कोणाला तरी जिवनदान आहे.
तुझ्या केसांच्या सुगन्धाने तो वारा ही प्रसन्न झाला
तु सोबत होतीस म्हणूनच की काय आज तो कायमचा चिन्तामुक्त झाला
तु सोबत नाही ही कल्पना तरी कशी करावी
सोबत नसताना देखील फक्त तूच स्मरणात रहावी फक्त तूच स्मरणात रहावी...

